डोळे
माझे मिटता मिटता...
मूळ
हिंदी लेखक:
स्वामी वाहिद काझमी
मराठी अनुवाद:
लीना मेदंदळे
तो
दिवस ,
ती तारीख,
ती घटना मी विसरून
जावी हे कसे शक्य आहे?
नाहीच विसरणार,
अगदी मरेपर्यंत
,
विसरणार नाही
की एकविसाव्या शतकाकडे वेगाने
दौडणा-या
या विसाव्या शतकाच्या शहाण्णवाव्या
वर्षात पाचव्या महिन्याची
ती तेरावी तारीख होती.
वार सोमवार!
घडयाळाने
दुपारच्या बारा वाजण्याचे
ठोके जेमतेम पूर्ण केले होते.
महिन्याभरातून
क्लांत श्रांत माझे शरीर
कितीदा तरी मृत्युची कामना
आणि प्रार्थना करून आणखणीच
थकल्यामुळे आता शांत होऊन
पडले होते.
त्याचवेळी....
डोळे माझे
मिटता मिटता............
डोळे माझे मिटता मिटता......
डोळे माझे
मिटता मिटता.......
खोली अचानर एका अभूतपूर्व सुगंधाने भरून गेली .माझी सर्व ज्ञानेंद्रिये एका विलक्षण चेतनेने
पुनः प्रगल्भित होऊ लागली! म्हणून
तर पापण्या वर उचलून डोळे उघडू शकलो... आणि पहातो तर काय? माझ्यासारख्या
बंद्यांची रूढ घेऊन जाण्यासाठी अल्लाने नियुक्ती केलेला त्याचा खास फरिश्ता इजराएल
माझ्या डाव्या बाजूला तर समस्त जीवधारी प्राण्यांना मृत्यु-दा न
देण्याचे विशेष अधिष्ठान ज्यांना आहे ते स्वयं यमराज माझ्या उजव्या बाजूला
उभे होते.
तीन महिन्यांपासून बहि-या झालेल्या माझ्या कानांमध्ये पण
चैतन्य आले असल्याने त्यांचा जो संवाद मी ऐकू शकलो, तोच थोडा संपादित करून माझ्यावर अविश्वास दाखविणा-या तुम्हा
मंडळीसमोर पेश करीत आहे.
इजराएल : भाईजान, आपण दस्तुरखुद्द इतकी जहमत या नाचीज रुहेसाठी कशाला घेतली? आपल्याकडे तर मातहतांची पुरी फौज आहे, ज्यांना यमदूत म्हणतात.
यमराज: आपण सत्यवचन
बोलतात मित्रवर! पण अतिसज्जन व्यक्तिंचे प्राण घेण्यासाठी दूत नाही, तर मी
स्वतःच येत असतो.
इजराएल: बहुत बेहतर इंतजाम आहे भाईजान.
यमराज: हा जीव
फारच सज्जन होता. जेमतेम आठवीत विद्यार्थी दशेत असतानाच हा आपल्या सदभिरूचीमुळे
हिंदू धर्मशास्त्रांचे अध्ययन करू लागला.
आपल्याला माहित नसेल म्हणून सांगतो, याने सर्वप्रथम जो ग्रंथ वाचला, तो कोणीही
सामान्य कोणीही मुसलमान वाचणार नाही! तो
होता. सत्यार्थ प्रकाश ! पुढे याने
भगवतगीता, वेद, पूराण , स्मृती आदि
धर्मशास्त्र वाचले जे कोणीही
सामान्य हिददेखील वाचत नाही. हे सर्व धर्मशास्त्र अत्तराप्रमाणे याच्या तन-मनाला
सुगंधित करत असत. वर्षाभरापूर्वी याने
गीतेवर एक विवेचन आकाशवाणीवरून प्रसारित केले होते, ते ऐकून स्वतः भगवान विष्णूंनी धन्योव्दार काढले.
इजरायल: काय याद
काढलीत आपण! याची तकरीर (भाषण) आम्ही आणि
हजरत पैगम्बर आणि हजरत कृष्ण यांच्या शिकवणी मधील यकसांनित (साम्य) बचान केले
होते. याची हिंदी व ऊर्दू या दोन्ही
भाषांवल हुकूमत आहे तसेच याला हिंदी व
मुसलमान दोन्ही मजहब अजीज आहेत. आपण ऐकले
असेल की याने बुजुर्ग सूफी मंडळी
आणि दरवेशांच्या बाबात अभ्यासपूर्व असे जे कित्येक मजमून (वर्णन)
लिहिले आहेत, ते जेव्हा आम्ही
आसमानात बसून ऐकतो तेव्हा दरवेश आणि वली याच्या तारिफीचे पूल उभे करतात.
यमराज: मला सर्व ज्ञात आहे बंधू! मला हे देखील विदित
आहे की त्या सर्व परलोकवासी संत, विव्दज्जनांची कृपादृष्टी याचे सतत रक्षण करत
आहे. एरवी याचे ईर्ष्याळू परिजन आणि
तेवढेच ईर्ष्याळू विरोधी, दोघांनी मिळून याचं नख तरी शिलल्क ठेवलं असतं
का ?
इजरायल: जी हां !
याने प्रत्येक मोर्चा लढवतांना सख्त जहोजहद (जिद्द) केली. पण थकला बिचारा. आता
आपली इजाजत असेल तर याला या
दुनियाई कष्टातून निजात ( मुक्ती) द्यावी.
या नंतर दोघांनी माझे प्राण बाहेर काढले आणि एका सोनेरी
डबीत बंद करून माझ्या डोक्यावर भिंतीतल्या एका खुंटीवर ती डबी टांगून ठेवली.
नंतर अशी चर्चा करत ते बाहेर पडले
की माझ्यावर अंतिम संस्कार कोणत्या पद्धतीने व्हावेत! कारण मी
स्वतःच्या आयुष्यात हिंदू मुसलमान भेद विसरून एक आनंदी सज्जन माणूस
म्हणून जगलो. आता माझ्या अंतिम
संस्कारांच्या निमित्ताने भांडण किंवा व्देषभाव भडकू नये. यासाठी माझ्या
मित्रांना काही एक्सट्रा सुबुद्धि देणे
गरजेचे होते! त्याचीच काळजी करत दोघे
बाहेर पडले.
अचानक धाडकन दार उघडल आणि
एक बिधास युवक धडपडत आत येत
नारेबाजीच्या तार स्वरात म्हणाला. "स्वामीजी, नमस्कार..."
हा युवक नेहमी माझे डोके खायला येत असे आणि त्याच्या
प्रत्येक कृतीत अशिष्टपणा आणि निर्लज्जपणाचं
एक अजब मिश्रण असे. आजही तो आल्या आल्या धप्पकन सोफ्यामध्ये घुसला. पण आज
स्वामीजी नमस्कारच उत्तर का देत नाहीत आणि एरवी
यांना खोलीतही माशी चालत नाही .पण आज
तोंडावरच्या एक नाही चांगल्या तीन
तीन माशा हा स्वामी का उडवत नाही?
आयुष्यात
बहुधा प्रथमच त्याने आपला नैसर्गिक मठ्ठपणा झटकून काही नीट विचार केला. त्याला कळले की त्याच्या
समोरच्या खाटेवर खुद्द स्वामीजी नसून त्यांचा गतप्राण झालेला देह आहे. मग मात्र अत्यंत घाई घाई उठून वीरासारखा
तो बाहेर पळाला.
थोडयाच वेळाने
उघड्या दारातून माझ्या एका हिंदू मित्राने प्रवेश केला. त्याच्या तोंडावरील
शेपटाच्या झुबक्यासारख्या मिशा बघितल्यावर
तुम्हालाही पटेल की या पुढील
सर्व वर्णनात मी त्याला मुच्छड असं
संबोधन का करणार आहे .मी जीवंत असल्यापासूनच त्याला मुच्छड म्हणत आलो आहे. तसं
विचारलं तर तो एक डॉक्टर आहे. आत
येऊन त्याने ओठाला चिकटलेली सिगरेट काढून बाहेर फेकली आणि माझ्या त्या खुर्चीवर, जिच्यावर मी कुणालाही बसू देत नसे. आज मालकी
हक्काने स्थानापन्न झाला. तिथूनच
आपल्या डॉक्टरी नजरेने मी खरोखरोच मोला
असल्याची त्याने खात्री केली.मग उठून
माझी कपाट उघड बंद करून त्यातली पुस्तकं
तो उलटी करू लागला.
पण त्याला फार वेळ मिळाला नाही. तीनेक कपाट उघडली असतील तोच कूर्ता पायजमा
घातलेला आणि काही पांढरा तर काही काळी अशी खिचडी दाढी असलेला एक
अनोळखी प्रौढ आपल्या टकलावर हात फिरवत
दाखल झाला मुच्छडला पाहताच तोंडावर
शक्य तेवढी नाराजी आणून त्याने
विचारले," आपली तारीफ? इथे काय
म्हणून आलात?"
मुच्छडनेही डोळ्यात तेवढाच क्रोध आणून उत्तर दिले," या शहरात स्वामीजींचा मी एकमेव मित्र आहे.
"
दाढीवाल्याने फक्त एक लांब हुंकार भरला.
डॉक्टर मुच्छड पुढे म्हणाला, " हे महान साहित्यकार
होते त्यांना वारसदार कोणी नाही. पूर्ण
जीवन साहित्यसेवेला अर्पण केल्यावर त्यांची इच्छा होती की संपूर्ण सगह एखाद्या ठिकाणी सुरक्षित ठेऊन या
स्मारकाला याचं नाव द्याव खर म्हणजे मीच ही
योजना तयार करून त्यांना सुचवली होती. त्याप्रमाणे आता त्याची सर्व पुस्तकं गोळा करून घेऊन जायला
आलो आहे! त्यांच्या मिटत्या
डोळ्यादेखतचं!"
गाढिवाल्याने पाय आपटत म्हटले ." माझ नावं खलील
खॉ आहे समजल ? हे सर्व एका वेवारस
मुसलमानाच सामान आहे! कोणीही बिगर
मुस्लिम ते घेऊन जाऊ शकत नाही. तुझ्या
योजनेची ऐशीतैशी! मी मी पोलिसात वर्दी देऊनच इकडे आलो आहे.
आता गप्प गुमान इखुन फुटावे, एरवी पोलिस येताच एका मुसलमानाचा माल हडप करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुम्हाला
त्यांच्या हवाली करेन. मोठे आले एकमेव
मित्र कुठले!"
मु्च्छडच्या मिशा रागाने थरथरू लागल्या, त्याने
दरडावून सांगितले . "ए दाढीवाल्या,
जिभेवर लगाम ठेव. नाहीतर एका झापडीतच बत्तीशी बाहेर काढून देतो."
" मग माझे पम हात बांघलेले नाहीत!" दाढियलने
म्हटले. ' ' तुझ्याकडून हात तर उठू दे! इकडून असा चित्रपट करीन की जमीनीवरची धूळ
चाटत रहाशील."
तेवढयात एक नाकी डोळी , नीटस,गोरटेला नवयुवक तिथे आला. तो खरा या मुच्छड डॉक्टरचा शिष्य! त्याच्याबरोबर
माझ्याकडे येत असे. मी त्याला म्हणायचो गोरा चिकणा. त्याला जुनी पुस्तक , चित्रं, वस्तू आदिंचा संग्रह करण्याचा शौक होता. पण मुच्छडचाही डोळा माझ्या
संग्रहावर होता. हे त्याला माहित होते.
स्मारक बिरक सर्व नाम के वास्ते ! मुच्छडला माझा संग्रह स्वतःच्या
खिशात घालायचा होता. गोरा चिकण्याला ते
नको होते. त्याने कितीदा तरी मला डॉक्टर मुच्छडचे इरादे
किती वाईट आहेत ते समजावून सांगितले
होते. मी माझ्या पुस्तक
संग्रहासाठी एक मृत्युपत्र तयार
लिहून ठेवावे . त्यामध्ये अशी सुचना द्यावी की माझ्या मृत्युनंतर माझा संपूर्ण संग्रह तात्पुरती व्यवस्था म्हणून
त्याच्या चांगल्यावर रिकाम्या असलेल्या
एका मोठया खोलीत हलवावा, पुढचं पुढे बघितलं.
जाईल. असा सल्ला त्याने मला कित्येकदा दिला होता. त्यावरून त्याची नीयत देखील मला कळली होती. मात्र
मुच्छडच्या समोर त्याचे काही चालणार
नव्हते.
त्या
दिवशी बिंधासाने मला मेलेला पाहिल्यावर
आधी डॉ. गोरा चिकण्याला कळवलं होत
की स्वामीजी गेले. या जगातून! त्याचा दुसरा टप्पा डॉ मुच्छड असणार हे डॉ. गोरा
चिकण्याला माहिती होते.
दुर्दैवी दिवस! बिचारा डॉ गोरा. चिकणा सध्या आपल्या जुन्या
हवेलीला रंगरंगोटी करून नवीन बनवू पाहत
होता. ही सूचना मिळाली तेव्हा दुपारच्या उन्हात कुर्ता लुंगी लाऊन कमरोवर हात
ठोऊन तो मिस्त्रीला सूचना देत होता.
या अचानक बातमीचे काय करावे
त्याला सुचेना! त्याचा चान्स तर गेला होता आणि
मुच्छडचा चान्स शिल्लक होता. डॉ.
गोरा चिकणा तसाच निघाला आणि जवळच्या
मशिदित जाऊन खबर दिली की, अमुक मुक ठिकाणी एका बोवारस मुसलमानाची लाश
पडलेली आहे . जाऊन त्याच्या दफन बिफनाची
काही सोय करा. त्याच्या लुंगी कुर्ता आणि फ्रेचकट दाढीमुळे त्याक्षणी तो मुसलमानच वाटत
होता. सूचना देऊन तो घरी निघून आला. पण माझ्या घरात मुच्छड विरूद्ध खलील खॉ या सामन्याची वात चेतवून आला.
इकडे मुच्छडने थोडी माम-नीती वापरायचा प्रयत्न केला. " हे पहा खलील मियॉ .असेल हा माणुस मुसलमान पण
आज जवळ जवळ तीस वर्षे याने मुसलमान
समाजाशी काही संबंध ठेवला नव्हता.
याचं येण.-जाणं ,खाण पिणं आम्हा
कुलीन हिंदूबरोबरच असायचं त्याची एकही मैत्रीण देखील मुसलमान
नव्हती."
"बरं मग?" खलील खॉने भुवया उंचावल्या.
मु्च्छडने विचारले, "स्वामीजींना कधी मशीदीत जातांना
पाहिलतं?"
खलील
खॉ बिचारे चूप.
खिल्ली उडवत मुच्छडने माहिती पुरवली. त्यांनी कधी रोजे ठेवले नाहीत की, कधी नमाज पढली नाही. ते मासाहारी अन्नाला शिवतही
नसतच त्यांनी एका हिंदू संताकडून विधिवत
दीक्षा घेतली होती. एवढंच नाही तर ते हिंदू
संन्यासाप्रमाणे भगव्या
रंगाची वस्त्र धारण
करीत होते. पहा हा पुरावा. असे म्हणून
झपकन मुच्छडने एका हॉगरला
टांगलेला माझा भगवा कुर्ता काढून खलील खॉ
समोर नाचवला." हा भगवा कुर्ता
त्यांचा अतिप्रिय होता.! आणि हो,
गेल्या ईदच्या सणाला मीच
तो खादी भंडार मधून विकत घेऊन त्यांना भेट दिला होता." असं म्हणून मुच्छडने एक गर्विष्ठ नजर माझ्याकडे व खलील खॉकडे टाकली आणि एक संस्कृत श्लोक अशुद्ध उच्चाराने म्हणतो तो कुर्ता अशा त-हेने माझ्या देहावर पसरला.की जणू पुष्पमालाच अर्पण
करीत आहे. मग एक सिगरेट पेटवून
झुरका घेत म्हणाला,
"स्वामीजींनी आयुष्यभर आमच्या भाषेत साहित्य रचना केली. उर्दू
मध्ये त्यांनी न काही लिहील न
काही छापलं! आता त्यांच उचित स्मारक
आमच्या भाषेतच होईल."
खलील खॉ ने धैर्य व संयमाचे
ढोंग करत इकडच्या गालातील पानाचा तोबरा तिकडल्या गालफडात सरकवला. कावळ्याच्या नजरेने खोलीत शोध
घेत घेत ते उद्गारले,"हे आम्हाला पण
माहीत आहे की मियॉं काजमी हे कधी नमाज, रोजे, या गोष्टींना महत्व देत नसत.
ईद-बकरीच्या सणाला पम ते आमच्या मशादीत येत नसत. मौला-मुल्लांनाते काहीच मानत नसत
त्यांना अंधश्रद्धाळू म्हणत. पण म्हणून काय झालं? आखिर होते ते मुसलमानच! अस्सल सय्यद खानदानाचे होते. स्वामी हे
उपनाम त्यांनी धारण केल खरं पण स्वतःची
ओळख तर सोडली नाही ना? नाव तर वहिद
काजमी हेच राहू दिलं.? काही शुद्धी तर करवली नाही? कधी मंदिरात गेले नाही , किंवा कधी मुर्तीपूजा केली नाही., किंवा त्याला
पाठिंबा दिला नाही."
डॉक्टर मुच्छडने मध्येच कांही
बोलायला तोंड उघडल तर त्याला
हाताच्या इशा-याने अडवत खलीलखॉ
बोलले, " मी मानतो की, हा माणूस इस्लामच्या रस्त्यावरून भटकलेला
एक वाटसरू होता. पण आम्हाला. त्यांच काय? त्याचा हिशोब ठिशोब अल्ला ठेवील! आता रहाता
राहिला मुद्दा त्याच्या वेषभूषेचा,तर जरा
मग जरा इकडे गौर करा" असं म्हणत
खलील खॉ ने एका हॅगरवरून माझा एक पांढरा
स्वच्छ पायघोळ अरबी ड्रेस
काढलाआणि तो मुच्छडच्या समोर नाचवर
म्हणाले, " हा काजमी पांढरे
शुभ्र कपडे पण घालत असे यो सुफी आणि
दरवेशांचा रंग मानला जातो. आता
गंगाकोण्या हिंदू दोस्ताने हा ड्रेस त्य़ांना घेऊन दिला
होता?" असं म्हणत त्यांनी कुरआने मधील एक आयत उच्च स्वराने म्हणत तो पांढरा ड्रेस माझ्या देहावर पसरला.
"खलील खॉ-" मु्च्छड मनातल्या
मनात मर्मातक शब्दांची जुळवाजुळव करून म्हणाला, अरे, जिता होता. तो
पर्यंत कधी या माणसाची विचारपूस केली नाही- एक फाटकी चिंधी कोणा आणून
दिली नाही . आता हा
मेल्याबरोबर याचे सर्व सामान हडपण्याची तयारी करू लागलेत, बेशर्म कुठचे!"
" यात बेशर्मी कसची. हे तर आमचे
कर्तव्यच आहे. कसेही वागले तरी मरहूम वाहिद काजमी आमचे भाऊबंद नाराज होते. ते आपल्याच भाईबंदावर नाराज होते म्हणून काय पाण्याची धार वेगळी होती. की
चामडीपासून मांस वेगळ होत.? आता फाटक्या
चिंधीबद्द्ल म्हणाल तर आम्हाल
मनापासून अफसोस आहे की एवढया
नामी गिरमी लेखकाची
कोणतीच कदर आम्ही
त्यांच्या जिवंतपणी करू शकलो. नाही पण म्हणून काय मेल्यावर
आम्ही त्यांना टाकून
देऊ शकतो? आता पहात
रहा- शुभ्र टेरीकॉटचे
इम्पोर्टेड चौवीस वार कापड
मागवून यांचं कफन
तैयार करू. त्यावर थेट मक्का मदीनाहून आणलेले
पाक रूमाल चढवू मिरवणुकीसहीत त्यांचा
सामानातील एक सुई देखील , कोण्या गैर
मुस्लिमाच्या हाती लागू देणार नाही. "
मुच्छडसाठी ही लढाई निकराची
ठरू लागली होती. सांप्रदायिकतेच्या मुद्यावर तो मात खाऊ शकत होता. त्वेषाने म्हणाला,
"हू: म्हणे भाईबंद! हा तुमचा भाईबंद आजारपणात, गरीबीत झिजून
झिजून मेला तेव्हा कुणी तोंडाला पाणी टाकायला नाही आलं. स्वतःच्या
तोंडाने, पण बोलावं लागतयं की गेल्या
तीन महिन्यांपासून यांची दवा दारू
मीच करत होतो..बिलकूल फुकट! अरे, दोस्तीसाठी पैशाची
पर्वा करणा-यांपैकी नाही आम्ही, पण
कोणी आमच्या समोर सुईची बात काढली तर सांगून ठेवतो. औषधाचा सगळा खर्च वसूल, केल्याशिवाय जनाजा उचलू
देणार नाही"
' ' ओ , हो, हो, तर आपणच त्यांचा
इलाज केला होता वाटतं या आजारपणात? म्हणूनच हे इतक्या लौकर अल्लाचे प्यारे झाले! असो,
साहेब, त्यांनी कळवलं असतं आम्हाला तर सर्व काही सोडून हजर झालो असतो. त्यांची
खिदमत केली. असती. पण काय करावं?
थोडा त्यांचा हटट तर थोडी आमंची गलफत!
आता जे झालं ! आता बघत रहा
त्यांच्या चाळीसाव्या दिवसाला
फतिहा समारंभासाठी आम्हा शादी पुलावाचाच
बेत ठेऊ! तुम्ही पण यावे समारंभाला! असा पुलाव कुठे खायला मिळणार नाही तुम्हांला!"
एव्हाना पाच सात हिंदू
बंधू आणि तेवढेच
मुसलमान बिरादर येऊन धडकले होते.
मुच्छड आणि दढियलला आपपला लीडर
मानून ते त्यांच्या तोंडाकडे अशा श्रद्धेने पहात होते
जणू कांही अल्लाउद्दीनचे जिन्नच .
डॉक्टर
मुच्छड खलील खॉंच्या धबधब्यापुढेगप्प झाले होते.
पण कृतीशीलता हरवलेली नव्हती. त्यांनी
एक कपाट उघडलं. त्यात व्यवस्थित
रचून ठेवलेल्या माझ्या पुस्तकांपैकी जागोजागची
पाच पुस्कतं काढली आणि पानं उघडून
दाखवत बोलले."पहा, पहा, एकूण
एक पुस्तक आमच्या
भाषेमधून आहे. ते वाचणे तुझ्यासारख्या माणसाला काला अक्षर
भैस बराबर आहे. अशा निरक्षर अशिक्षितांच्या हाती
स्वामीजीचा संग्रह मी कदापी लागू
देणार नाही."
खलील
खॉं गडबडले पण त्यांची बुद्धी शाबूत होती.
काही तरी वाटून त्यांनी
दुसरं एक कपाट उघडलं, त्यातील
एक छोटीशी पुस्तिका त्यांनी उचलली
त्यामधे कुरआन शरीफ मधले
निवडक आयात होते. आदरपूर्वक
त्या पुस्तिकेचे चुंबन घेऊन
म्हणाले. " तुमच्या विव्दान पंडितांना पण ही भाषा
समजणार नाही. अशी पाकीज पुस्तक मीपण कुण्या गैर मुस्लिमाच्या हाती लागू देणार नाही"
मुच्छडने खाऊ की गिळू अशा
नजरेने दाढियलकडे पाहिले.
दाढियलने कुठून कसा चावायला
घेऊ अशा नजरेने मुच्छड गरजले-
"
पहाता काय? उचला सर्व सामान , पाहू कोण
मला काय करतो."
खलील
खॉंने आपल्या साथीदारांना ललारलं- " अडवा याना! पाहू या तरी आपल्या
देखत कसा कोणी मूर्ख
गैरइस्लामी एका मुसलमानाच्या संपंत्तीवर
कब्जा करतो."
आता
दोन्हींकडून माझ्या सामानाची उठापटक आणि
पळवापळवी सुरू झाली. ज्याच्या हाती जे
लागले. तो ते उचलत होता, आणि बाहेर
ओटयावर ठेवत होता. कुणी गादी उचलली तर कुणी रिकामा होल्डडॉल,कुणी सोफा
ओढलातर कुणी खुर्ची एकाने टेबल
फॅन घेतला. एकाने टेबल लॅम्प, तर
तिस-याने टेबल क्लॅथच माझी पेटी
उघडून त्यातले कपडे , भांडी ही देखील बाहेर गेली. एका ग्रुपकडे माझा जाव्या पायाचा बूट होता तर उजव्या
पायाच दिस-या ग्रुपकडे . ओट्यावर
दोन ढिगा-यांच्या स्वरूपात माझ्या
सामानाचे विभाजन झाले होते. कुणी तरी
शहानेपणा करून मधे एक खडूची
रेघ पण मारली होती. दोन्ही बाजूंना दोन दोन
लाठीधारांनी आपली पोझिशन घेऊन
ठेवली होती.
सर्वात जासत दुर्दशा माझ्या पुस्तकाची
झाली होती. सगळी कपाटं भिंतीतील
असल्यामुळे ती वाचली पण पुस्तकं मात्र ओढाताणीत फाटू लागली. , कुणाची
कव्हर्स ! माझ्या कित्येक
चांगल्या चित्रांना मठ्ठपमे टरकवण्यात
आले.
मधेच
एकदा डॉ. गोरा चिकणा या सर्व स्थितीचा अंदाज घेण्यासाठी आला.
पण आपलं इथं काहीच चालणार नाही हे उमजून तसाच परत गेला. आणि टिपिकल बुद्घिवाद्याप्रमाणे घरी जाऊन उदासपणाने चादर
पांघरून झोपी गेला.
डबीत बंद
माझे प्राण तडफडत होते, आक्रोश करीत होते.
माझ्या सामानाची , त्यापेक्षा माझ्या पुस्तकांची व परिश्रंपूर्वक पैसे साठवून
खरेदी केलेल्या चित्रांची
गत बघवत नव्हती.त्यांचे अजून काय हाल होणार होते? तेवढयात एक रूबाबदार
व्यक्ती तेथे आली त्यांना पाहताच डॉ मु्च्छड आणि
खलील खॉ चमकले, आणि त्यांना अभिवादन
केले. ते गृहस्थ सिटी मॅजिस्ट्रेट
होते आणि बदली होऊन इथे येण्यापूर्वीच माझे वाचक
आणि प्रशासक होते. इथे आल्यावर
मुद्दाम ओळख करून घेऊन
अधूनमधून माझ्याकडे साहित्यिक, आणि धार्मिक गप्पांसाठी येत असत. त्यांनी हातातला पुष्पहार माझ्या
देहावर ठेवला आणि नमस्कार करून दोघांना म्हणाले-
"स्वामीजींचा देहान्त झाल्याची
बातमी जिल्हा प्रशासनाच्या कानावर
गेली आहे. यांच्या अंतिम
संस्काराबद्दल दंगल होण्याची शक्यता आहे
म्हणूनच मी इथे आता पोलिसांना
बोलावून घेतल आहे. यांचा देह ते
आपल्या ताब्यात घेतील आणि या खोलीला सील
ठोकण्यात येईल. पुढे काय करायच ते नंतर ठरवलं जाईल. तोपर्यंत तुम्ही
दोन्ही गटांनी शांतता राखावी, हे
उत्तम!" असे म्हणून ते बाहेर पडले सुद्धा.
त्यांच्या बरोबर आलेले पत्रकार मात्र तिथेच रेंगाळले. दंगल दंगल झालीच तर तिचे छायाचित्र टिपायला ते थांबले होते. त्यातलाच एक ऑप्रेटिंस माझ्या फडाफडा
झालेल्या पुस्तकांचा फोटो घेण्यासाठी आपल्या फोटोग्राफरला आग्रह करू लागला. तर त्यांच्या ज्येष्ठांनी
त्यांना अडवले,
"हा स्वामीजी स्वतःला फार
मोठा समजत असे! पत्रकार तर
त्याच्या दृष्टीने कोणीच नव्हते, कधी गेला कुणाकडे ? कधी
सांगितल कुणाला आपले दुःख? अरे, आमच्याकडे आला असता, आमची मदत मागितली असती, तर याच्या पुस्तकांना पुरस्कार
मिळवून दिला असता! याच्या
आजारपणात मेडिकल ग्रॅंट व अंतिम संस्कारासाठी
इतमाम मिळवून दिला असता! पण स्वतःला मोठा साहित्यकार समजत असे आणि
आमच्या लेखनाला तुच्छं पहा म्हणावं आता
फळं आपल्या एकलकोंडेपणाची!"
त्याच्या
उपरोधिक हसण्यामधे इतर पत्रकारांनी
आपला हा:हा : मिसळला
विशेष काही घडत नाहीसे पाहून
हळूहळू त्यांनी व इतर बघ्यांनी काढता पाय घेतला.
माझ्या
प्राणांची तडफड चालूच होती. शरीराचीही दुर्दशा होऊ लागली होती. डोळे अजून उघडेच
होते. त्यावर माशा बसल्या होत्या त्या नाकाकडे पण वळल्या होत्या! कुठून तरी मुंग्यांना पण या नरम गरम प्रेताची चाहूल लागून त्यांनी पण
रांगा लावायला सुरूवात केली होती.
पण मला त्याची पर्वा नव्हती. माझी
पुस्तकं , माझी पुस्तकं....
तेवढयात
कोप-यात पडलेल्या एका पुस्तकावर नजर पडून
मुच्छडने ते उचायला व दढिलने ते
हिसकवण्याला एकच गाठ पडली. पुस्तकाचे अक्षरशः
दोन तुकडे झाले. माझ्या
प्राणांची तळमळ आणि बंद सोनेरी डबीतले
त्याचे आंदोलन इतके वाढले की, डबी
अचानक उघडली! तेवढयातच कुठून तरी
गार वा-याचा झोत खोलीत शिरला
,त्याच्या वेगाने माझ्या प्राणांना धक्का मिळून माझे
प्राण थेट माझ्या नाकपुडीतच
शिरले.
शरीरात
प्राण शिरताच नसानसातून उत्साह सळसळाला. मला एक शिंक येऊन मी उठून
बसलो. माझ्या रोगी शरीरात
कुठून तरी सुप्त शक्तीचा संचार
झाला! आता मी या जगात
कोणालाही तोंड देऊ शकत होतो.
माझ्या
शिंकेचा आवाज तिथल्या उपस्थितांना
बॉम्ब विस्फोटाच्या तोडीचा
वाटला असेल. मुच्छड आणि खलील खॉ
डोळे फाडून फाडून माझ्याकडे पहात
राहिले. मग एकमेकांकडे सरकले! खलीलखॉ म्हणाला, "भूत !"
मुच्छड
जोरजोरात " भीमरूपी महारूद्र..." म्हणत होता.
खलील
खॉ ने पण कुरआनातील आयत
सुरू केली.
मी
दोघांवर ओरडलो-
"शैतानाच्या अवलादीनो, माझं, अजून प्रेत उचललं नाही तोच मी तीळ तीळ
करून जोडलेली माझी संपत्ती हडपायला
तुम्ही सुरवात केली."
दोघेही
गप्प! एव्हाना त्यांनी एकमेकांचे
हात हातात घेतले होते.
मी पुढे
बोलत राहिलो-
"
जातीयवाद्यांनो ! तुम्ही माझ्या प्रेताला
पण हिंदू -मुसलमानाची लेबल लावली.
सगळे
सोडून मी चांगला प्रामाणिक माणूस
म्हणून जगण्याचा प्रयत्न केला
. धर्माच्या शिकविणीप्रमाणे फक्त स्वकष्टाची भाकरीच खायची असा नियम कळला!
तसाच मी मेलो आणि माझ्या
कष्टाच्या कमाईचे काय हे चीज तुम्ही केले
? आता चालते व्हा इथून."
एव्हाना दोघांनी एकमेकांच्या
बाहेत बाह्या टाकल्या होत्या . जणू
अत्यंत जिगरी दोस्तच! त्यांना आता कोणी पाहिलं
असतं तर विश्वास पटला नसता
की पांचच मिनिटापूर्वी ही दोघं
एकमेकांवर कुत्र्यांसारखी भुंकत होती
आणि सापासारखी फुत्कारत होती.
डॉक्टर मुच्छडने त्याही भयंकर अवस्थेत नर्मी दाखवत विचारलं,
"स्वामीजी तुमची तब्येत ठीक
आहे ना?"
खलील खॉ ने पण विचारलं ,
"काजमी साहेब, आता हालत सुधारली
का?"
"गेट आऊट," मी ओरडलो,
"एक मिनिच कुणी थांबल तर गठडी
वळून टाकीन मी त्याची."
दोघांच्या समर्थकांनी पळ काढला .
डॉ.
मुच्छड आणि खलील खॉ एकमेकांच्या गळ्यात
गळा घालून बाहेर पडले . त्यांचे शब्द
माझ्या कानात य़ेऊन धडकले.
"पाहिलतं खलील मियॉ, काय
बेशरम माणूस आहे. अरे, चांगला मेलेला असताना जिवंत झाला.
त्याच्या
सुरात सूर मिसळून खलील खॉ पण म्हणाला-
"
पहा ना डॉक्टर साहेब, कधी अस ऐकल किंवा पाहिलय की पुस्तकांच्या मोहाने , मेलेला जिवंत झाला? आपण यांच्या पुस्तकांची काळजी घेणार नव्हतो ? लोभी, दरिद्री मेला!"
आणि हो!
दुस-या दिवशी सर्व स्थानिक पेपरांमध्ये
माझ्या दुःखद मृत्यूची बातमी छापली होती.
-------------------------------------------------------------------
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें