पोलिसांची
लैला
आजचा दिवस
काहीतरी वेगळाच होता .निळा फुलाफुलांचा कुर्ता ,गडद निळी सलवार आणि त्याचा मॅचिंग
दुपट्टा .महिला पोलिस म्हणून नोकरी भरती झाल्यापासून आधी ट्रेनिंगसाठी आणि नंतर
गेले आठ महीने सतत घराबाहेर पडताना तिच्या अंगावर खाकी वर्दीच असायची .तिला त्या वेशांत पाहून शेजारच्या मिसेस गुप्तांनी
हटकलचं -आज ड्यूटी नाही वाटत १
आहेना,
जाणार आहे ,ती डयुटीवर निघाली होती हे तिला सांगता आलं नाही ,कारण आजपासून तिची डयुटी होती -लैलैची भुमीका वठवण्याची .मिसेस
गुप्तांना हे सांगिलत तर त्या काहीतरी वेगळाच अर्थ काढतील .निदान खोचकपणे नक्की
म्हणतील .अच्छा ,म्हणजे आता पोलिस तुला
चा-यासारखं वापरणार तर ,किंवा
त्याहून वाईट त्या कदाचित गप्पच बसतील -पण त्यांच्या तोंडावरचे भाव सांगतील की ती
काहीतरी वाईट कृत्य करायला निघाली आहे. .तिचा पाय घसरतो आहे. ज्या गल्लीत ती
जन्मली ,लहानाची मोठी झाली ,ती ती गल्ली पार करेपर्यत तिला अंगात थोडिशी शिरशिरी
जाणवत राहिली ,कारण तिला माहित होते की ,ती दिसेपर्य़त मिसेस गुप्ता तिच्याकडे बधत
राहणार आणि तिच्या पाठमो-या चालीवरून ठरवणार पोरगी बिघडली
की नाहीते.
मिसेस गुप्ताच
काय -पण गल्लीतील सगळयाच बायकांचा हा प्रिय उद्योग आहे .तिला आठवलं -तिला पोलिस
कॉन्स्टेबल म्हणून नेमणूकाचे पत्र आलं तेव्हा सगळया जणी चित्कारल्या होत्या
-ई,त्यापेक्षा तू नर्स हो बाई.
जणूकाही नर्सची नोकरी त्यांच्या दृष्टीने
जास्त इभ्रताची होती सगळया एकजात मतलबी कुठल्या ,कधी बाजारात जरा कुठे कुणी धक्का
दिला किंवा असच काही खट्ट झाल तरी हक्काने तिच्याकडे येऊन तिने काहीतरी कराव ही
अपेक्षा धरणार ,पण बाजारात जेंव्हा
नव-यात्या स्कुटरवर पाठीमागे बसलेल्या असताल तेंव्हा आशी ऐट दाखवतील की
ओळखसुद्धा देणार नाहीत. विचारांची दिशाबदलण्यासाठी तिने आपल्या ड्रेसकडे लक्ष
दिलं. आज पहिल्यांदा तिला वाटल की या पोलिसाच्या नोकरीत काही चांगले क्षण पण असु
शकतात.एरवी रोज अंघोळ करताना तिचे हात कमरेवर आणि पोटावर फिरत ,तेव्हा रूंद
बेल्टमुळे उमटलेल्या खुणांकडे लक्ष जायचं .तो भाग हळूहळू ताठल होत चाललाय आणि एक
दिवस हा ताठरपणा आपल्या शरीरभर पसरेल .अशी तिला भिती वाटायची .चालता-चालता तिने
डाव्या हाताचा कोपरा कमरेत रूतवू पाहिल .आज कडक बेल्टच्या जागी झुळझुळीत कापडाचा स्पर्श
मखमली वाटत होता .पुन्हा तिने दिसेल त्या सगळया बाजूंनी आपला पंजाबी ड्रेस निरखुन
घेतला .खरचं छान दिसत होता आणि ती पण छान
दिसत असणार -पटकन तिने आजूबाजूला दृष्टी फिरवून घेतली -कुणाला तिचे भाव समजले
नाहीत ना१ घरून निघताना आई पण म्हणाली होती-आज कशी बाहूलीसारखी गोड दिसतेस तू
.आईच्या आवाजातल दुःख स्पष्ठ कळत होत .तिचम लग्न अद्याप न ठरवता आल्याच दुःख ,तिचं
शिक्षण पुर्ण न करता आल्याचं दुःख ,वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे तिला नोकरी पत्कारावी लागल्याच दुःख ,वडीलही कॉन्सटेबल होते
आणि ती घरात सर्वात मोठी .सज्ञान ही तीच .त्यामुळे अनुकंपा कारणास्तव नोकरी मिळायला तिच एकटी पात्र होती .इकडे तिच्या
लग्नासाठी जमवलेली रक्कम देखील वडिलांचे आदारपण आणि पुढच्या काही महिन्यांत समपी
गेली होती .त्यामुळे उशिराका होईना ,तिला
कॉन्स्टेबलची नोकरी मिळाली हेत पुष्कळ होते.
त्यावेळी तिला
याच बायकांनी पोलिसांचे किती किस्से ऐकवले होते.माहीत आहे ना नव्या डिएसपीने काय
केले १ आपल्या मुला-बाळांना पाठवून दिले गावाला आमि शहरातल्या सगळयात सुंदर
कॉन्टेबलची डयूटी लावली बंगळयावर ,बाकी तू सुंदर दिसत नाहीस हे एकप्रकारे बरेच आहे
म्हणा ,एरवी पोलिसांचा डिसिप्लिन असा असतो की तुला काही बोलता देखील येणार नाही
,ट्रेनिंग पुर्ण झाल ,तिच्याबाबत तसलं काहीच घडल नाही .त्यामंतर कधी पोलिस चौकिवर
डीएसपी ऑफिसच्या हेड क्वॉर्टरवरदेखील
तिने डयुटी केली .क्वचित एखाद्या कॉन्स्टेबलने काही म्हटले असेल तेवढेच ,पण
तिने तीव्र नजरेने त्याच्याकडे पाहाताच सगळयांना पटलं बच्चू हिने तक्रार केली तर
गोष्टी वाढतील ,नकोच ते
नंतर तिची
नोकरी बदलली .आता रॉंग साईडने येणा-या वाहनांना पकडून चलान करायच काम आल तरी तिच्याबाबत असल-तसलं काही घडल नाही
.ज्याची तिचे नातेवाईक आणि शेजारी वाट पाहत होते .हळूहळू तिचा आत्मविश्वास आणि
पोलिसांच्या ,लोकांच्या चांगुलपणावरचा विश्वासही वाढू लागला.
काही लोकही
कसे असतात ,आत्मविश्वासाने चमकणा-या चेह-यावर वेगळचं काही तरी शोधत असतात. जाऊ दे
आपल्यालाही त्यांना काही शिकवायची गरज नाही .तशी त्यांचीच सगळी चूक आहे असं नाही
.तिच्या बरोबरीच्या आणि आधीच्या काही महिला पोलिस कॉन्स्टेबल्सनी काही गोष्टी
केलेल्या आहेत .आराम आणि हरामखोरीसाठी ,पण प्रत्येकच व्यवसायात कुणीतरी तसले किंवा
तसल्या असणारचं आपण त्याबाबत डोकं नाही शिणवायचं आपण साधं असलंकी असते -तसलं काही
होत नाही.
मात्र दोन
दिवसांपूर्वी डीएसपींनी तिला आपल्या चेंबरमध्ये बोलाबल तेव्हा ती दचकली .आज बहूधा
तो दिवस आहे ,ज्याच्याबद्दल तिला सारखं सावधान केल जात होत ,पण नाही तसलं काहीच
झाल नाही .डीएसपींनी तिला बोलावलं होत ते तिची नवीन डयुटी समजावून द्यायला .
आणि ,
आणि कॉलेजच्या मुली घालतात तसे ड्रेस विकत घ्यायला सांगितले .तिला जरास
हसूच आलं , माझ्यासारख्या माझ्यासारख्या
मुलीला कोणता मजनू डोळे वर करून पाहणार
१
पण
डीएसपींनीच तैनात केल्यावर कोण काय बोलणार १ सध्या कन्या महाविद्यालयाच्या समोरून
जाणा-या रस्त्यावर गर्दी वाढलेली आहे आणि कित्येक सडकछाप मजनू मुलींची छेड काढतात
अशा तक्रारी आहेत. पेपरातही बरच काही लिहून आलय .म्हणून त्यांनी तिला खास करून
बोलावून घेतल होत .पाळत ठेव आणि चार- दोन मजनूंना पकडून त्यांची धूलाई करीतच
ठाण्यावर घेऊन ये ,बघू काय ज्युडो -फिडो शिकली आहेस ते.
आता दुपार
होत आली .सकाळपासुनच पाच -सातवेळा तिने रस्त्यावर फे-या मारून झाल्या आहेत .हे
मजनू टाईनही किती भित्रे असावेत .स्कूटरवरून खटकन निघून जातात.दहा -बारा मुलांबाबत
तिला शंका आली ,पण ते काहीच न करता गेले तिला तर सोडाच इतर मुलींची टिंगलही केली
नाही .कंटाळून ती रिक्शा स्टॅण्टडकडे आली .तिला जीवनलालचे शब्द आठवले .तिच्या
चौकिवरचा थुलथुलीत सब इन्स्पेक्टर ,तो म्हणाला होता अरे ,तुला कोण छेडाल बाई १ पण
जा ,तू तूझ्या डयूटीवर जा ,चूक त्या सिनियर ऑफिसरचीच आहे .त्यांना माहीत नाही की ज्या मुलाची छेड काढतात त्या
मुलाच वेगळया असतात .पण जा तू ,तुझ्या डयुटीवर .आणि हे बघ ,नाही कुणी छेड काढली तर
वाईट वाटून नको घेऊस ,तीन महिन्यांपासून तू या चौकीवर आहेस,-कधी कधी संपुर्ण दिवस
तर कधी रात्री पण डयुटी केलेली आहेस , पण मी किंवा कुण्या जवानाने तुला छेडलं
नाही ना१ मग कोणी मजनू तुला काय छेडेल १ पण जा तू तुझ्या डयुटीवर जा,
सुटलेल्या पोटावरून खाली सरकलेला बेल्ट सावरून वर करण्याचा असफल प्रयत्न करीत
जीवनलालने काढलेले उदगार तिला खिजवू शकले नव्हते .असल्या अपमानास्पद भाषेची पोलिसात राहून सवय झाली
होती .ती सुंदर नाही ,साधारण आहे .इतर शंभर महिला पोलिसांसारखी .जीवनलालच्या
शब्दांकडे दुर्लक्ष केलेल बर .
रिक्शा
स्टॅण्डवर उभ्या- उभ्या तिला अचानक
कुणाचातरी आवाज आला .वळून पाहिल तर ग्रामीण दिसणारा एक युवक काहीतरी विचारत होता.
मॅडम इथून राजवाडयाला जायला टेम्पो मिळेल का१
अजब भाव होते त्याच्या चेह-यावर
भोळेपणाचे तिच्यातला पोलिस जागा झाला .तिने समजावल ,हल्ली ट्रॅफिक मार्ग बदलले
आहेत .त्य़ाला टेम्पोने फक्त मच्छी
बाजारापर्यत जाता येईल .पुढे पायीच जाव
लागेल , पण जवळच आहे राजवाडा का कोणास ठाऊक पण मजनूंच्या शोधात असलेल्या तिच्या डोळयांना हा ग्रामिण
युवक भला वाटला.
पोलिसांची लैला
पुढच्या
चार दिवसांत जवळ-जवळ तिला तो युवक दिसला .त्यांच बोलण रोज थोड थोड वाढल .
यादरम्यान तिने सात मजनू पकडले होते आणि ठण्यावर आणले होते .बरं झाल ,अशा वेळी तो
युवक जवळपास नव्हता ,नाहीतर त्याला कळलं असत की ती कॉलेज कन्या नसुन पोलिस
कॉन्स्टेबल आहे.
पाचव्या
दिवशी अचानक पावसाची जोरदार सर आली आणि
त्या दोघांनी धावत जाऊन एका चहाच्या टपरीपाशी शरण घेतली .चहा प्यायला आणि दुस-या
दिवशी पुन्हा एकत्र चहा प्यायचं ठरवल तेंव्हा तिला आपल्या ह्रदयात एक वेगळीच धडधड
जाणवली .वर्षभरात आज पहिल्यांदा तिला वाटल की ती फक्त एक पोलिस नसून एक माणुसही
आहे आणि एक धडकणार दिल तिच्याकडेही आहे.
दुस-या
दिवशी रविवार होता ,पण चौकिवर तिला सांगण्यात आल तुझी डयुटी
डीएसपींनी लावली आहे. आणि अजून तरी तुझी डयुटी बदलल्याची ऑर्डर आमच्याकडे आली नाही
,म्हणून तू तुझ्या डयुटीच्याच ठिकणी जा .तिने आठवण करून दिली आज कॉलेजला सुटी ,आज कोण मजनू सापडेल मला १ पण जीवनलाल म्हणाला हूकूम म्हणजे हूकूम तू तिकडेच जायच
तिचा तो
मजनू तिथेच होता रिक्शा स्टॅडपाशी .आता आपण रविवारी इथे आल्याबद्दल काय कारण
सांगायच याला१ आठवून ती म्हणाली ,इथे भेटून चहा प्यायच ठरवल होत ना आपण १.
त्याला
एवढं पुरेस होत सुट्टीमुळे रस्त्यावर एकांत होता .त्याचा फायदा घोऊन त्याने तिच्या
खांद्यावर हात ठेवला .पण इकडे तिकडे चलण्याचा प्रस्ताव करण्याऐवजी सरळ रोखठोक
विचारून टाकल ,तु माझ्याशी लग्न करशील १.
अचानक
आलेल्या प्रस्तावाने ती भांबावली ,आनंदली देखील .तिने मान खाली घातली .होकार देणार
इतक्यात तिला वाटल खरी गोष्ट लपवायला
नको. मग भले हा इतरांसारखा वागला तरी
चालेल .नाही म्हणाला तरी चालेल. थोडयाशा संकोचाने ती म्हणाली पण एक गोष्ट सांगू१
हो,हो सांग ना
.
मी कुणी
कॉलेज विद्यार्थिनी नाही .सडकछाप मजनूंना पकडण्यासाठी या ठिकाणी तैनैत केलेली
पोलिस कॉन्स्टेबल आहे.माझ नाव गीता.
जणू काही
वाजेचा करंट बसला त्याला कपाळावर हात मारून तिचा मजनू पटकन खाली बसला .गीताला
वाटलं तिच्या मजनू पकडो मोहिमेमुळे घाबरला बिचारा .खाली बसलेल्या त्या युवकाच सगळं
शरीर थरथरत होत . त्याल थोडा धीर द्यावा म्हणून संकोचतच तिने त्याच्या माथ्यावर
हलकेच स्पर्श केला आणि तिच्या लक्षात आल -मजनूच शरीर थरथरतय ,पण भीतीने नाही .तो
हसतोय .आस्ते आस्ते हसण्याचा वेग वाढला
आणि तो गदगदू लागला .गीताला बर वाटल .आपल्याला घाबरला नाही बिचारा .
बराच वेळ
हसून झाल .आता याने उठायला हवं, हसण्याच कारण सांगायला हवं अस गीताला वाटलं
मजनूच्या डोक्यावर हलके हलके थापटणारा तिचा हात थोडा खाली सरकला आणि त्याच्या टी
-शर्टच्या कॉलरवरून खाली येत त्याच्या पाठीवर विसवला .बोटामनी त्याला संदेश दिला
-आता ऊठ त्यांच हसण थोड कमी झाल ,पण थांबल नाही.अचानक पुन्हा उफाळून आल कारण न कळताच गिताच्या चेह-यावरही
हसू आल .तिने पुन्हा एकदा त्याची पाठ थोपटली आणि टी -शर्टाची कॉलर धरून त्याला वर
उचलण्याचा प्रयत्न केला .कॉलर बरोबर टी-शर्ट वर उचलला गेला आणि त्या ग्रामीण
युवकाची पाठ उघडी पडली .आता विजेची झटका बसण्याची पाळी गीताची होती .त्या
युवकाच्या कमरेवर तसलाच रूंद बेल्ट होता जसा तिच्या ड्रेसिंग टेबलावर सोडून ती आली होती .
---------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें