(डायरीतील पूर्ण इथे आलेले नाही)
--------- १ ------------------
ट्रिंनिंग... ट्रिंग... ट्रिंग...
पराशरन ने चौथी रिंग वाजण्याच्या आत फोन उचलला. साहेबांची सूचनाच तशी होती. कोणतेही कार्यालय किती कार्यक्षम आहे ते त्यातील लोकांच्या व्यवहारातील छोटया छोटया गोष्टींवरून समजते असे साहेब म्हणत. त्यांनी स्वतः कार्यक्षमतेच्या काही खाणाखुणा ठरवल्या होत्या. त्यातलीच ही एक खूण होती - बाहेरून आलेला फोन चौथी रिंग होण्याच्या आत उचलला गेला तरच माझा पीए कार्यक्षम.
“जमेल का हे तुला?” तुझी परीक्षा घेतानाचा हा पहिला प्रश्न आहे अस समज. तो ही कम्पलसरी सोडवण्याच्या!” असे म्हणत हलधर सिंहाने त्याच्याकडे पहिल्याच इंटरव्यूचा पहिलाच चॅलेंज फेकला होता.
पण हलधर सिंहाच्या चेह-यावर एक आश्वासक हसू होते. म्हणूनच पराशरन ने तितक्याच हिमतीने त्या चॅलेंजला हो असे म्हटले होते. बाहेरून आलेल्या फोनची घंटी वाजली आणि इतर कामांची गडबड नसली तर तो प्रसंग आठवून पुन्हा एकदा हसायला पराशरनला नेहमीच आवडत असे. ते दोन-तीन सेकंद निखालस त्याचेच असत.
“नमस्कार भारत-वूल्स का कार्यालय”-फोनच्या इंडिकेटर वरून तो बाहेरगावचा फोन असल्याचे कळत होते.
"................."
“ आहेत ना. पुढल्या महिन्यांत१२-१३ तारखा साहेबांच्या मोकळ्या आहेत असं दिसतय. तुम्हाला तयारीला पुरतील ना सहा आठवडे?”
"............."
--------- ३ ---------------“ आहेत ना. पुढल्या महिन्यांत१२-१३ तारखा साहेबांच्या मोकळ्या आहेत असं दिसतय. तुम्हाला तयारीला पुरतील ना सहा आठवडे?”
"............."
“ मी व्हीसी साहेबांना फोन जोडून देतो आणि हे सांगतो ”
अर्ध्या मिनिटातच विवेकानंद युनिव्हर्सिटीचे व्हीसी लाईन वर होते.
“ नमस्कार सर, देतोच सीएमडी साहेबांना ” पराशरन ने तो कॉल जोडून दिला आणि आता पुढील
सूचनेसाठी साहेब कधी बोलावतात त्याची वाट पाहू लागला.
अपेक्षेप्रमाणे लगेचच त्याच्या टेबलावर एक नाजुक दिवा चमकू लागला- साहेबांनी आत बोलावलय. कुसुमला फोन बघण्याचा इशारा करून तो आपले नोट पॅड घेऊन आत गेला.
“ बारा तारीख - पुढच्या महिन्यांत - नागपूर. चालेल ना आपल्याला.”
---------------------- २ -----------------------
---------------------- २ -----------------------
पहाटे कोबड्याच्या आरवाने चंदरला जाग आली. सवयी प्रमाणे तो उठून बाहेर आला. पश्चिमेकडे डोंगर दूरवर विस्तीर्णपणे पहुडलेले होते. त्यांच्या शिखरावरुन पूर्वेकडे उगवत्या सूर्याची किरणे चमकू लागली होती.
आकाशात बारक्या पाखरांचे थवे झेपावत होते. चा-याच्या शोधात निघालेल्या पक्ष्यांच्या रांगा पाहून चंदर हरखुन गेला. पण क्षणभरातच त्याच्या विचारांची दिशा पालटली. थोड्या दिवसात त्याला ही कूच करायचे आहे -- चा-याच्या शोधात त्याच्या कळपाबरोबर. या वर्षापासुन हळब्याला ही सोबत न्याव लागणार. डोंगरावर आता नसलेल्या पण सुदूर भूतकाळात असलेल्या झाडांची आठवण त्याला व्याकुळ करु लागली.
त्याचे आजोबा एके काळी गांवांत बड प्रस्थ होते. गांवच्या पाटलांसोबत घनिष्ट मैत्रिचे संबंध होते. मेंढपाळच असले तरी आठशेच्या वर मेंढरांचा कळप होता. त्यांच्याकडे जमिन व्यवहारांच्या न्याय निवाड्याबाबत विचारा करायला व सल्ला घ्यायला कित्येक लोक येत. गावकुसाच्या निर्मिती ची प्रक्रिया ते चांगली जाणून होते. त्यांनीच थोडे थोडे करून अधून मधून चंदरला शिकवले होते.
नवीन गावं वसवले जाते तेव्हा येवू घातलेल्या लोकवस्तीसाठी पुढील शंभर एक वर्षात किती जमीन लागेल याचा अंदाज घेऊन गावठाणाची जागा ठरवली जाते. पण गावठाण म्हणजे केवळ सर्व घरांना लागणा-या जागेची बेरीज नसते. गावाला समाज व्यवहार दांडगा असतो. त्यांना हवे असतात तळी, विहीर, पाणवठे, कुस्तीचे मैदान, मंदिर, गुरुकुल किवा शाळा. झालेच तर त्यांच्या बलुतेदारांच्या संख्येप्रमाणे त्या त्या व्यवसायासाठी लागणारी वेगळी व्यवस्था. उदाहरणार्थ- गुराच कातड कमवायसाठी मोठी जागा लागते- त्यावर हिरड्याची प्रक्रिया करावी लागते- त्यात बरेच सांडपाणी टाकले जाते -- त्याचा निचरा! काही गावात विणकर जास्त असतात. तर त्यांना ताना- बाना करण्यासाठी मोठे मैदान लागेल. अडीचवार सतरंजी विणायसाठी अडीच वारांवर ठोकलेले खांब हवेत. मैदानाशिवाय हे कसे होणार? नदीकाठी गांव असेल आणि तिचे मासेमारी होणार असेल तर होड्यांची जागा, जाळी पसरण्यासाठी व दुरूस्तीसाठी लागणारी जागा हवी. अश्या प्रकारे प्रत्येक गावाची गरज वेगळी, त्या गरजेपायी राखून ठेवावी लागणारी जागा पण वेगळी.
गावाला शेती हवीच. म्हणून गावठाणापलीकडे शेतजमीन असेल. ती मालकी प्रमाणे ज्यानी त्याने पिकवायची. पण गावात तर पशुधन असणारच. गाई, म्हशी, कुत्रे-माजरी, गाढव-घोडे, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या- बदक. त्यांच्या मोठ्या गुरांना मोठ्या प्रमाणात चराऊ रान पाहीजे. त्यामध्ये गवत, झाड पाला यांची रेलचेल असली पाहीजे. अशी गावांची चराऊ कुरणं पशुधनाप्रमाणे ठरवावी लागतील. शिवाय गावाच्या हजारो गरजांसाठी जंगल हवेचं. तिथून लाकूड-फाटा, गवत, बांबू, कुडं, रानभाज्या. कंदमुळे, पत्रावळीची पान. रानमेवा, करवंद-बोरी, कवठ, चिंच, शिकेकाई, रिठा, चारोळ्या इत्यादी. आणून गावातील कित्तेक व्यवहार चालणार. झालाच तर मध, हिरडे, कित्येक प्रकारची औषधे, मुळ्या याही रानातूनच गोळा करव्या लागणार.
याप्रमाणे प्रत्येक गावाला त्याचा स्वतः च्या जंगलाची गरज भासते. म्हणून चंदर, गावठाण वसवणे म्हणजे काही फक्त चाळीस घरे बाधणे नव्हे. तर त्या सोबत सर्व व्यवसायांसाठी लागणा-या मोकळ्या जागा हव्यात त्यांच्या पलीकडे शेतजमीन हवी. त्यापलीकडे चराऊ कुरण. शक्य असेल तर माळरान हेही हवेत. त्याच्या पलीकडे गावाच्या मालकीच जंगल पण हवं.
आणि जंगलापलीकडे काय असते आजोबा?
गावाच्या जंगलापलीकडे मोठ देवाच जंगल असतं- प्रकृतीच जंगल! त्यावर कुण्या गावाची मालकी असत नाही. तिथे जंगली जनावरे असणार- त्याना राहण्यासाठी ते देवाचे जंगल. तिथे डोंगर असणार, झरे असणार, मोठमोठे व़ृक्ष वाढणार. त्यांच्यामुळे ढग बरसणार, ते पाणी डोंगरावर पडेल आणि तेथुन खाली उतरतांना सोबत कित्येक झाडांनी त्याच्या मुळांत निर्माण केलेली औषधी द्रव्ये घेउन उतरणार. असे ते चवदार व आरोग्य वर्द्धक पाणी नद्यांमधुन आपल्याकडे येते. हे देवाचे जंगल आहे म्हणून आपल्याला चवदार पाणी मिळते. ते नसेल तर पाण्याची चव संपून जाईल.
पण आता तर त्या डोगरांगांवर झाड दिसत नाहीत. किती तरी डोंगर उघडे - बोडके असतात. पावसाळ्यात जी काही हिरवळ असेल तेव्हडीचं. मग औषधी गुणांचे, चवदार पाणी कसे मिळणार? काही तरी करायला हवे. डोंगरावर पुन्हा जाऊन झाडे लावायला हवीत.
सूर्य हळूहळू वर येवू लागला होता. चंदरचे पाय नकळतच घरात जाण्यासाठी वळले.
--------- ४ ----------------
धनगर समाजाचे आयुष्य खडतर. भटकण्याचे शेती नाही. पण रोजचा व्यवहार मुक्या जनावरांशी. वर्षभर मेंढ्याना रानात चरायला न्यायचे. शिवाय वर्षातुन (एकदा की दोनदा?) लांब-लांबच्या गावी फिरस्त्तिवर न्यायचे (का? खाणे नसते म्हणून कि मेंढ्या बसवण्याचे पैसे असावेत म्हणून की मेंढरांना व्यायाम हवा म्हणून?) फिरस्ती आणि लोकरीचे yield यात कांय संबंध? मेंढ्यांची लोकर काढायाची प्रोसेस कांय? वर्षातून एकदा कितीदा? कोवळ्या मेंढराची वेगळी लोकर असते का? त्या लोकरीची कताई कशी? घोगड्या कश्या विणतात ? न विणता प्रेस करुन वर त्यात चिचोंळी घालून जो प्रकार बनतो तो काय? त्यांचे रंगाचे वापर कोणते ? लोकर रंगवणारे आणि कापड रंगवणारे वेगळे असतात काय?
आपला धनगर समाज कुठे कुठे आहे? त्याचे एकवटलेले Population कुठे? त्याचे फिरतीचे Routes कोण कोणते? प.महाराष्ट्र, कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ? एकूण लोकर उत्पादन किती? देशात अजून कुठे कुठे? किती? धनगरी कुत्रे? धनगरी ओव्या ? त्याखेरीज त्यांच्या लोककला कोणत्या? धनगरांना आरक्षण आहे का? कोणते - किती? धनगरी आयुष्यावर लिहील्या गेलेल्या कथा कादंब-या ? जेजूरी आणि धनगराचा कांय संबंध?
जगात धनगरांचे कांय वैशिष्ठ्य? भारताबाहेरील धनगर समाजात एकूण लोकर प्रोडक्शन किती? Methods? धनगरांचे इतर Cultural Trends काय?
---------- ५ ---------------
गेले आठ- दहा दिवस गव्हाणे गुरूजी गडबडीत होते. शासनाच्या एका प्रमोशनल फिल्मचे शुटिंग करण्यासाठी त्यांची शाळा निवडलेली होती. विषयही त्यांना समजावून दिला होता. जेमतेम चाळीस ते साठ सेकंदाची फिल्म. पण त्याचे फुटेज मात्र मोठे द्यावे लागते. सुमारे १० मिनीटे- मग त्यातून एडीट करत करत २ मिनीटाचा रफ कट करायचा आणि त्यातुन ४० सेकंदाची फिल्म फायनल करायची. स्क्रिप्ट कुणीतरी अडाणी माणसाने लिहील्यासारखी वाटू नये म्हणून त्यांनाच त्यांच्याच शब्दात स्क्रिप्ट लिहून ठेवण्यास सांगितले होते. त्यात नंतर ते लोक हवे ते बदल करणार होते.
देशात सगळीकडेचं शालेय मुलांचे गळतीचे प्रमाण खूप आहे. मग अशी मुली-मुले पुढील शिक्षणापासुन वंचीत राहतात. यांना शाळेत परत कसे आणणार? कसे शिकवणार? एका शिक्षित व्यक्तीने एका शाळा सोडलेल्या मुली-मुलाला शिकविले तर शिक्षणातला हा खड्डा भरुन निघेल. तर मग शिक्षित व्यक्तींना कसे बरे प्रवृत्त करावे? यासाठी त्यांनी निरनिराळ्या तीन चार पध्दतींनी स्क्रिप्ट लिहावी असे सुचविण्यात आले होते. शुटींग टिम आल्यानंतर त्यांचा खास स्क्रिप्ट रायटर त्यावरून स्क्रिप्ट फायनल करणार होता. त्यानुसार गव्हाणे गुरुजींनी तीन चार पध्दतीने त्यांचे विचार मांडून ठेवले होते. पण त्यांचे समाधान होत नव्हते. आताही मुख्याध्यापकांच्या खुर्चीत बसून त्यांचे विचार तिकडेच वळत होते.
शाळा सुटल्याची घंटी वाजली तसे ते भानावर आले. त्याचा विश्वासू शिपाई मन्या आत येऊन त्यांची बँग भरण्याला मदत करु लागला. उद्या येणा-या फिल्मी पाहुण्यांसाठी मुख्य मुख्य सूचनांची गुरुजीनी पुन्हा उजळणी केली. कुणा कुणावर काय जबाबदारी टाकली आहे. ते मन्याला समजाऊन दिले. आणि बॅग हातात घेउन ते बाहेर पडले. पण आज त्यांची पावले घराकडे वळली नाहीत. जणू पावलानाही कळले होते की आज मेंदूला काहीतरी वगळे खाद्य हवे आहे- वेगळे विचार सुचायला हवे आहेत.
शाळेबाहेरचा आठवडा बाजारातली गर्दी ओसरु लागली होती. गावोगावचे विक्रीसाठी आलेले उत्पादक आणि इतर विक्रेते आपापली माल गुडाळू लागले होते. आज मंगळवार, म्हणजे त्यांना उसंत नाहीच. उद्या मोठ्या गावच्या आठवडा बाजारात तर परवा अजून पुढच्या कुठल्या तरी गावात. फक्त एक दिवस काय तो बाजूला ठेवायचा. त्या दिवशी इतर सहा दिवसांचे हिशेब पूर्ण करायचे. विक्री झालेल्या मालाच्या जागी दुसरा माल भरायचा. जे स्वतः शेतकरी होते त्यांनी घराला वर्षभर लागणारे धान्य बाजुला काढलेले असायचे. उरलेले सर्व विकुन टाकायचे. ते विकले जाईपर्यंत त्यांची आठवडा बाजारात वारी. पण शेती व्यतिरिक्त इतर मालाची विक्री करणारेही खूप असतात. - भांडी, कपडे, खेळणी, मिठाई, भाजलेले धान्य, कुरकुरीत खमंग पदार्थ, तेल, कंगवा सारख्या नित्योपयोगी वस्तू, ड्रेस इत्यादी. शिवाय खरेदी करण्यासाठी आलेले बाळगोपाळही असत. त्यांच्या तोंडाला पाणी सुटुन त्यांनी वडीलधा-यांकडे लकडा लावावा असेही पदार्थ असतात. गुळपापडी, शेवेच्या गाठी, उसाचे गु-हाळ, गरमगरम भजी, मडक्यात थंड केलेली कुल्फी मलाई, एक ना दोन. त्या विक्रेत्यांसाठी गव्हाणे गुरूजी म्हणजे कोण मोठा माणूस. काहींची मुलेही येउन जाऊन इथल्या शाळेत शिकत.
त्या सर्वांचे नमस्कार घेत घेत गुरूजी गावाबाहेरील शेतीच्या दिशेने चालू लागले. शाळेच्या पटांगणापासुन जाणारा हमरस्ता ओलांडून पलीकडे गेले की, शेताशेतातून जाणारी पायवाट लागत होती. दोन्ही कडेला बाभळी पसरलेल्या होत्या. गरजेच्या वेळी सरपणाला काट्या-कुट्या वापरता याव्यात म्हणून शेतीच्या बांधावर लावायच्या झाडांमध्ये पहिली पसंती बाभळीला. पण मधुनच एखाद्याच्या शेतात चिंच, आंबा, कडुलिंब, शिशम, करंज यासारखी दीर्घ आयुष्य लाभलेली झाडे दिसत. मध्येच एखादे न कसलेले रान असायचे. तिथे भेंड्याची झाड आणि त-हेत-हेची निरुपयोगी झुडुप उगवलेली असत. पण या तण म्हटल्या जाणा-या झुडुप आणि गवताच्या प्रजातीमधून पुढील पिढ्यांसाठी योग्य अशा औषधी व धान्याच्या प्रजाती तयार होतात असा काहीसा सिद्धांत गुरुजींनी वाचलेला होता. म्हणजे असेच म्हणायला हवे की जो भूप्रदेश जैविक विविधतेने अधिक समृध्द असेल, बिनशेतीचे तणांचे माळरानही जिथे असेल, तिथल्याच पुढल्या पिढ्यांना अन्न आणि स्वास्थ्यलाभ जास्त. चिरंतनतेच्या दिशेने सृष्टीने टाकलेले ते पाऊलच म्हणायचे. मुलांना शेतीच्या तासाला हेही शिकवायला हवे. ती फिल्म वाली मंडळी या विषयावरही छान फिल्म काढू शकतील. लिहावी का या नव्या विषयावर एक स्क्रिप्ट? गुरूजींना हसू आले. गेल्या चार दिवसातच या स्क्रिप्ट रायटरच्या नव्या भूमिकेने त्यांना एवढे भाराऊन सोडले की काय?
पायवाटेने एक छानसे वळण डाव्या बाजुला घेतले होते. अचानक गुरूजींच्या समोर मेंढ्याचा कळप येऊन भिडला. साठ- सत्तर मेंढ्या, मागे दोन कुत्रे, सर्वांच्या मागे चंदर नाणेगावचा. गव्हाणे गुरुजींनी त्याला ओळखले. गेल्या वर्षी तो याच मोसमात गावात आपल्या मेंढ्या घेऊन आला होता. त्या वेळी गावातील तीन शेतक-यांच्या जमिनीत त्याने मेंढ्या बसवल्या होत्या. ते त्याचं आपल्या गावातील पहिलं वर्ष म्हणायचं.
"राम राम गुरूजी" चंदरने ही त्यांना ओळखलं होतं, आणि दुरूनच हाकारा दिला होता.
राम राम, कसा आहेस चंदर? आणि गावाकडे कधी आलास?
हा काय आत्ताच येउन राहीलो. गेल्या वर्षी तुमच्या गावचा चांगला अनुभव होता, म्हणून या वर्षी पुन्ह्यांदा आलो.
आणि बरोबर हा छोटा पोरगा कोण?
-----------------------------------------------------------------------
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें