Marathi and Hindi Complete
अरूप रूप
अंघोळ आटोपुन
अब्दुल मुनीम आरशासमोर येऊन उभे राहिले . केसांच्या मध्यभागी नीटसा भांग
पाडून केसांवर शेवटचा हात फिरविताना कुठुनसा एक क्षीण आवाज कानावर पडला , ओ मुनीम
खिडकीचा पडदा बाजुला सारून पाहिल . कुणीच दिसल नाही . सकाळचं कोवळ सोनेरी ऊन दूरवर पसरल होत. दोन गुबदुल
भारव्दाज हळुहळू पावलं टाकत जास्वंदीच्या कुंपणाच्या जवळपास हिंडत होते .
त्यांच्या अंगणात रोज सकाळी ही जोडी
येते ,किडे -मुंग्या-सरडे शोधत.
अब्दुस मुनीम
बाहेरच्या ओट्यावर आले . छे कोणीच नाही माजघराच्या दारातुन रुकय्यान आठवण करून दिली . चचाजान तुमचं पान लावुन ठेवलयं .
तेवढयात मुनीमच लक्ष गेल . अंगणाच्या उजव्या कोप-यात कवठी चाफ्याखाली बसुन हरीभाऊ
हळूहळू हाका मारत होते .... ओ मुनीम भाई ,हातातल्या कंगवा कोनाड्यात टाकुन मुनीम
धावतच आले . ब-याच दिवसांच्या आजारपणातुन उठलेत हरिभाऊ . घशातुन अजुन घऱघऱ आवाज
निघताहेत ,पण स्वारी खुष दिसतेय .अंगातल्या बंडीचा खिसा पण फुगलेला आहे.त्यात
हरिभाऊची तपकिरीची डबी , खोकल्याची उबळ थांबवण्यासाठी ज्येष्ठमध ,शिवाय जुना चष्मा
असणारच. त्यांची दांडी खिशाबाहेर डोकावत होती .मळकं धोतर ,अनवाणी . डोक्यावर
खुरटलेले पांढरे केस न विंचरल्यामुळे उभेच राहीले होते . पुन्हा एकदा हाक मारली
,मुनीमभाई हो ,तेवढ्यात गळयातुन घऱघऱ पण ऐकू येऊ लागली . रूकय्यान आतुनच ओरडून सांगितलं ,त्यांना सांगा इकडे -तिकडे थुंकु
नका बागेत .हरिभाऊने खिशातुन एक मोठ पान बाहेर काढल . म्हतारा हो पण खिशात ठेवतो
वाटत त्या पानावर थुंकुन घडी करून एका दगडाखाली ठेवून दिल.
मुनीमन जवळ हात
धरून उठवत म्हटले ,आत ये हरिभाऊ ,वर ओट्यावर बोलु या .उठुन उभे राहताना अजुनही
हरिभाऊंचे पाय लटपटत होते. डाव्या हातातही जोर नाही. तोपण थऱथरतो . ओट्याखाली येऊन पायरीवरच बसुन राहिले
हरिभाऊ .नको ,आता वर येत नाही . आज चतुर्थी चांगला दिवस आहे म्हणून तुझ्याकडे आलोय एक मदत मागायला . आताशा प्रकृती उरली
नाही. आजच काम उद्यावर कशाला ढकला १ उद्या काय आपल्या हातात राहिलय१.
मुनीमन
आपलं मन चाचपलं . मदत मागतोय ,बहुधा पैसे हवे असतील . महिना संपत आलाय . पेन्शन
मिळायला अजून पंधरा दिवस लागतील .आपल्याजवळ खिशात साठ-सत्तर रूपये असतील तेवढेच
. सकाळीच रुकय्याला पन्नास रूपये
घरखर्चासाठी देऊन झाले आहेत . आता हरिभाऊला काही उसने पैसे लागत असतील ,तर यातुनच
द्यावे लागतील .उद्या पुन्हा बँकेतुन काढता येतील.
हरिभाऊ
त्य़ांचे बालमित्र . नाही म्हणायला असतील वयानं पाच-सहा वर्ष मोठे . गावातल्या
प्रायमरी शाळेत दोघ शिकलो. मग जिल्ह्याच्या गावी हायस्कुल पूर्ण केल .हरिभाऊ एकेका
वर्गात एक-दोन वर्ष करीत आपल्याच वर्गात आले होते. मग आपण दूर नाशिकला जाऊन कॉलेज
पूर्ण केल ,पण हरिभाऊ गावातच राहिले .आता
आपल्या गावातही कॉलेज आलयं . एक सोडून दोन-दोन कॉलेज . शिवाय स्टेट बँक ,शिवाय
कोल्ड स्टोअरेज .तरी शेवटी गाव ते गावच . तिथल्या एकुलत्या एक मेनरोडवर
हरिभाऊंच्या वडिलांच शिंप्याच दुकान होतं . होत का , अजूनही आहेच. गेली चाळीस
वर्षे हरिभाऊ आणि वडीलबंधू सदाशिवराव मिळुन दुकान चालवतात .पुर्वी गावातल्या सर्व
शाळकरी आणि कॉलेज विद्यार्थ्यांचे ,मुलींचे बायकांचे झालच तर मोठ्यांचे कपडेही तेच
दोघे शिवत .शिवाय चड्डी ,बंडी, पायजमा ,पडदे हे पण त्यांच्याच दुकानावर येत.
मग गावात
एक लेडीज टेलर आला . त्या पाठोपाठ एक मॉर्डन टेलर . हरिभाऊंना पक्षाघाताचा अटॅक
येऊन डावा हात जवळजवळ निकामी झाला ,पण पण मशीन अजुन जिद्दीन चालवतात .सदाशिवरावच
वारले . त्यांच्या दुकानातील म्हतारा कटिंगमास्तर अशरफी खानही त्यांचा बालपणाचा दोस्त . दुकानात चोळीकट ब्लाऊज
किंवा बॅगी पॅंटच कटिंग करायच म्हटल ,तर
त्याचेही हात थऱथऱ कापतात . तरीही दुकान अजुन टिकुन आहे ,कारण दुपारपासुन पुढे
नातवान भाड्यान देऊन ठेवल आहे. तो पोरगेला नवा शिंपी शेजारच्या गावातून रोज येतो
आणि इथे य़ेऊन धंदा करतो ,पण गावातल्या जुन्या माणसांची शिलाई वगैरे अजून
हरिभाऊकडेच येते.
अब्दुल
मुनीम ,त्यांची पुतणी रूकय्या . तिची पोरगी
रोशनी ,सगळ्यांचे कपडे तिथेच शिवायला टाकतात . रूकय्याच्या लग्नात
दुल्हाभाईची अचकन ,कुर्ता ,पायजमा सगळं इथंच शिवुन घेतल होत . आता लग्नच टिकल नाही
ते सोडा.
हरिभाऊ
हळुहळू बोलले ,या आजारपणात उठेन की नाही असंच वाटत होत . कालच जरा नीट जेवलो . आज
चतुर्थीचा उपवास ,तरी आजच आलो . तुला आठवण करून द्यायला . शकिल ताय म्हणला होता आठवतं का१ मुनीमला आठवत होत .शकिल तेंव्हा
सात-आठ वर्षांचा असेल . मुनीमबरोबर फिरायला येतो
म्हणून हट्ट धरून बसला होता. मुनीम त्याला हरिभाऊंकडे घेऊन आला होता. मग
बराच वेळ अंगणात त्याची मुलगी गौरी आणि शकिल गाईच्या वासराबरोबर खेळत होते .
हरिभाऊ मुनीमला सांगत होते .व्दारका ,वृदावनला जावसं वाटत ,पण या जन्मात जमेल की
नाही सांगता येत नाही . खेळता -खेळता एकदम शकिल म्हणाला जमेल-जमेल ,हरिकाका मी मोठा झालो ना , की हात धरून तुम्हाला घेऊन
जाईल . हरिभाऊ ,गौरी ,तिची आई रमा, सगळेच
हसले . रमा म्हणाली , शाब्बास मुलगा असावा तर असा. शकिल तेव्हा इतका लाजला, कि
पळूनच गेला . गौरानेच मागुन पळत जाऊन समजावून त्याला परत आणलं होतं. शकिल आणि
गौरीची मैत्री तिथुन पुढे वाढत गेली , पण सगळीच त्याबाबत मौन पाळून राहीली . इतकी
,की सहा वर्षांपूर्वी तिचं लग्न झाल आणि ती सासरी गेली सुद्धा . रमा पण वारली ,पण
अजुनही गौरी माहेरी आली की हरिभाऊ त्या प्रसंगाची आठवण काढतात . शकिलही
आपल्यापासुन किती लांब आहे, हैदराबादच ट्रेनिंग
संपवून आता त्याला पुरीला पोस्टींग
मिळालेल आहे.मोठा बँक ऑफिसर झाला आहे. अथांग निळ्या समुद्राजवळच त्यांच घऱ
आहे. तिथुन अगदी जवळ आहे स्वर्गव्दार . असंख्य यात्री रोज देवाच्या दर्शनाला येत
असतात . मंदिराच्या बाहेर दुकानांवर गर्दी सरता सरत नाही. कढईतुन नुकतीच काढलेली
गरमगरम जिलेबी द्रोणातून खात-खात सकाळ -संध्याकाळ वालुकाताटावर ही गर्दी फिरत असते. निळ्या हिरव्या लाटा येऊन
त्यांचे पाय धुऊन जातात . मध्येच एखादी उंच लाट येते ,लांबलचक पसरलेल्या
भींतीसारखी आणि अर्ध्या रस्त्यातच कुठेतरी फुटुन विरून जाते . मग खुपसा फेस जणू
तटबंदीची रेघ आखत मागे सरकत जातो. तो पर्यत क्षितिजावर आणखी एक मोठी हिरवी भिंत
जन्माला येत असते .लाटांकडे पाठ फिरवली की इकडे ते बारा- तेराशे वर्षांच जुन मंदिर
असतं .त्याची उंच शिखऱ म्हणे दहा मैलांच्या
परिसरातुन कुठुनही दिसु शकतात .शकिलच्या बायकोन हे सगळ पत्रात कळवल होत
.लिटरेचर घेऊन बी.ए . झालेली मुलगी आहे. त्यांच्या मुलाचा नवीन काढलेला फोटोही
पाठवला होता. एकदा येऊन जा ,असं निमंत्रण दिलं होत,पण शकिलला त्याच्या जुन्या
आश्वासनाची आठवण होती कि नाही कुणास ठाऊक . त्याच्या पुरी पोस्टिंगला आता चार वर्षे होत आली होती. फतिमाला त्यांच येणं
आवडेल का १ हरिभाऊला तिथे नेलं आणि त्यामं खिशातुन तंबाखु काढली ,की फतिमा फटकन
म्हणेल ,छे छे अब्बाजान ,त्यांना सांगुन टाका इथे हे सगळ चालणार नाही . मग किती
शरमेची गोष्ट होईल.
मुनीमनी हरिभाऊंना समजावत म्हटल ,आपण आधी शकिलला पत्र लिहुन विचारू .
काय म्हणतो ते बघू ,नाहीतरी धर्मशाळा
आहेच . मग हात धरून हरिभाऊंना मेनरोडपर्यत सोडुन आले .सपाट रस्त्यावर हळूहळू काठी
टेकत हरिभाऊ जाऊ शकतात आणि आज तर ते डोक्यात पुरीदर्शनाच स्वप्न घेऊन जात होते.
पहाटे
मुनीमला जाग आली तो तहानेने घशाला कोरड पडली होती. रेल्वेच्या लचीवर अंग
हिंदकाळत होत. उशाची पातळ घडी नीट करून मुनीम कितीतरी वेळ उठावं-उठावं म्हणत पडुन राहिले . शेजारची खिडकिची काच
फुटली होती . त्यातुन बोचरी थंडी हवा आत येत होती . काल रात्री झोपण्याआधी एकदा
बाथरूमला जावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला होता. पॅसेजमध्ये जागोजागी माणसं
एकमेंकांना चिकटून बसली होती . बसल्या बसल्याच पेंगत होती. वॉश बेसिनसमोर एक
म्हतारी गुडघ्यात पाय खुपसुन झोपली होती .त्या गर्दीत बाथरूमपर्यत जाता साल नाही .
मध्यापर्यत जाऊन मुनीम परत आले होते . असंख्य
ट्रंका आणि इतर सामान सगळीकडे गच्च भरलेल होत .नागपुरला जाणारा एक मोठा
जमसमुदाय प्रत्येक स्टेशनवर सगळ्या डब्यांमध्ये शिरत होता . त्यांच्यासाठीच ही
जनता जनार्दन एक्सप्रेस सुरू केली आहे जणू . बिनदिक्कत विनातिकिट ते यात प्रवास
करू शकतात . अरूप रूप
टीसीकडे तक्रार केल्यावर तो म्हणाला या सर्व गरीब बिचा-यांना
ट्रेन थांववुन मध्ये उतरून देऊ म्हणताय १ ट्रेन काय तुनचीच प्रायव्हेट गाडी आहे
वाटलं का १ मग हरिभाऊनं त्यांना समजावलं,
अरे, वर्षातुन एकदा बाबासाहेबांच्या निर्वाणदिनासाठी जातात ते नागपुरला. तेव्हा कुठे मुनीमनाही उलगडा झाला. मनीमनं स्वतःची
चादर मधल्या बर्थवर पसरून खालचा बर्थ हरिभाऊंना दिला होता. त्यांना ऊठ-बस करायला त्रास होऊ नये म्हणून. आता हरिभाऊ झोपले
होते. थोडसं उघ़डं तोंड . जाड सोलापुरी चादरीने गळा , कान आणि डोकं लपेटून झोपले आहेत. नाकातून घोरण्याच्या किंचितसा
आवाज चालु आहे.
बाथरूमला
जाऊन आल्यावर जरा बरं वाटलं. तोंडावर आणि
डोळ्यांवर गार पाण्याचे सपकारे मारून टॉवेलनं तोंड खसखसुन पुसुन काढलं. आता
बर्थवर जाऊन सकाळचा नमाज उरकून घ्यावा म्हणत असतानाच दाराजवळ उभ्या असलेल्या तरूणाच्या डोळ्यांत विचित्र झाक
पाहुन मुनीम अस्वस्थ झाले.
कुठे जाणार१
अरूप रूप
तोंडातला फेस वॉश बेसिनमध्ये थुंकून टूथब्रश धुता-धुता त्यानं
पुन्हा विचारलं, कुठे जाणार१
पुरीला जाणार का१ अस्वस्थपणे मुनीमने विचारलं१
पोचणार का इतक्या लांब१ त्याचे तांबरलेले डोळे पाहून रात्रभर झोपला नसावा वाटत होतं. बाबरी मशीद
पाडल्याची बातमी ऐकली नाही वाटतं१
मुनीमचं संबंध शरीर थरथरलं तोंडातून अवाक्षर न काढता
त्याच्याकडे पाहत राहिले. पेपर वाचत नाही का१ असं हरवल्यासारखं बघताय काय
माझ्याकडे १ तरीही मुनीमची जणू वाचाच
बसून गेली.
अजून फारसं कुणी
उठलेलं दिसत नाही. नागपूर स्टेशन यायला एक तास अवकाश आहे. तोपर्यत ही दाढी काढून
टाका. लुंगी बदला. जवळ पायजमा किंवा धोतर आहे ना१ नसेल तर मी देतो. या इकडे मग
मुनीमच्या चेह-यावरचे अनोळखी भाव पाहून हातातल्या नॅपकिनला तोंड पुसत तो तरूण
बोलला, हाजी अब्दुल मोहसीन माझ्या मोठ्या भावाचे क्लासटीचर होते. मी केतन देशमुख.
तुम्ही ओळखलं नाही वाटतं१ नाना देशमुखांचा पुतण्या.
मुनीमना हळूहळू आठवलं ...रायपूरला यांचा कापडाचा आणि दागिन्यांचा व्यापार आहे. मुळात हा परिवार
काही व्यापार धंदा करणा-यांचा नव्हे. अब्दुल
मोहसीनकडून यांच्याबद्दल ऐकलं आहे मनीमनं. लहानपणी आई-वडील वारल्यावरनाना
देशमुखानं मामाकडे अपमानात दिवस काढले. एकदा एकदा रस्त्यांवर रडत उभा होता, तेव्हा
मोहसीम मास्तर त्याला हाताला धरून घरात घेऊन आले होते. स्वतः नेऊन शाळेत त्याचं
नाव घातलं होत. पुढे त्याचा धाकटा भाऊ आबाही त्याच शाळेत शिकला होता आणि आबाचा
मोठा मुलगा चेतन पण.
पण केतननं पुढे केलेला पायजमा आणि सेफ्टी रेजर मुनीमनं घेतला
नाही. नको, राहूदे मी ठीक आहे. हरिभाऊ उठले आहेत. त्यांची चप्पल शोधून द्यायला
हवी. चालत्या गाडीत त्यांच्या हाताला आधार दिल्यावर हळूहळू पाय ओढत कसाबसा तोल
सावरत हरिभाऊ बाथरूमपर्यंत येऊ शकले, पण
गाडीतील मंडळी टकमक त्या जोडीकडे पाहत राहिली.
दिवस हळूहळू वर येतो आहे, तसं ट्रेनमधलं वातावरण जास्त गंभीर
होत चाललयं. काही पुटपुटणारे स्वर, काहीशी फुसफूस व कानगोष्टी गाडीच्या या
टोकापासून त्या टोकापर्यंत फिरत आहेत. नजरा मुनीमपर्यंत येतात आणि रेंगाळतात.
शंका, व्याकुळता , बेचैनी, भीती.
नागपूरला पेपरसुद्धा जादा दाम मोजूनच मिळत होते. सर्वत्र तीच
हेडलाईन, बाबरी मशीद पाडल्याची. ज्यांना पेपर मिळाला नाही ते माना उमचावून इतरांचे
पेपर वाचताहेत. या हाततून त्या हातता जात-जात पेपरही जीर्ण होताहेत. आज देशभर बंद पुकारला आहे. नागपूरनंतर आता एकामागून एक
स्टेशनं बिनगर्दीची जात आहेत. कुठे चहा -सिगारेट विकणारेही नाहीत. नशीब दशम्या
बांधून आणल्या होत्या. हरिभाऊंची सुन तशी सुगरण आहे. चांगल्या दोन-तीन दिवस पुरतील
एवढ्या दशम्या बांधून दिल्या होत्या.
जोडीला बटाट्याटी कोरडी भाजी आणि लसणीचा
ठेचा. सीटवर वर्तमानपत्र मांडून त्यावर पेपर प्लेट मध्ये हरिभाऊंनी सर्व मांडामांड
केली. ये मुनीम ,काहीतरी खाऊन घेऊ.
रायपुर स्टेशन सोडून जरासं पुढे गेल्यावर गाडी थांबली. अर्धा
तास , एक तास , तीन तास झाले. समोरच्या
रेल्वेलाईनवर कुणीतरी पडून राहिलयं. संध्याकाळी रात्र झाली. एक भीतीच
वातावरण दाटलं. गाडीत दिवे नाहित. दिवे कधी येणार१ बाथरूममधील पाणीही संपून गेलंय.
लहान मुलं, म्हतारी माणसं क्लांत होऊन गेली आहेत. एव्हाना काही उत्साही मुलं खाली
उतरून चौकशी करून आली. बाहेर शहरात जणू पोलिसांविरूद्ध जनता असे लाठीयुद्ध चालू
आहे. पोलिसांनी अश्रुधुराची नळकांड्या आणल्या आहेत, तर त्यांनी फुटलेल्या बाटल्या
आणि दगडं गोळा केली आहेत. मुनामच्या
घशाला आणि जिभेला भातीमुळे कोरड पडली आहे. पोटात गोळा उठतोय. हरिभाऊनं कुठूनशी
विष्णू सहस्त्रनामाची पोथी बाहेर काढलीय आणि खिडकीच्या बाहेर मिणमिणत्या उडेडात
धरून वाचायचा प्रयत्न सुरू केला. मग पोथी खाली ठेवून स्वतःशीच बोलला, ते तर काय
पाठ आहे. तसंच म्हणू शकेन. त्याच्या सुरकुतलेल्या चेह-यावर दुःखाच्या आणखीन काही रेखा या तीन-चार तासांतच निर्माण
झाल्या आहेत.
डब्यातल्या इतर माणसांच्या गप्पा हरिभाऊंच्या कानावर कितपत
पडत असतील१ त्यांच्याबद्दल दाटून आलेल्या भीती आणि अविश्वासाबाबत हरिभाऊंशी
बोलावसं मुनीमला वाटेना, पण हरिभाऊंनीच बोलून दाखवलं, पहा मुनीमभाई, या देशाला काय
झालंय१ जेव्हा देशाचे दोन तुकडे झाले तेव्हासुद्धा असा अगोचरपणा कुणी केला नव्हता आणि आजही या उपद्व्यापात कोण मरतंय पाहा
ना१ गरीब हातावर पोट असणारे मजूर ,हॉकर्स
,रिक्षावाले, झोपडपट्टीतील माणसं. भिवंडीच्या वेळीही हीचं माणसं मेली. ती हींदू
किंवा मुसलमान नव्हती. ती फक्त गरीब होती.
त्या अनिश्चत वातावरणात शांत होऊन मुनीम पडून राहिले. हरिभाऊ
कितीवेळ जणू स्वतःशीच बोलत होते. मध्येच एकदा ऐकलं, ट्रेन सात तास लेट झाली आहे.
आता ती कुमाच्या आज्ञेत नाही, स्वतःच्या मर्जीनेच पळते, कधी रेंगाळते
आणि आता थांबत्येय. कोण-कोण शिरतय ट्रेन मध्ये१ अचानक ही गर्दी कुठून आली१ मघापर्यंत नव्हती. तेवढ्यात एक तीव्र
स्वर उमटला. हो हो रे हातात लाठ्या -काठ्या
घेऊन दहा-बारा जण जणू आकाश भेदून अवतरले आणि धक्काबुक्की करून लोकांना जागे
करू लागले, उठवून बसू लागले. हरिभाऊ कशल्याशा चपळाईनं उठून उभे राहिले होते. लटलट
करणा-या हातात काठी होती आणि ती तोलायच्या पवित्र्यात हरिभाऊ उभे होते. ती काठी
उचलली गेली तर हरिभाऊ उभे राहु शकत नाहीत, हे मुनीमानाच माहित होतं, पण ती वेळ आली
नाही ... झंझावातासारखा त्या लाठीधा-यांच्यामधून पुढे झाला केतन देशमुख मुनीमची
बाही खसकन ओढत फरफटत त्यांना घेऊन गेला. ऊठ साल्या, आज तुला खतम करून टाकतो. हा
उतरला नव्हता वाटतं रायपूरला त्यांच्याच पाळतीवर होता काय१
एखाद्या अजस्त्र
अस्वलाप्रमाणे मुनीमला दोन्ही
खांद्यातून उचलून त्या केतननं झपाट्यानं गर्दीतून वाट काढून त्यांना बाखरूम
मध्ये आणून सोडलं आणि दाराला पाठ टेकवून उभा राहिला. मग दबल्या सुरात म्हणाला, कपडे बदलायला सांगितले होते ते ऐकलं नाही.
आता एकदम गप्प रहा. सगळे साले पिऊन तर्र झालेले आहेत. कळले तर मुडदा पाडतील तुमचा
आणि माझा पण. आतून कडी घालून बसा, मी बोलवायला परत येईपर्यंत. हरिभाऊंना मी
सांभाळतो. आणि पटकन दार उघडून दिसेनासा झाला. अंधारात कशीबशी कडी लावून मुनीम मटकन
खाली बसले. रडायची इच्छा होती, पण रडू फुटेना. खिटकिच्या फुटक्या काचेतुन येणा-या बोच-या वा-याला तोंड
देत बसून राहिले. ट्रेन कधी चालू लागली होती तेही कळलं नाही.
....
..... .....
एका मध्यरात्रीच्या सुमारास पुरी शहरात एक ट्रेकरवाल्यानं
त्यांना दवाखान्याच्या चौरस्त्यावर आणून सोडलं. विशाल, रूंद राजरस्ता चारी दिशांना
दुरवर गेलेला आहे, पण शहरात कुठेही जीवनाचं स्पंदन दिसत नाही. नाही म्हणायला
चार-चार पाच-पाच मोकाट कुत्री टोळ्या करून उच्चरवानं मध्येच भुंकतात. मध्येच
रडतात. एखाद्या लहानग्या गुटगुटीत मुलाला झोपेचं औषध दिल्याप्रमाणं शहराची अवस्था
झालीय. ट्रेन जाणार नाहीत. बसेस पण बंद आहेत. कर्फ्यू दुपारीच संपला आहे. तरीपण
जनजीवन तसंच भयाक्रांत आहे. मोठा श्र्वास घेण्याची सुद्धा हिंमत होऊ नये, अशी भाती
वातावरणात भरून राहिली आहे. मुनीम आणि हरिभाऊ इथे आलेत तेही मजल -दरमजल करीत. आधी
एका जीपवाल्यानं , मग या ट्रेकरवाल्यानं त्यांना एका मुक्कामावर आणून सोडलं आहे. भाडं
चौपट , दसपट, तोंडाला येईल ते. शिवाय हातापाया पडावं लागत होतं. सगळे पैसे असेच
संपून गेले तर परत कसं जाणार १ तसं पाहिलं तर हरिभाऊंना स्वातंत्र्यसैनिकाच पेन्शन
होतं. त्यांना आणि बरोबर एका माणसाला रेल्वेचा येण्या-जाण्याचा पास होता. म्हणून
तर दोघे येण्याचा बेत करू शकले होते. तरीपण प्रवास खर्चाला पैसे ठेवले पाहिजेत.
ट्रेकर -जीपवाल्यांचा तरी काय इलाज. त्यांनी अशा पॅसेंजरला दया दाखवायची तर वीस
रूपये किलो बटाटे कसे विकत घ्यायचे१
आता पुढे कस जायचं मुनीम १ हरिभाऊ अथांग समुद्रातील
एकांड्या होडीतील प्रवाशाप्रमाणं वागताहेत. विचारपूस करायला रस्त्यात कुणी
चिटपाखरूही नाही. मुलाचा पत्ता असलेल कार्ड मुनामनं खिशात जपून ठेवलयं. वरचेवर
त्याला हात लावून ठीकठाक असल्याची खात्री करून घेताहेत. त्यावर मुलान वाटेचा नकाशा
काढून पाठवला होता. सगळीकडे बैठी दुमजली घर आहेत. चौरस्त्यावरून सरळ पुढे यायचं.
कुठे वळायचं नाही. चंद्राच्या उजेडात शहरं न्हाऊन निघालं आहे. त्यात मुलाच नवीनं
घरं शोधायला त्रास झाला नाही. इतर गुलाबी घरांच्या रांगेत एवढंच हे क्रीम पेंट दिलेलं घर. समोर छोट्या
कंपाऊंडमध्ये बाग केलेली आहे. को-यातल्या बकुळीच्या झाडाची खुणही पटली. गेटसमोर
येऊन मुनीमनं काप-या आवाजात हाक मारली, शकील ओ शकील बराच बेळ काहीहालचाल दिसेना.
भीतीची एक शिरशिरी पायापासून सळसळत गेली . मुलगा कुठे गेला तर अलेल तर १ किंवा या
क्षणीची इतर दारं उघडली आणि त्यातून हातात काठ्या सरसावून सावल्या बाहेर पडल्या
तर१
कोण आहे१ असे विचारत टॉर्च घेऊन गेटपाशी आला शकील.
पाठोपाठ गाऊन घातलेली फतिमाही. अरे अब्बा आणि हरिचाचा कसे आला१ सगळ्या गाड्या बंद आहेत. आम्ही काळजीत होतो. रस्त्याचा त्रास
नाही झाला ना काही१
ओठाखाली जखम,मळलेले कपडे ,पण मुनीमनं हरिभाऊंना
इशा-यानंच मना केलं एका म्हता-याची भाषा दुस-याला कळली. हसून म्हणाले,हा आम्हाला
पण हाच मूहूर्त मिळाला बघ तुम्ही ठीक आहात ना इथे दंगलीची त्रास किती झाला १ नाही
इथल्या पॉश वस्तीत दंगलीचा काहीच त्रास नाही. कर्फ्यूही या भागात नव्हता. शिवाय
शकील इथल्या शांतता समीतीचा सभासदही आहे. पलीकडच्या झोपडपट्टीत थोडीशी मारामारी
झाल्यासारखं वाटतं. मेन बाजारात काही दुकानांना आग लावायचा प्रयतमन झाला ,असं ऐकल.
भाजीबाजार जणू बंदच पडलेत. कांदे बटाटे तेवढे दिसतात. एक मात्र बरं झालंय.
तीर्थयात्रींची गर्दी कमी झाली आहे. अशा दिवसात घर सोडून पुण्य कमवायला जायचं धाडस
कोण करणार१ जे इथे येऊन पडले आहेत, हॉटेल किंवा धर्मशाळेत ,तेव्हा घरी परतण्याची
वाट बघताहेत.
फतिमाने पुन्हा एकदा स्वयंपाकघराचा ताबा घेतला. तिथेच
खुर्च्या मांडून हरिभाऊ आणि मुनीम बसलेत. मसूर डाळीला दिलेल्या फोडणीचा सुगंध दोन
दिवस रिकाम्या पोटाला वेगळी अनूभूती देऊन जातो. धार निघत नाही. सध्या यांच्या घरात
मांस -मच्छी शिजण्याची भीती नाही. बाजारात मिळायला हवे ना शिवाय शकीलनं सांगितलं
,थोडे दिवस शाकाहारीच जेवण बनेल आपल्याकडे.
जेवून पडल्या -पडल्या
शकील फतिमाला झोप लागली . मुनीमचा डोळा लागला नाही. मनातली भीती एकदम जाणार
नाही. हरिभाऊंचाही डोळा लागला नाही. कधी सकाळ होईल आणि कधी आपण देवदर्शनाला जायचं१
डोळ्यासमोर एकच विचार. कालपरवाची आठवण पार पुसली गेली होती. सकाळी उठल्या -उठल्या
उठल्या आधी तोच विचार.
अरे ,सावकाश शकील
जरा त्राग्यान बोलला, शहराची अवस्था पाहताय ना१ कसं जाणार, सोबत कोण जाईल१ आज जरा
काहीतरी व्यवस्था करतो. अब्बाजान ,तुम्ही तर जाऊ शकणार नाही.
मी हरिभाऊंसोबत जाईन. निश्चयान मुनीम बोलले. देवळाबाहेर
वाट पाहायला कुणी अडवत नाही ना१
शेजारचा एक
तरूण वकिल मित्र असतो शकील-फतिमाचा .
त्याच्या ओळखीत एक गाईड आहे. पुरीच्या मंदीराचा इतिहास -भूगोल सांगणारा.त्यालाच
बोलावून घेतल शकीलनं. मंदिराच अद्भूत शिल्प ,त्याच्या कथा सांगताना गाईड रंगून
गेला .या मंदिराचा दहा मणाचा दगड घसरून पडला होता. भरदिवसा. एवढी गर्दी होती ,पण
कुणालाही लागंल नाही एवढंसुद्धा आणि मंदिर माहात्म्याची गाथाही
वाचा. त्यात लिहलं आहे, की जेव्हा प्रलय होईल तेव्हा समुद्रातील मासे मंदिराच्या
पाय-या चढून वर येतील , पण त्यावेळी जगन्नाथजी इथे थांबणार नाहीत. ते निघून जातील,
शेजारी छतियाच्या मंदिरात.
अरूप रूप (एक शहर मेले त्याची गोष्ट)
अच्छा
,इतक्या वर पाणी चढेल १ हरिभाऊंचे डोळे लकलक तरत होते. आश्चर्य, आनंद आणि आता अतूट
ओढ लागली होती. गाभा-यात जाऊन देवाला डोळेभरून पाहण्याची.
कारे भाऊ इथला देव वेगळा अनगढ आहे
म्हणतात. आमचा
राम, दत्तात्रेय, लक्ष्मीनारायण, सगळ्यांचे कसे सुघड, मनोहर चेहरे असतात. तरीपण
यांच्या दर्शनाला लोक येतात इतक्या लांबवरून१ वकील हसून बोलला, आधी जाऊन तर या.
जवळून बघा देवाला, मग कळेल मनोहर रूप आहे का नाही ते.
दुपारची जेवण
आटपून निघाली मंडळी शहरात आता थोडं स्थिरस्थावर झालं आहे. वकील मात्र कोर्ट
-कचेरीच्या कामामुळे त्यांच्याबरोबर येऊ शकणार नाही.
हरिभाऊंना
मंदिरापाशी सोडून मुनीम समुद्रकिना-यावरच थांबले. दूरपर्यंत वाळूच वाळू पसरली
होती. वाळूत कुणाची तरी एक छोटी होडी उलटी करून ठेवली होती. त्यावर जाऊन बसले.
समोर अथांग सागर, वर आकाशात स्वच्छ चंद्रकोर. सूर्य पश्चिमेकडे कळलेला. हिरव्या पाण्यावर निळ्या आकाशाचं
प्रतिबिंब पडून रंगांचं वेगळं मिश्रण तयार होत होतं. कितीतरी वेळ टक लावून तेच
दृश्य पाहात होते मिनीम.
पाण्याची
एखादी लाट हळूच पायापर्यत येऊन भिडत होती .ती मागे सरू लागली की तिच्याबरोबर ओढली
जाणारी वाळू पायाखालून गुदगुदल्या करून सुखावत होती. लुंगी खालुन भिजत होती.
पाण्यात जरासं पुढं शिरून चार-पाच तरूणी आणि दोन -तीन छोटी मुलं मस्ती करत होती.
त्यात लाल साडीवालीएक मुलगी थेट गौरीसारखी दिसत होती. अशीच षोडशी, सावळी,
पावसाच्या पहिल्या सरीत न्हाऊन निघालेल्या वेलीप्रमाणं. अचानक मुनीमला आठवलं,
गौरीच्य लग्नानंतर शकीलचा म्लान चेहरा,उदासवाने डोळे,शून्यात हरवल्यासारखी अवस्था.
मुलांच मन ओळखण्यात आपण उशीर केला, असं वाटून गेलं मुनीमना.
पण आध आधी कळून
काय उपयोग झाला असता का१ कुणी
सांगावं१ एक निःश्वास नकळतच मुनीमच्या घशातून बाहेर पडला. फतिमा तरी कुठे वाईट
आहे१ कान्हवेंट शाळेतली, कॉलेजात शिकलेली, स्मार्ट ,वागण्या-बोलण्यात चतुर.
घरकामात तितकीच तरबेज. हरिभाऊंच्या मनात काय होतं कुणास ठाऊक१ पण तोंड उघडून तेही
बोलले नाहीत कधी. शकीलकडे पुरीला यायचं म्हटल्यावर काय वाटलं असेल तेही माहीत नाही.
वेळ जात
होता. आकाश पुन्हा एकदा लाल होऊ लागलं
होतं. तीनवर्षापूर्वी केलेली हजयात्रा मुनीमना आठवली. मुंबईहून बोटीचा प्रवास करून
गेले होते. काबाच्या वर आकाशात अशीच स्वच्छ चंद्रकोर होती,तिच्याकडे पाहत अल्लाची
प्रार्थना करताना कशी शांती मिळाली होती. जणू आयुष्याच्या सगळ्या पाप-पुण्याचा
हिशोब पूर्ण करून खाली एक मोठी रेघ आखली गेली होती. आता फक्त
परलोकाचा विचार. आधी गावात कुणाकडे गेल्यावर प्रसादाचा नारळ दिला, तर मुनीम घेत
असत. आताशी टाळू लागले आहेत. दोन दिवसांच्या गाडीच्या प्रवासात नमाज पढायचा
राहिला, त्यासाठी कित्येक वेळा खुदा -खुदा म्हणून माफी मागून झाली आहे. शकील बसत
नाहीनमाज पढण्यासाठी. कामात मग्न असतो, म्हणून मुनीम त्याला काही बोलू शकत नाहीत.
हरिभाऊंनाही फरक जाणवला असेल
का१ आज मंदिरासमोर एवढी दुकानं होती. कुठेही बसावसं वाटलं नाही. सगळ्यांच्या हातात
भिक्षापत्र ,पण मुनीमना आता कुणाकडून काही मागायचं नाही. आता फक्त वाट पाहायची,
वरून कधी बोलावणं येतं त्याची. अगदी आताच या वाळूच्या तटावर आलं तरी चालेल.
शिडाच्या नावा
समुद्रात लांबलांबवरून परत येऊ लागल्या आहेत. रंगीबेरंगी पाखरांप्रमाणे
घिरट्या घालताहेत. कुणी जवळ येते. परत
लांब जाते, तिच्या थांब्याच्या जागी जाऊन शीड गुंडाळले जाते.
दूरून हरिभाऊ येताना दिसतात. त्यांच्या लुळा पाय वाळूत ओढला
जाऊन त्रास होतोय. एका भाविकानं हात धरून इथपर्यंत आणून पोचवलं. ओल्या वाळूत
काठीही रूतून बसते.
रात्रीच्या स्निग्ध अंधारात दोघं वृद्ध बसून आहेत
समुद्रावर. बराच वेळ कोणी काहीच बोलल नाही. मध्येच एका पो-यानं अतिपुरातन
किटलीतून चहा ओतून दोन ग्लास भरून जवळ
ठेवले. दोन- चार घोट घेऊन हरिभाऊ बोलू लागले , माहितेय मुनीमभाऊ, किती दिवसांपासून
वाट पाहत होतो. कशी असेल मूर्ती १ कसं रूप असेलं १ असा अनघढ, अपूर्व देव तर कधीच
ऐकला नाही. काल रात्री झोप उघडली तरी हाच विचार आणि आज काय अद्भूत घडलं म्हणून
सांगू ,गरूडस्तंभ ओलांडून तसाच पूढे झालो. आज मंदिरात काहीच गर्दी नाही म्हणून कुणी अडवलं सुद्धा नाही. समोर शांत
निरांजनं तेवत होती. एकटक बघू शकलो देवाला जसा जीव मुठीत घेऊन इथपर्यंत आलो,तसचं
जीव डोळ्यात आणुन दर्शन घेतलं आणि मुनीमभाई ,पाहता-पाहता जणू डोळ्यांवरचा पडदा
सरला. काय रूप ...लावण्य म्हणून सांगू१
ते दोन डोळ्यांत मावणं शक्य नव्हतं . तुला तरी कसं सांगू १ तू तर बघीतलेलं नाहीस.
मी जे पाहिलं ते डोळ्यांत मावलं नाही, की शब्दांत मावणार नाही. खरं सांगतो,
तुझ्यामुळेच हे भाग्य लाभलं बघं .
जन्माचं सार्थक करून दिलसं तू. जेव्हापासून हातपायलुळे पडले तेव्हापासून मी तर आशाच सोडून दिली होती. आधी कित्येक
तीर्थापर्यंत फिरलो,पण इथे आल्यावर वाटलं आता मरण जरी आलं , अगदी ,इथे या वाळूतटावर... हरिभाऊंना अंधारात दिसलं नाही. मुनीमच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली होती. चेह-यावरच्या ताज्या जखमांना भिजवत ते आसू
पायाखालच्या ओल्या वाळूत मिलळून जात होते.
लेखक .. अनिता अग्निहोत्री
==============================================
अरुप रतन
नहाने के
बाद कलफ किया कुरता पायजामा पहन कर अब्दुल मुनीम आदमकद शीशे के सामने जा खडे हुए।
बालों पर जतन से कंघी करते करते आवाज सुनाई दी - 'ओ मुनीम'। खिडकी का पडदा हटा कर
मुनीम ने बाहर के बगीचे में झांका। कोई नही था। सुबह की सुनहरी धूप दूर तक पसरी हुई
थी। भरे पूरे भारद्वाजों की एक जोडी मस्ती में धीरे - धीरे चलकर घास में घूम रही
थी। ये जोडी उनके बगीचे में रोज आ जाती थी। कीडे, मकौडे, या गिरगिट पकड कर खाने के
लिये।
अब्दुल
मुनीम ने बरामदे में आकर देखा - नही कोई नही था। अंदर के कमरे से रुकैया ने याद
दिलाई - 'चचा जान, आपका पान लगाकर रख्खा हुआ है।' तभी मुनीम का ध्यान गया - आंगन
के बायें कोने में सोनचम्पा के पेड के नीचे बैठकर हरिभाऊ उन्हें पुकार रहे थे।
'मुनीम, ओ मुनीम भाई !'
कंघी को
अंदर फेंककर मुनीम तेजी से पहुँच गए हरिभाऊ के पास ! हरिभाऊ को दमा है । बडे दिनों की बिमारी से उठे हैं हरिभाऊ, गले से
अब भी घरघराहट निकलती है। लेकिन चेहरे से खुशी झलक रही है। नई बाराबंदी पहनी है,
जिसकी एक जेब फूली हुई है। उसमें नसवार की डिब्बी, खांसी रोकने के लिये मीठी लकडी
के टुकडे तो होंगे ही। और पुराना चष्मा भी। उसकी एक डंडी जेब से बाहर लटक रही थी।
धुली हुई धोती। और पैरों में चप्पल की जरुरत तो गांवो में मानी ही नही जाती। सिर
पर बिल्कुल बारीक सफेद बाल।
हरिभाऊ ने
फिर से पुकारा - 'मुनीम भाई।' तभी गले में फिर से घरघराहट शुरु हुई। रुकैया ने
अंदर से पुकारा - 'चचाजान, उनसे कहो बगीचे में इधर - उधऱ थूके नही।'
हरिभाऊ ने
जेब से एक बडा पत्ता निकाला । पलाश का लग रहा है। बूढा ये भी रखता है जेब
में? उसी पत्ते में थूक कर तह लगा कर उसे
एक पत्थर के नीचे दबाकर रख दिया।
मुनीम ने
हाथ पकड उसे उठा दिया - 'आओ अंदर चलो हरिभाऊ। वहीं बैठकर बातें करेंगे।'
उठकर खडे
होने या चलने लायक पूरा जोर अभी हरिभाऊ को नही है। लाठी पकडने वाला उनका बांया हाथ
भी थरथरा रहा है। बारामदे तक आकर वे सीढी पर बैठ गये, 'नही, अब ऊपर नही चढा जाता।
आज गणेशव्रत की चतुर्थी है - अच्छा दिन है, इसलिये आ गया। एक मदद चाहिये। अब शरीर
बूढा हो गया थकने लगा। इसी से सोचा आज का काम कल पर क्यों धकेलूं ! समय अब अपने
हाथ में थोडे ही रहेगा !'
मुनीम ने
अपने मन को टटोला - मदद की बात करता है, अब महिने के आखिरी दिन है। पेंशन आने में
पंद्रह दिन और लगेंगे। अभी जेब में पचास - साठ रुपये होंगे बस । सुबह ही रुकैया को
राशन पानी के लिये सौ रुपये दे डाले थे। अब यदि हरिभाऊ को रुपये देने पडते हों, तो
इसी में से देने होंगे। कल फिर बैंक से निकालने होंगे।
हरिभाऊ और मुनीन बचपन के साथी थे । खेलकूद और पढाई - गांव रहे
तब तक एक साथ रहे । प्रायमरी स्कूल की पढाई गांव में पूरी की। हाईस्कूल के लिये
दोनों तहसील के शहर में जाते थे। फिर मुनीम नाशिक के कॉलेज में चले गए। हरिभाऊ
पढाई छोड कर पुश्तैनी दरजी की दुकान पर बैठने लगे।
आज तो गांव
में ही कॉलेज आ गया है। एक नही दो-दो। अलावा स्टेट बैंक और एक कोल्ड स्टोरेज भी।
फिर भी गांव तो गांव ही रहेगा। उसके इकलौते मेनरोड पर हरिभाऊ के पिता ने दर्जी की
दुकान चलाई थी। पिछले चालीस वर्षों में हरिभाऊ और बडे भाई सदाशिवराव ने मिलकर
चलाई। पहले गांव के सारे स्कूली बच्चों के कपडे, लड़कियों, औरतों के ब्लाऊज और
मर्दों के लिये बंडी, खिडकी के पडदे या तकिया के गिलाफ भी सिलने के लिये आते।
फिर गांव
में एक 'लेडीज' टेलर आ गया। उसके पीछे एक 'मार्डन' टेलर आया। हरिभाऊ को लकवा मार
गया तो उनका बांया हाथ पूरा निष्प्राण हो गया। फिर भी जीवट से एक ही हाथ से मशीन
संभालते रहे। लेकिन कब तक ? फिर सदाशिवराव गुजर गए। दुकान में जो बूढा टेलर मास्टर
है - अशरफी खान वह भी उनका बचपन का साथी ही है। यदि किसी के लिये चोलीकट ब्लाउज या
बैगी पैंट बनवानी हो, तो कटिंग में उसके हाथ थऱथर कांपते हैं। फिर भी दुकान अभी
टिकी हुई है। क्योंकि पोते ने बुद्धिमानी की। दोपहर के बाद दुकान चलाने के लिये
भाडे पर दे रख्खी है। एक लडका सा नया दरजी पास के गांव से रोज आता है और अपना
अच्छा धंदा कर लेता है। हाँ, गांव के पुराने लोगों के कपडे अब भी हरिभाऊ के पास ही
आते हैं। अब्दुल मुनीम, उनकी भतीजी रुकैया, उसकी लडकी रोशनी सबके कपडे भी वहीं
जाते है। रुकैया की शादी में तो दूल्हे मियां की अचकन, कुर्ता पायजामा भी यहीं से
सिला था। अब वह शादी ही नही टिकी सो अलग बात है।
हरिभाऊ
धीरे-धीरे बोल रहे थे। 'इस बिमारी से उठ सकूँगा ऐसा लगता ही नही था। कल ही तो कुछ
ढंग से खा पाया हूँ। उसपर आज चतुर्थी की उपवास। फिर भी आज ही गया। दिन अच्छा है
ना ? सोचा तुम्हें याद दिला दूँ, कि शकील
ने क्या कहा था।'
मुनीम को याद आया। शकील जब सात आठ वर्ष का रहा होगा । हठ कर
रहा था कि मुनीम के साथ घूमने चलूंगा। मुनीम उसे लेकर हरिभाऊ के घर आ गए थे। वहां
बडी देर तक वह और हरिभाऊ की बेटी गौरी आंगन में बंधे बछडे के साथ खेलते रहे।
हरिभाऊ मुनीम से कह रहे था मुझे द्वारका, वृंदावन और जगन्नाथजी जाने की बडी इच्छा
है। पता नही इस जन्म में पूरी होगी की नही। खेलते खेलते शकील बोल पडा था - 'होगी,
होगी मैं बडा हो जाऊंगा तो आपको सब जगह घुमाकर लाऊँगा।' यह सुन मुनीम, हरिभाऊ और
उनकी पत्नी रमा सब हंस पडे थे। रमा ने कहा - शाब्बास, बेटा हो तो ऐसा। शकील ऐसा
शरमाया की वहाँ से भाग निकला । तब गौरी ने पीछे से भागकर उसे पकडा और मनाकर वापस
लाया था आगे शकील और गौरी की दोस्ती कुछ कुछ बढी थी। कहां तक, कोई नही जानता।
लेकिन किसी ने उसकी बाबत कुछ कही नही। यहां तक की छः साल पहले उसकी शादी तय हुई और
वह ससुराल चली भी गई। रमा भी अब नही रही। लेकिन आज भी गौरी आती है तो हरिभाऊ उस
बात को याद कर लेते हैं। शकील भी तो अब कितनी दूर चला गया। हैद्राबाद में था। अब
उसका तबादला पुरी हो गया। बडा बैंक आफिसर बन गया है। शकील की पत्नी फातिमा ने
लम्बी चिट्ठी लिखी थी। उनका घर भी अथाह नीले समुद्र के पास ही है । वहाँ से
बिल्कुल बगल में है 'स्वर्ग द्वार' । असंख्य यात्री रोज आते हैं मंदिर में दर्शन
के लिये। मंदिर के बाहर लगी दुकानों पर भीड हटती ही नही है। कडाही से निकली गरम
गरम जिलेबी दोने में लेकर खाते हुए सुबह शाम ये भीड बालू तट पर सैर सपाटा करती है।
नीली हरी लहरे आकर उनके पैरों को नहला जाती है। कभी कभी सागर के मध्य एक ऊँची लहर
बनने लगती है जैसे लंबी फैली हुई परकोटे की दीवार। तट तक आते आते वह बीच में ही
फूट जाती है। उसका फेन सफेद रेखा आंकते हुए दूर तक फैल जाता है। वह रेखा तट तक दौड
कर आती है और फिर पीछे पीछे सरक जाती है। तब तक दूर क्षितिज के पास एक नई बडी लहर
ब
रही होती
है । हरी दिवार की तरह। लहरों से पीठ कर लो तो सामने जगन्नाथ जी का मंदिर है। बारह
- तेरह सौ वर्ष पुराना मंदिर। उसका उंचा शिखर दस बारह मील दूर से भी देखा जा सकता
है। यह सब फातिमा ने लिख कर भेजा था। लडकी ने 'लिटरेचर' से बीए कर रखा है। वही
चिट्ठी पत्री संभालती है। वरना शकील को फुरसत कहां। अभी इधर चिट्ठी में बेटे की नई
तस्वीर भी भेजी है। एक बार पुरी आ कर देख जाने को कहा है।
लेकिन क्या
शकील को वह लडकपन की बात याद होगी ? उसकी पुरी की पोस्टिंग को भी अब दो वर्ष हो
चले हैं। फातिमा को क्या अच्छा लगेगा उनका वहाँ यों चले जाना। हरिभाऊ को वहाँ ले
जाओ और वह जेब से नसवार की डिब्बी निकाले तो फातिमा झट से कह सकती है - 'अब्बाजान,
उनसे कह दो यहां ये सब नही चलेगा'। कितनी शरम की बात होगी।
फिर भी
हरिभाऊ को समझाने के स्वर में मुनीम ने कहा - 'पहले शकील को चिट्ठी लिख कर पूछ
लेते हैं देंखे क्या कहता है '। नही तो धर्मशाला तो होगी ही । फिर हाथ पकडकर
हरिभाऊ को रास्ते तक छोड आए। सपाट रास्ते पर धीरे-धीरे लाठी टेकते हुए हरिभाऊ चलने
लगे तो दोनों बूढों के दिमाग में एक ही बात थी - पुरी जाकर जगन्नाथ मंदिर देखने
की।
------------------------------------------------न्-----------------------------------------------
सुबह मुनीम
की आंख खुली तो रेलगाडी के मंद मंद हिचकोलो का एहसास हुआ। प्यास से गला सूख रहा
था। पतले तकिए पर सिर घुमाते हुए कितनी देर उठूँ, उठूँ करते रहे। खिडकी के कोने से
ठंडी हवा का झोंका आ रहा था। कल रात सोने से पहले एक बार टॉयलेट हो आए थे मुनीम।
पॅसेज में यात्री ठूंस - ठूंस कर भरे थे। बैठे बैठे ही सो रहे थे। वॉश बेसिन के
ठीक आगे एक बुढिया घुटने में मुंह डालकर सो रही थी। असंख्य बक्से, पोटलियां और
थैलियां लदी पडी थी। हर स्टेशन पर नागपूर जानेवाली एक भारी भीड का रेला डिब्बे में
घुस रहा था। वे सारे बगैर टिकट ही जा रहे थे यह साफ झलकता था। टीसी से शिकायत की
तो वह उलटा बरस पडा - 'क्या ट्रेन रोक कर इन गरीब बेचारों को बीच में ही उतार दूँ?
गाडी कोई आपकी प्रायव्हेट जागीर समझ रख्खी है?' मुनीम अवाक् । हरिभाऊ ने ही समझाआ
था - 'अरे बाबा, साल में एक बार बाबासाहेब आंबेडकर के निर्वाण दिवस पर ये सारे नागपूर
की चैत्य भूमि पर इकट्ठा होते हैं।' तब कहीं जाकर मुनीम को बात समझ में आई।
मुनीम ने
नीचला बर्थ हरिभाऊ को दिया था और खुद बीच वाला बर्थ ले लिया था। वहीं से हरिभाऊ को
देखा जा सकता है। मोटी सोलापुरी चादर से गला, कान और सिर ढाँककर सो रहे थे। खुले
मुंह से सांस ले रहे थे। नाक से खर्राटे की हल्की हल्की आवाज आ रही थी।
मुनीम उठकर
बाथरुम तक हो लिए। बाहर आकर वॉश बेसिन पर ठंडे पानी के छींटे आंखे पर मारे तो थोडा
अच्छा लगा। छोटे तौलिए से चेहरे को मलमलकर पोंछने कगे। अब बर्थ पर बैठे बैठे सुबह
की नमाज पढ लेंगे। तभी दरवाजे पर खडे युवक की नजर से मुनीम अस्वस्थ हो गए। दांतो
में ब्रश दबाए वह पूछ रहा था कहाँ जा रहे है ?
टूथपेस्ट
का झाग वॉश बेसिन में थूककर उसने फिर पूछा कहाँ जा रहे हैं?
'पुरी जा रहा हूँ । क्यों ?' आशंका से मुनीम ने उत्तर दिया।
'पहुंच
पायेंगे इतनी दूर तक ?' उसकी लाल आँखे बता रही थीं कि रातभर सो नही पाया होगा
। 'बाबरी मस्जिद ढहने की खबर सुनी नही अब
तक?' मुनीम का सारा शरीर थरथरा गया। कोई उत्तर नही निकला। 'पेपर नही पढते हैं
क्या? ऐसे अंचभित क्यों देख रहे हैं मेरी ओर?' लेकिन मुनीम की मानो वाचा ही बैठ गई
हो।
'अभी लोग
जागना शुरु नही हुआ है। नागपूर स्टेशन आने में एक घंटा है। तब तर यह दाढी निकाल
दीजिए। लुंगी बदलकर धोती या पायजामा डाल लीजिए। आपके पास पायजामा ना हो, तो मैं
देता हूँ, आइये।' फिर मुनीम की आंखो में अजनबियत का भाव जान कर बोला, 'हाजी अब्दुल
मोहसिन मेरे पिता के टीचर रहे थे । शायद पहचाना नही आपने। मैं केतन देशमुख हूँ -
नाना देशमुख का भतीजा।'
मुनीम को
झक्क से सारा याद आया । रायपुर में इस परिवार की कपडे और गहनों की बडी दुकान है।
वैसे देशमुखों में कोई व्यापार करनेवाला परिवार नही होता. लेकिन अब्दुल मोहसिन से
इनकी बाबत सुना है। बचपन में मां - बाप गुजर जाने पर नाना ने अपने छोटे भाई के साथ
मामा के घर में बडे अपमान का जीवन जिया। एक बार रास्ते पर खडा रो रहा था तो मोहसिन
मास्टरजी उसका हाथ पकडकर घर ले आये थे। खुद ले जाकर स्कूल में दाखिला करवाया था।
आगे उसका छोटा भाई आबा भी उसी स्कूल में पढा था।
लेकिन केतन
का लाया हुआ पायजामा और सेफ्टी रेजर मुनीम ने नही लिया 'रहने दे , मैं ठीक हूँ ।
हरिभाऊ उठा होगा। उसे हाथ से पकड कर धीरे धीरे बाथरुम तक लाना होगा।' एक पांव
घिसटकर चलने वाले हरिभाऊ और मुनीम की जोडी को लोग अचंभे से टकमक देख रहे थे।
दिन
धीरे-धीरे ऊपर चढता गया और ट्रेन का माहौल भी गंभीर होने लगा। कुछ फुसफुसाते स्वर,
कुछ नजरों के इशारे डिब्बे के इस छोर से उस छोर तक फिर रहे हैं। नजरें मुनीम की ओर
उठती है और वहीं ठहर सी जाती हैं। आशंका, अकुलाहट, डर, बेचैनी ---------।
नागपुर स्टेशन
पर अखबार भी दुगने चौगने दाम में बेचे जा रहे थे। हर अखबार में वही हेडलाईन -
बाबरी मस्जिद ढहाने की। जिन्हें अखबार नही मिला वे गर्दन उंची कर दूसरों के अखबार
पढ रहे हैं। पन्ने एक-एक बिखर कर एक हाथ से दूसरे हाथ जीर्ण होकर पहुँच रहे हैं।
देशभर में बंद का आवाहन है। नागपुर के बाद स्टेशन पर स्टेशन बिना भीड के गुजर रहा
है। चाय-पान बेचने वाले भी नही दिखते। वो तो भला हो हरिभाऊ की बहू का । दूध में
आटा सान कर रोटियाँ बना दी थीं ताकि सफर भर खराब न हों। साथ मे आलू की सूखी सब्जी
और कच्चे लहसून की चटनी। सीट पर अखबार बिछा कर उसपर पेपर प्लेटों में हरिभाऊ ने
खाना रख दिया - 'आओ मुनिम, कुछ खा लेते हैं।'
रायपुर
स्टेशन छोडकर जरासा आगे गाडी रुक गई। आधा घंटा, फिर एक, फिर तीन घंटे। रेल्वे लाईन
पर शायद कोई लाश सी पसरी हुई थी। फिर सांझ घिर आई। गाडी में भी बत्त्िायां गुल
थीं। बाथरुम में पानी खत्म हो गया। एक डर और दहशत गाडी को घेरे हुए थी। कुछ
उत्साही युवक स्टेशन तक जाकर पूछताछ कर आए। शहर में मानों जनता विरुद्ध पुलिस का
युद्ध चल रहा है। पुलिस के पास आंसू गैस है तो उनके पास पत्थर और शीशे की बोतलें।
मुनीम का गला कब से सूख रहा है। पेट में डर का गोला सा घूमता
है। हरिभाऊ ने अपनी विष्णु सहヒानाम
की पोथी
निकाली और खिडकी से बाहर लैम्पपोस्ट की रोशनी में बांचने का प्रयास करने लगे। फिर
उसे समेट कर जेब में रख लिया - 'यह तो मुझे वैसे ही याद है।' उनके सिलवट भरे चेहरे
पर पिछले तीन चार घंटो मे ही कुछ और सिलवटें आ गई हैं।
डिब्बे में
जो खुसर - फुसर हो रही है, उसमें कितनी हरिभाऊ के कानों में आ रही हैं? जो डर और
आशंका मुनीम के मन में है वह हरिभाऊ से कहते नही बन रहा। लेकिन हरिभाऊ ने खुद बात
चलाई - 'देखा भाईजान, जब देश का बटवारा हुआ था तब भी ऐसा किसी ने नही किया था।' और
आज भी इस कांड में कौन पिस रहा है ? गरीब मजदूर, हॉकर्स, रिक्षावाले, झोंपडी के
लोग, जो हाथ पर पेट लेकर रोज की रोटी के लिये निकलते हैं। भिवंडी के दंगो में भी
वे ही मरे । 'वे न तो हिंदु थे, न मुसलमान । वे केवल गरीब थे।'
उस
अनिश्च्िात वातावरण में मुनीम चुपचाप लेट गए। ट्रेन धीरे-धीरे चल पडी थी। किसी ने
कहा - सात घंटे देरी से चल रही है। अब किसी की आज्ञा में नही है। अपनी मर्जी से
कभी तेज चलती है, कभी सुस्त। अभी रुक गई है । कौन कौन चढ रहा है ट्रेन में ? कहाँ
से अचानक आ गई है ये भीड?
एक तीव्र
स्वर उठा 'हो-हो-हो' हाथ में लाठी - काठी लिये छह - आठ लोग मानों आकाश भेद कर
डिब्बे में घुस आए। धक्के मार कर लोगों को जगाने लगे । उठाकर बैठाने लगे। एक
अनजानी चपलता से हरिभाऊ उठ खडे हुए। लटपटाते हाथों से लाठी थाम रखी थी और उसी को
तौल कर आक्रमण की मुद्रा में आ गए थे। वह लाठी उठ गई तो हरिभाऊ खडे नही रह पायेंगे
यह केवल मुनीम ही जानते थे। लेकिन वह मौका नही आया। बवंडर की तरह उन लाठीधारी
युवकों को ठेलता हुआ केतन सामने आया। मुनीम को क्रूरता से बाजू पकड खींचता हुआ
बोला 'उठ बे साले, आज तुझे खतम करता हूँ।'
तो यह उतरा नही था रायपुर में। उन्हीं का पीछा कर रहा था शायद मौका ताकता
हुआ।
एक अजヒा
भालू की तरह केतन ने मुनीम के बूढे शरीर को उठा लिया और भीड को चीरता हुआ बाथरुम
में ले जाकर पटक दिया 'अब तू मेरे हाथ आ गया है सूअर' उसने दरवाजे को अंदर से
सिटकनी लगी दी। फिर दबे स्वर में बोला - 'कहा था दाढी हटाने को, पर आपने बात नही
मानी । अब बिल्कुल चुप बैठना। वे सभी साले ठर्रा पीकर आए हुए हैं, समझ जाऐंगे तो
जान से काट देंगे । आपको भी और मुझे भी। मैं जा रहा हूँ। अंदर सिटकनी बंद ही रखना
जब तक मैं पुकारने न आ जाऊँ। हरिभाऊ को मैं संभालता हूँ।' और झट से दरवाजा खोल कर
वह निकल गया।
अंधेरे में
किसी तरह सिटकनी चढाकर मुनीम धप्प से बैठ गए। रोना चाहकर भी रुलाई नही फूटी। खिडकी
से आती हुई ठंडी चुभती हवा का सामना करते हुए बैठे रहे। ट्रेन कब चल दी ख्याल ही
नही आया।
-------------------------------------------
ज््र --------------------------------------------------
मध्यरात्री
के समय किसी ट्रेक्टरवालेने उन्हें पुरी के मेन चौराहे पर उतार दिया। विशाल, चौडा
राजमार्ग चारों दिशाओं में जा रहा है। लेकिन रास्ते पर जीवन का स्पंदन कही नही
दीखता। चार-पाँच की टोली में अलग-अलग दिशाओं से कुत्तों के रुदन के स्वर आ रहे
हैं।
शहर यों लग
रहा है जैसे किसी स्वस्थ गोलमटोल शिशु को नींद की दवा देकर सुला दिया हो। ट्रेनें
आज
नही चलेंगी। बसें भी बंद हैं। दोपहर को कर्फ्यू हटा लिया गया
है, लेकिन शहर का जीवन अब भी भयाक्रांत है । कोई लम्बी सांस भी लेने की जुर्रत नही
कर सकता। मुनीम और हरिभाऊ जाने कैसे कैसे यहाँ तक पहुँचे हैं। पहले एक जीपवाला और
फिर एक ट्रेक्टर वाला। किराया भी तिगुना, चौगुना या दसगुना । तिसपर सौ मिन्नतें
भी। सारे पैसे यूं ही खर्च हो गए तो? वैसे हरिभाऊ के लिये स्वतंत्रता सैनिक की
पेन्शन थी। उन्हें, और साथ में एक अटेंडेट के लिये रेल का आने जाने का पास था। तभी
तो वे और मुनीम सोच पाए इतनी दूर आने की। लेकिन जीप और ट्रैक्टर वाले का भी क्या
दोष? ऐसे मौके पर दया दिखाकर भाडा छोड दे तो बीस रुपये किलो आलू कैसे खरीदे?
'अब आगे कैसे जाना है मुनीम?' हरिभाऊ ने पूछा। समुद्र में
भटकती अकेली नाव की तरह उनकी हालत है। राह पूछने के लिये भी कोई राहगार नही दिखता।
बेटे का पता लिखा कार्ड मुनीम ने ऊपरी जेब में संभाल कर रखा हुआ है। बेटे ने उस पर
एक कच्चा नक्शा भी खींच दिया था। बार-बार जेब पर हाथ फेर कर मुनीम तसल्ली कर लेते
हैं कि वह कार्ड हैं।
चौराहे से निकलने वाले एक रास्ते पर सारे इक मंजिले घर हैं।
उधर ही जाना है। कहीं मुड़ना भी नहीं है। नवमी के चाँद की रोशनी में शहर दुधिया गया
था। बेटे का घर खोजने में परेशानी नहीं
हुई। गुलाबी घरों की कतार में यही एक घर है जिस पर क्रीम कलर की पेंट की गई है।
छोटे कंपाउंड में फ्लावर बेड्स बने है और कोने में मौलसिरी के पेड़ की पहचान दिख गई
है।
गेट पर आकर कांपती आवाज मुनीम ने पुकारा - 'शकील, ओ शकील।'
देर तक कोई हलचल नहीं दिखी। भय की लहर मुनीम को सिर से पांव तक थर्रा गई । लड़का
कहीं चला गया हो तो ? या फिर- क्या पता - आवाज सुनकर इसी क्षण पास पड़ोस के दरवाजे
खुल जाएं और हाथ में लाठीयाँ लिये परछाइयां टूट पड़े? लेकिन ऐसा कुछ भी नहीं हुआ।
आते हुए शकील ने पूछा कौन है? और फिर टार्च में देख कर बोला -'अरे अब्बा,हम तो
परेशान थे, कि गाड़ियां तो चल ही नहीं रहीं। कैसे हैं - हरिचाचा?' पीछे से गाउन
पहने फातिमा भी आ गई।
होठों के नीचे जख्मों के निशान, कपड़े भी गंदे, मटमैले लेकिन
मुनीम ने आँख से ही हरि-भाऊ को इशारा किया। एक बुढऊ दूसरे की बात समझ गया। हरिभाऊ
ने हंस कर कहा - 'देखो ना, हमें भी यही मुहूर्त मिला आने को। तुम लोग ठीक हो ना ?
दंगा वगैरा तो नही हुआ ज्यादा ?'
'नही, यहां की पॉश वस्ती में दंगे की कोई बात नही है। कर्फ्यू
भी नही था। इधर फिर शकील भी तो यहाँ की मुहल्ला पीस कमिटी का सदस्य है। हां मेन
बाजार में दुकाने बंद रहीं। सब्जी मंडी भी बंद है। केवल आलू प्याज मिलेंगे। लेकिन
एक बात हुई। तीर्थ यात्रियों की भीड हट गई है। कौन आएगा इस माहौल में पुण्य की
लालच लेकर ? जो यहाँ आ चुके थे वे भी धर्मशाला में बैठकर राह देख रहे हैं कि
गाडियां चलें तो वे भी निकल जाएं।'
बातें होने लगी। फातिमा ने एक बार फिर रसोई का चार्ज ले लिया।
वहीं कुर्सी लगा कर हरिभाऊ और मुनीम भी बैठे हैं। मसूर दाल में तडके की सुगंध भूख
को बढा रही है। धीरज छूट रहा है। आज तो इनके घर में मांसाहारी कुछ नही पका होगा।
बाजार में मिले तब तो । वैसे भी खाते समय शकील ने डिक्लेअर कर दिया - 'फातिमा, हरीचाचा
हैं तब तक घर में शाकाहारी खाना ही पकेगा।'
उन्हें
खिलापिलाकर शकील और फातिमा तो सो गए। लेकिन मुनिम की आंखो में नींद नही थी। मन का
डर एकदम कैसे चला जाय? नींद तो हरिभाऊ के पास भी नही आई। सुबह उठकर देवदर्शन को
जाऊंगा यही उतावलापन मन को ललचाता रहा। दो दिन के सफर के सारे कष्ट कबके धुल गए
थे। सुबह उठते ही पहले वही सवाल। शकील ने कुछ नाराजी से कह भी दिया 'थोडा धीरज
रखिए। शहरकी हालत तो देख ही रहे हैं। कैसे जायेंगे? साथ में किसी को देना पडेगा।
अब्बाजान, आप तो नही जाएंगें।'
'मैं
हरिभाऊ के साथ जाऊँगा।' मुनीमने निश्चयपूर्ण कहा। 'मंदिर के बाहर बैठने पर तो किसी
की कोई रोक नही है ना।'
पडोस का ही
एक युवा वकील दोस्त है शकील का। उसकी पहचान में एक गाईड भी है। पुरी के मंदिर का
इतिहास भूगोल बखान करने वाला। उसी को बुला भेजा शकील ने। मंदिर के शिल्प की कथा
सुनाने में माहिर था। 'एक बार इस मंदिर में लगा दस मन का पत्थर गिर पडा । वह भी
दिन में। लेकिन किसी को खरोंच तक नही आई। सब बच गए। और मंदिर माहात्म्य की कथा भी
पढ लीजिए। उसमें लिखा है कि जब प्रलय आएगा तो समुद्र की मछलियां भी सीढी चढ कर ऊपर
आ जायेंगी। लेकिन जगन्नाथ जी तब यहां नही होंगे। वे चले जाएंगे छतिया के मंदिर में
। 'अच्छा, पानी इतने ऊपर चढेगा ?' आश्चर्य और आनंद से हरिभाऊ की आंखे चमक रही थीं।
अब बस, गर्भगृह तक पहुँच कर देव को देखने की ललक रह गई है।
क्यों भाई,
सुना है तुम्हारे यह जगन्नाथ जी बडे ही अनगढ है । हमारे राम, दत्तात्रेय या
लक्ष्मीनारायण सभी की मूर्तियाँ कितनी सुघड मनोहर बनती हैं। फिर भी लोग आ जाते हैं
दर्शन के लिये?'
शकील हंस
कर बोला - 'पहले जाकर तो आइये। पास से देख लीजिए देवता को। फिर तय करिए कि मनोहर
है या नहीं।'
दोपहर की
चाय पीकर तीनों निकल पडे। शहर में आज पूरी शांति थी। कोर्ट खुल जाने के कारण वकील
उनके साथ नही जा सका।
हरिभाऊ और
मुनीम को मंदिर के पास छोडकर गाइड चला गया । मुनीम भी समुद्र तट पर आ गए। बालू में
किसी ने अपनी नांव उलटी रखी थी। उसी पर बैठ गए। सामने अथाह समुद्र शांत था। सूरज
पश्च्िाम में अस्त होने जा रहा था और चाँद की फाँक काफ़ी ऊपर आ चुकी थी । हरे पानी
में नीले आकाश का प्रतिबिम्व और सूर्य की तिरछी
किरणें - रंगों का एक अलग संमिश्रण बन रहा था । देर तक उसे ही देखते रहे
मुनीम । एकाध लहर आकर धीरे से पैरों के
नीचे से निकल जाती तो सरकती बालू पांवों को गुदगुदा जाती । पानी में थोड़ा आगे जाकर
चार पाँच युवतियां और दो-तीन बच्चे मचल रहे थे। उनमें लाल साड़ी पहने एक लड़की ठीक गौरी की तरह लग रही थी । ऐसी
ही षोडशी, साँवली, बारिश में नहाई लता की तरह ।
मुनीम के दिमाग़ में कौंध गया शकील का म्लान चेहरा - जब गौरी
की शादी हुई थी। उदास लाल आँखों - शून्य में खोई हुई सी - अस्वस्थ । मुनीम को लगा
- लड़के का मन पहचानने में देर कर दी । लेकिन पहले समझ भी लेते तो क्या उपयोग होता
? क्या पता ? एक आह मुनीम के गले से निकली । और देखो तो फातिमा में क्या बुराई है - कान्व्हेंट से पढ़ी है, स्मार्ट है
। स्वभाव से अच्छी है, रसोई और घर सँभालने में माहिर है । हरिभाऊ के दिल में क्या
था क्या पता - कभी मुंह खोलकर उसने भी तो कुछ नहीं कहा । पुरी दर्शन के लिए शकील
के पास जाने की बात पर भी बूढ़े ने अपनी मन की बात खोल कर नहीं कही थी
पता नहीं
उसे कैसा लग रहा है ।
समय बीत
रहा था । आकाश अब अँधियारा होता जा रहा है । तीन वर्ष पहले मुनीम अपनी पत्नी के
साथ हज गए थे । काबा के ऊपर आसमान में तब
भी ऐसा ही चाँद - चमक रहा था । उसे
निहारते हुए अल्लाह का दुआ माँगने में कितनी शांति मिली थी । मानों .जिंदगी के तमाम पाप-पुण्यों का हिसाब
पूरा कर नीचे एक लाइन खींच दी हो । अब केवल परलोक का ही विचार । पहले गाँव में
किसी के घर से पूजा का प्रसाद आ जाना तो मुनीम इन्कार नहीं करते थे - लेकिन अब वे
पाप-पुण्य से ऊपर उठ गए हैं । दो दिन
गाड़ी में नमा.ज नहीं पढ़ पाये तो कितनी बार खुदा से मुआफ़ी माँग चुके हैं । शकील तो
खैर, नमा.ज ही नहीं पढ़ पाता - काम का.जी
लड़का है । क्या पता हरिभाऊ ने नोट किया या नहीं कि मुनीम अब केवल उस पार की सोचता
है । अब केवल राह देखनी है - जब भी अल्ला का बुलावा आ जाय - कह सकेंगे - 'मैं
तैयार हूँ ।'. आज, अभी इसी बालू में
लेटकर गुजर जाना पड़े तो भी मं.जूर है ।
पालवाली
नावें अब समुद्र में दूर दूर से लौटने लगी थीं । जैसे रंगबिरंगी पतंगे आकाश
में कलाबा.जी खा रही हो । कोई तट तक
पहुँच जाती है तो उसका मालक ते.जी से पाल समेटने में मशगुल हो जाता है ।
दूर से
दिखा - हरिभाऊ आ रहे थे । लकवे वाले पैर
बालू में घिसटने से तकलीफ बढाता होगा। हाथ की लकड़ी भी तो बालू में धँस जाती है
। कोई भाविक हाथ पकड़कर यहाँ पहुँचा रहा
है ।
रात के
स्निग्ध अँधेरे में दो बूढ़े समुद्र तट पर बैठे हुए हैं । देर तक दोनों चुप रहे ।
एक लड़का कहीं से चाय की दो प्यालियाँ पकड़ा गया ।
दो घूँट लेकर हरिभाऊ बोलने लगे ।
क्या कहूँ
मुनीम भाई, कब से इस दिन की राह देख रहा था। कैसी होगी मूर्ति, कैसा होगा रूप
? ऐसा अनगढ़, अधूरा देवता तो कभी देखा
नहीं । कल रात पड़े पड़े भी यही विचार था । और आज क्या बताऊँ - क्या अद्भुत हुआ । गरुड़ स्तंभ से आगे चला गया मैं । भीड़ का
कोई निशान नहीं । मन भर कर देख पाया जगन्नाथजी को । सामने पंचदीप जल रहे थे । मैं
एकटक देख रहा था । जान मुठ्ठी में लेकर यहाँ तक आया था । वही जान आँखों में भरकर उन्हें देख रहा था। देखते देखते मानों
आँखों का पडदा हट गया। भाई जान, क्या बताऊँ कि क्या रूप लावण्य था । दो आँखों में
न समाने वाला । तुम्हें भी क्या बताऊँ । तुमने तो देखा ही नहीं । जो मैंने देखा वह
आँखों में नहीं समाया, जो कह रहा हूँ वो शब्दों में नहीं समाता । लेकिन तुम्हारे
ही कारण देख पाया हूँ यह दिन । वरना इसे लूले हाथ पाँव को लेकर कहाँ जा पाता ?
इतने तीर्थ घूम आया हूँ । लेकिन यहाँ आकर
ऐसा लगा जैसे पाप पुण्य से उबर गया हूँ । अब यदि मौत को भी आना हो --------अभी इसी
बालू तट पर --------।
हरिभाऊ
अँधेरे में देख नहीं सके । मुनीम की
आँखों से धार बह चली थी । चेहरे के ता.जा घावों को भिगोते हुए आंसू पैरों तले
बालू में समा रहे थे -------।
---------------------------------------------- न्
-------------------------------------------------------
अनुवादक की
ओर से ------यह कथा घटती है महाराष्ट्र के किसी गाँव में । वह कोई भी गाँव हो सकता है, लेकिन मुझे लगता
है कि वह मेरा ही गाँव है । लेखिका
बंगाली है। वह कोई भी हो सकती थी - लेकिन यह लेखिका मेरी भाभी है और उसकी पोस्टिंग
भुवनेश्र्वर - पुरी इलाके में है । उसने जैसा मेरा गांव देखा, वैसा उतार दिया -
अपने बंगाली न.जरिया से ।
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें