रविवार, 14 फ़रवरी 2021

असिमोव्ह- प्रोफेशनल (थोडेसे) Issac Asimov

मधूनच सुरू झाले 

..........अधिकार वाटत होता आणि इतर कुठलही व्यवसाय तुलनेने जरा तरी कमी प्रतीचा वाटायचा. जगाच्या पाठीवर कुठेही धातूंना तोटा नाही. त्याची वेगवेगळी परीक्षण करण आणि त्यांचे वेगळे गुणधर्म तपासण हे किती मजेच काम आहे. म्प्यूटर प्रोग्रॅमर काय करणार, एखाद्या मैलभर लांबीच्या कम्प्यूटरच्या एका छोट्याशा कोडाजवळ दिवसे दिवस बसून डाटा फीडींग करत राहणार.”

सतरा वर्षाचा असून सुध्दा जॉर्ज जास्त व्यावहारिक होता. “दरवर्षी निदान दहा लाख मुल तरी मेटॅलर्जी मधे जातात.”

“ कारण हा व्यावसायच तसा आहे. सगळ्यात चांगला.”

पण तिथे तू दहा लाखातला एक असणार. रांगेत लांब कुठेतरी. कुठल्याही ग्रहावरचे सरकार स्वत:च्या शैक्षणिक टेप्स वापरून स्वत:चे मेटॅलर्जिस्ट निर्माण करू शकते. पृथ्वीवर जी थोडीफार नवीन मॉडेल्स बनवली जातात त्याच्यासाठी फार मोठी बाजारपेठ नाहीये. मुख्य बाजारपेठ लहान ग्रहांवरच आहे. ए रेटिंगच्या ग्रहांसाठी तुला घेतल जाण्याची शक्यता किती आहे? आकडेवारी पाहिली तर फक्त १३.३ टक्के म्हणजे आठातला एकच तिकडे जाऊ शकतो. कदाचित तुला पृथ्वीवरच रहाव लागेल.ती शक्यता चार टक्के आहे.

ट्रेवेलन आदर्शवाद दाखवत म्हणाला - ठिक आहे. पृथ्वीवर रहाण देखील सन्माननीय आहे. इथेही चांगल्या मेटॅलर्जिस्टची गरज आहे. आजोबा पण पृथ्वीवरच राहिले होते.

जॉर्जचे वडील, आणि इतर पूर्वज पृथ्वीवरच राहिले होते. त्यामुळे त्याने ---  मिळायच्या सुरांत म्हटले - मला कुणाच्या बुद्धीचा अधिक्षेप करायचा नाही. तरी पण एखाद्या ए ग्रेडच्या ग्रहावर रहायला मिळाल तर बर की नाही? आता प्रोग्रामर्सचा बघ. ए क्लास ग्रहांवर नवे- नवे कम्प्युटर्स येत रहाणार आणि त्यांना चांगल्या प्रोग्रॅमर्सची गरज भासत राहणार. प्रोग्रॅमर शिक्षणाच्या स्टेप्सही कमी आणि गुंतागुंतीच्या आहेत. त्यामुळे खूप मुल त्यांना सूटही होत नाहीत. त्यांच गणितही मी बघितलय. साधारण दहा लाख मुलांमधून एखादा फर्स्ट क्लास कम्प्युटर प्रोग्रामर निघतो. त्यांच्या ए क्लास ग्रहांना त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने जेवढे प्रोग्रॅमर्स तिथल्या तिथे मिळत असतील, त्याहून जास्त लागतात. मग ते पृथ्वीवरच येतात.

तूला सांगू गेल्या वर्षी पृथ्वीवरचे किती रजिस्टर्ड कम्प्युटर प्रोग्रामर्स ए- ग्रेड च्या ग्रहांवर गेले? अगदी शेवटच्या सकट सगळे. कळल महाराज ?

ट्रेवेलनचा चेहरा पडला. पण लगेच उजळला - जर दहा लाखातला एखादा मुलगाच कम्प्युटर प्रोग्रामिंगसाठी योग्य ठरत असेल तर तू योग्य ठरशील कशावरून?

मी योग्य ठरेन. जार्जने सावधपणाने म्हटले. जॉर्जने हे गुपित जपून ठेवल होत. ट्रेवेलन काय , आपल्या आई वडिलांना देखील त्याने सांगितल नव्हत की त्याला आपण योग्य ठरू अस कां वाटत होतं ( आता इथे त्याच आठवणी त्याला सगळ्यांत त्रासदायक ठरत होत्या.) पण एखादा अठरा वर्षाचा मुलगा ज्या आत्मविश्वासाने भारला जाऊ शकतो तसाच तो तेंव्हा होता - त्याच्या शिक्षण दिवसाच्या आधी.

त्याला आपण साक्षरता - दिवस आठवला, त्या आठवणी किती सुखावह होत्या. मुळात तो बालपणाचा काळ होता. वयाच्या आठव्या वर्षी मुलं खूप वेगळी असतात. आदल्या दिवसापर्यंत ती निरक्षर असतात. आणि एका दिवसात, एका झटक्यांत ती साक्षर होतात. रात्र संपून झपकन् सूर्य उगवावा तशी.

शिवाय त्या दिवसानंतर लगेचच कांही होणार नसत. तुम्ही अठरा वर्षांचे आणि नोकरीस पात्र नसता. तुम्हाला नेमून घ्यायला एजंटांची धापवळ नसते. तुम्हाला पुढे येणाऱ्या ऑलिम्पिक दिवसांची तयारी करायची नसते. तुम्हाला सरळ घरी यायच असत पुढच्या दहा वर्षांसाठी एक नवीन कौशल्य मिळवून.

त्याला त्याचा साक्षरता दिवस बऱ्यापैकी आठवत होता. सप्टेंबरची कुठलीशी पावसाळी सकाळ (त्याला नर्सरीत शिकलेली कविता आठवणी -- एक सप्टेंबर साक्षरता दिवस- एक नोव्हेंबर शिक्षण दिवस – एक मे ऑलिम्पिक दिवस) त्याचे आईवडील जास्त उत्साही दिसत होते. त्याचे वडील रजिस्टर्ड प्लंबर होते आणि आपल्याला पृथ्वीवरच रहाव लागल याच त्यांना वैषम्य होत. तस पाहिल तर अजूनही ब्रम्हांडातील सगळ्या ग्रहांवर मिळून जेवढी लोकवस्ती होती त्यापेक्षा जास्त पृथ्वीवरची लोकसंख्या होती. प्रत्येकाला आयुष्यातला कांही काळ पृथ्वीवर काढावाच लागत होता. तरी दुसऱ्या ग्रहांवर जायला न मिळण याच शल्य टोचत असणारच. सर्व ग्रहांच्या लोकांना आढावा घेतला तर अजूनही सर्व शेतकरी पृथ्वीवरच रहात होते. तसेच बरेचसे खाण कामगार आणि इतर तंत्रज्ञ पण. फक्त खूप वरिष्ठ दर्जाचे आणि स्पेशलायझेशन असलेले नागरिकच इतर ग्रहांवर जाऊ शकत असत. पृथ्वीवरच्या दहा अब्ज लोकसंख्येपैकी दरवर्षी फक्त दहा ते वीस लाख मुल- मुली बाहेरच्या ग्रहांवर जाऊ शकत होती.

तरी प्रत्येक आई बापाची इच्छा असे की निदान आपल्या मुलाबाळांनी तरी परग्रहावर जाव . जॉर्जचे आईवडील याला अपवाद कसे असतील? जॉर्ज इतरांपेक्षा खुप हुशार, तल्लख बुद्धीचा आहे हे कुणालाही कळू शकत होत. त्यात तो त्यांच एकुलत एक अपत्य होत. त्याला परग्रहावर जायला मिळाल नाही तर त्यांना पुढच्या पिढीपर्यंत वाट बघावी लागली असती