शनिवार, 25 दिसंबर 2010

अनुवादाचे उपकारी कार्य --नित्य लीला

अनुवादाचे उपकारी कार्य
27 Sep, 2003, 2344 hrs IST
देशी भाषा जाणणाऱ्या सराईत अनुवादकांची आपल्याकडे एक फळी होती. रा. भि. जोशी , शं. बा. शास्त्री , सरोजिनी कमतूनकर , श्रीपाद जोशी , वा. रा. कान्त , हे त्या आखाड्यातले रथी कालांतराने अस्ताला गेले. शारदेची कृपा झाली आणि सरस अनुवादकांची पलटणच गेल्या 25 वर्षांत उदयाला आली. अशोक शहाणे , राम पंडित , आनंद वटीर् , अरविंद कोरबा , मीना वांगीकर , न. म. जोशी , धनश्ाी हळबे , विलास गिते , चंदकांत भोंजाळ , उमा कुलकणीर् , मृणालिनी गडकरी ही त्यातली काही गुणवंत नावं. या यादीत आता दोन नावं मिळवली पाहिजेत. एक आहेत सोलापूरचे कवी लक्ष्मीनारायण बोल्ली आणि दुसऱ्या आहेत भारतीय प्रशासन सेवेतल्या अधिकारी लीना मेहेंदळे. बोल्लींची मातृभाषा तेलुगू असून त्यांनी एकवीस कीतिर्वंत तेलुगु कथा घरगुती मराठीत भाषांतरित केल्या आहेत. शीर्षक : ' रात्र- एका होडीतली ' प्रकाशक : सुविद्या प्रकाशन , उत्तर कसबा , सोलापूर- 7, प्रस्तावना- विजय तेंडुलकराची. मामिर्क नि जेवढ्यास तेवढी. या 21 तेलुगु कथाकारांपैकी एकही नाव आपल्या परिचयाचं नाही. मात्र कथांमधून व्यक्त झालेलं वास्तव अगदी आपल्यासारखंच आहे.

अनुवादित कथांच्या दुसऱ्या संग्रहाचं शीर्षक आहे : नित्य-लीला. लीना मेहेंदळेंच्या या संग्रहाचे प्रकाशक आहेत : देशमुख आणि कंपनी , पुणे- 30. सिद्धार्थ पारसनीस यांचं मुखपृष्ठ घरंदाज आहे. रंगमेळ विलोभनीय. संग्रहात 11 अनुवादित गोष्टी- मुख्यत: हिंदीतल्या आहेत. दोन स्वतंत्र कथा लीना मेहेंदळेंच्या आहेत. फणीश्वरनाथ रेणू हे लढाऊ बाण्याचे हिंदी कथाकार. या संग्रहातली ' नित्य-लीला ' ही त्यांची कथा मात्र कृष्णचरित्रातली एक कोमल छटा चित्रित करते. ' बायकाच त्या ' ही सुधा अरोरा यांची कथा उपरोधिक आणि मामिर्क आहे. लेखिकेच्या स्वतंत्र कथा वाचनीय आहेत.

ठिबकसिंचन , जैविक खतं वगैरे शेतीशी निगडित उद्योग विधायक नजरेने चालवणारे जळगावचे भवरलाल जैन यांचं , देशाच्या नि समाजाच्या विधायक बांधणीचा साधकबाधक विचार मांडणारं पुस्तक ' ग्रंथाली ' ने ' ज्ञानयज्ञ ' योजनेत प्रकाशित केलं आहे. शीर्षक : आजची समाजररचना : तिचे स्वरूप व पुनर्बांधणी. समाजात सध्या मूल्यभावनेची घसरगुंडी सुरू आहे , भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचा रुदावतार मोकाट सुटला आहे , त्याचं मुख्य कारण म्हणजे राज्यर्कत्यांना साधनशुचितेचं महत्त्व वाटेनासं झालं हे आहे. ही अवस्था निपटून त्या ठिकाणी गतिशील आणि प्रभावशील समाजनिर्माण करण्यासाठी कोणत्या आमूलाग्र सुधारणा झाल्या पाहिजेत , ते जैनांनी सांगितलं आहे. साठ वर्षांवरील कुणीही निवडणूक लढवू नये , म्हणजे 65 व्या वषीर् सगळे आपोआप निवृत्त होतील , असा एक मार्ग जैन सांगतात. कर्जउभारणी , चलननिमिर्ती , करमर्यादा , प्रशासकीय खर्चात कपात वगैरे उपाय त्यांनी सुचवले आहेत. तथापि राजसत्तेच्या सुकाणूवर बसलेले निर्लज्ज पुढारी विधायक विचारवंतांचं बारसं जेवलेले असतात , ते असल्या सूचनांकडे उपेक्षेनेच पाहणार , ही दगडावरची रेष!
- रवींद पिंगे

गुरुवार, 15 अप्रैल 2010

Flap matter एक शहर मेले त्याची गोष्ट कथासंग्रहासाठी flap matter

एक शहर मेले त्याची गोष्ट flap matter

श्रीमती लीना मेहेंदळे ह्या एक कुशल प्रशासक, जागरूक विचारवंत आणि हिंदी व मराठी भाषेतील सिध्दहस्त लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे लेखनाचे विविध विषय आहेत राष्ट्र चिंतन, प्रशासन, समाज, बाल साहित्य, स्त्री-विचार, निसर्ग, ऊर्जा, विज्ञान आणि आयुर्वेद. आधुनिक भारतीय लेखकांच्या यादीत त्यांचे लेखन एक विशेष स्थानाचे मानले जाईल. महाराष्ट्रात जन्मलेल्या पण बिहारमध्ये शिकलेल्या व मोठ्या झालेल्या श्रीमती मेहेंदळे यांना संस्कृत तथा अन्य कित्येक भारतीय भाषांचे ज्ञान आहे. त्या एक उत्तम वाचक आहेत सोबत भाषांतर कलेतही त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यामुळे भाषांतरामधे त्यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे.

मेहेंदळे यांनी आजपर्यंत चारशेपेक्षाही अधिक समाज प्रबोधनावर लेख लिहिलेले आहेत. त्या एक उत्तम वक्ता असून जनसामान्यांपुढे वेळोवेळी प्रशासन संदर्भात त्यांनी शंभरपेक्षाही अधिक भाषण दिलेली आहेत. मराठी वृत्तपत्रात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, गांवकरी व हिंदी वृत्तपत्रात नभाटा, जनसत्ता, हिंन्दुस्तान, महानगर, प्रभात खबर, देशबन्धु आणि मासिक पत्रिकांमध्ये अंतर्नाद साप्ताहिक सकाळ, कथादेश, इंद्रप्रस्थ, अक्षरपर्व, समकालीन साहित्य, बालभारती, देवपुत्र, नंदन, स्नेह इत्यादि मध्ये अविरत लेखन करीत आहेत.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवि श्री. कुसुमाग्रज यांच्या 108 कवितांचे सुंदर आणि समर्थ भाषांतर मेहेंदळे यांनी केलेले आहे. त्या व इतर अनेक कवितांचे हिंदी व मराठी भाषांतर त्यांच्या वेबसाईटव ब्लॉग वर उपलब्ध आहे.

आज हिंदी भाषेबरोबरच सर्व भारतीय भाषा इंग्रजी भाषेच्या तुलनेत मागे पडलेल्या आहेत. त्यांना पुढे कसे आणता येईल यासाठी संगणकाच्या सुविधांबाबत श्रीमती मेहेंदळे ठोस उपाययोजना करीत आहेत. त्यांनी ऊर्जा व सुरक्षा या विषयावर तीन वर्षे चाललेल्या बूँद बँूद की बात (रेडिओ) आणि खेल खेल में बदलो दुनिया (दूरदर्शन) या साप्ताहिक मालिकांचे आयोजन व संपादन केले. त्या आकाशवाणी व दूरदर्शनवर ब-याच कार्यक्रमांत नियमित सहभागी असतात.

त्यांच्या बहुविध प्रतिभेचे दर्शन व लेखनातील वेगळेपणा त्यांच्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या वीस पुस्तकातून प्रत्ययाला येतो.

एक शहर मेले त्याची गोष्ट हा त्यांच्या भाषांतरित कथांचा (कांही कथा त्यांच्या) दुसरा संग्रह आहे.