रविवार, 23 मार्च 2008

श्यामा भाग 1 (पान-२) पूर्ण

शामा

श्यामा
भाग 1 (पान-२)

'हा निरोप तुम्हाला सुषमा ने सांगितला?' नितीन ने थक्क होऊन विचारले।

'छे छे मलाच वाटल!' शामा क्षणभर घुटमळली. बोलाव का बोलाव अशा संकोचात? पण दुसप्याच क्षणी हसू म्हणाली- 'पण तों फोटो खरच छान येईल हं, बघाच तुम्ही'.

नंतर नितीन ने सुषमा चा त्या खास अँगल ने फोटा काढला होता- ते फंक्शन संपून गेले. रोल धुऊन आल्यावर नितीनने सगळे फोटो पाहिले अन्‌ सुषमाचा तो फोटो आल्यावर तो खुळावून बघतच राहिला. फोटो अप्रतीम आला होता. लांवसडक डूल तिच्या लांबोळया चेह-यावर खुलून दिसत होते. त्यांची आभा चेह-यावर पडलेली स्पष्ट जाणवत होती. तिचे धारदार नाक आणी पापण्यांचे लांब केसही फोटोत ऍक्सेंच्युएट झोले होते. पापण्या अर्धोन्मिलीत होत्या. जणू वळवाच्या पावसात भिजायला जावे. आणी पावसाचे पहिजे चार थेंब अंगावर पडल्यानंतर पुढल्या सरींची उत्कठेने वाट बघावी तसा प्रतीक्षा उत्कंढेचा भाव तिच्या अर्धवट मिटल्या डोळपातून प्रकट होत होता. नितीन खूष झाला. या फोटोचे काय करू अन कांय नको असे त्याला होऊन गेले. त्याचे वेगवेगळे एनलार्जमेंट साइझ त्याने करायला टाकले. इतक्यांत सुषमाला फोटो बद्दल कांही सांगायचे नाही असे त्याने ठरवले.

पण दुस-या दिवशी लांबून शामा लायब्ररी कडे जातांना दिसली तेंव्हा त्याला राहवले नाही. तो धावतच लायब्ररीत गेला. शामा रॅकजवळ पुस्तक शोधत होती तिच्या जवळ जाऊन नितीन ने तिला फोटो दाखवला.

'ओह! काय सुंदर निसतेय नाही सुषमा? सिनेमात काम करायला गेली तर हेमा मालिनी नंतर हीच अस लोक म्हणतील'

'अच्छा, तिला कुणीतरी अस सांगायला पाहिजे!' नितीन थोडया थट्टेने म्हणाला. सुषमा लोकांना त्यांचे सल्ले झिडकारण्यांत पण पटाइत होती. अर्थात हे शामाला माहित नसणार ती म्हणाली- 'यू आर्‌ राइट. मी आजच तिला सांगते.

तेवढयांत 'शामाताई, हे पहा तुमच्यासाठी एक चांगल पुस्तक आणलय' म्हणत फॅब्रिकेशन सेक्शन चा फोरमन आला आणि शामा. 'एक्सक्यूज हं मी जरा यांच्याबरोबर जातेय' अस सांगून तिकडे वळली.

नितीन परत आला. मुबईच्या एका मासिकाने फोटो स्पर्धा जाहीर केली होती त्यासाठी त्याने सुषमाचा हा फोटो इतरही चार पाच फोटो पाठवून दिले. का कुणास ठाऊक पण आपल्याला स्पर्धेत नक्की बक्षीस मिळणार असे त्याला वाटले. सहज त्याच्या मनात विचार आला- ही शामा थोडी वेगळी वाटते. परवा तिने बिनदिक्कत आपल्या खांद्यावर हात ठेवला म्हणून थोडी आगाऊ वाटली पण तिची फोटोग्राफीची जाण चांगली आहे. आणी फोटो पाहिल्यावर कांय बोलली- तर पाहून आपण म्हटले होते- वा नितीन, यार कांय साधलीय्‌ तुझी फोटोग्राफी! हिने पण म्हटले असते- 'पहा, मी सांगितल होत ना छान फोटो येईल म्हणून'- तर आपल्याला राग नसना आला. खर तर तिच्या सल्ल्याच क्रेडिट तिला द्याव यासाठीच आपण लायब्ररीत गेलो होतो. पण हिला जाणवल होत ते फक्त सुषमाच सौंदर्य- स्वतःच्या सल्ल्याच मोल पण वाटल नव्हत.

तेवढयात शुक्‌ शुक्‌ नितीन, अशी हाक कानावर आली. तो वळला- मागे सुषमा आणि जयेंद्र उभे होते- काय रे तू सुषमाचा अगदी टॉप फोटो काढलायस म्हणे. मग दाखव की लेका जयेंद्र म्हणाला 'हो ना समारंभात काढलेले फोटो दाखवायचे असतात म्हटल' इति सुषमा! 'पण आता माझ्याजवळ त्याची कॉपी नाही उद्या दाखवतो' - मग शामा कशी म्हणाली तिने पाहिला म्हणून- खर तर तिनेच ठेऊन घेतला असता तर मला लगेच बघता आला असता' उद्या नक्की दाखवले असे म्हणून नितीनने वेळ मारून नेली. मग चार दिवस तो कॉलेजात फिरकलाच नाही.

आणि आठ दिवसांपूर्वी त्या फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल लागला तोच मुळी नितीन सुषमाला आश्चर्याचे आनंदाचे धक्के देत. स्पर्धेत सुषमाच्या फोटोला पहिले बक्षिस पाचशे रूपये मिळाले होते. तर सुषमाला दोन ऑफर्स आल्या होत्या. ज्या कीर्तीकर ज्वेलर्सने इयरिंग्ज बनवल्या होत्या त्यांनी तिला त्यांच्या दागिन्यांच्या मॉडेलिंग साठी पाच वर्षे बुक करून घेतले होते तर सुप्रसिद्ध दिग्दर्शक कुणाल यांनी त्यांच्या नव्या चित्रपटात सहनायिकेचा रोल दिला होता. परीक्षा दोन महिन्यांवर आली होती. शेवटचा पेपर संपवून लगेच सुषमाने मुंबईला कुणालांकडे जायचे असे ढरले होते. त्यांच्या कॅमेरामन ने देखील नितीनची चौकशी करून ठेवली होती. या सर्व गडबडीत नितीन शामाबद्दल विसरूनच गेला होता. तो आज त्याला आठवण झाली. शामाला शोधून तिचे आभार मानायचे अस त्याने ठरवल. पण मुलामुलींच्या घोळक्यांत ती कुठे दिसली नाही. मुद्दाम कुणाकडे चौकशी करावी अस कांहीही घडलेल नव्हत.................
 ...........................................



कोई टिप्पणी नहीं: