शुक्रवार, 5 मई 2017

कोण मी कोण मी On C2 to upload (आधीचा भाग राहिला आहे

कोण मी कोण मी -- (आधीचा भाग राहिला आहे)

अलीच्या प्रश्नांवर आतापर्यंत मंत्रीमंडळाच्या दोन-तीन बैठका झाल्या होत्या. सरकारम्हणणं होतं की अली हा एक खास पक्षी तज्ज्ञ आहे, म्हणून त्याच्या सुरक्षेची  पूर्ण जबाबादारी सरकारने घेतली आहे. ती सरकार पूर्णपणे पेलणार आहे . प्रत्येक स्तरावर ही सुरक्षा राखली जाईल. पण सरकार म्हटलं म्हणजे त्याचा खाक्या लोकांना माहीत असतो. जाहीरपणे जे बोललं जात, प्रत्यक्ष त्याच्या अगदी उलट असतं .सरकारी सगळी वाक्यं भविष्यकालदर्शक तरी असतात किंवा विध्यर्थ म्हणजे अमुक - तमुक व्हायला पाहिजे अशीत्यामुळे वर्तमानकाळात गुन्हेगार त्यांचे कांम बिनघोर चालू ठेवू शकतात. असलं अंडरस्टॅण्डिंग सरकार आणि माफिया यांच्यामधे अलिखितपणे- तयारं झालं होतं सरकारच्या सध्याच्या घोषणांमधे सुद्धा ही मेख होती-.
अलीवर यामुळे जे संकट येणार होतं . त्याची  कल्पना त्याला आलेली होती. त्याचं  फिरणं बरसं कमी करावं लागणार होतं . आपण पक्षी झाल्याची आता त्याला खंत वाटू लागली . तो पक्ष्यांप्रमाणे स्वच्छंद आणि मुक्त राहू शकणार नव्हता आणि पुन्हा माणसांतही परत जाऊ शकणार नव्हता. त्याला फजल ताविशचा  एक शेर सारखा आठवत होता-
"मैं हवा, पानी, परिंदा कुनही।
ये नदी जाने कहां तक जायेगी।"

-----
जंगल आता शिकाऱ्यांनी आणि पारध्यांनी गजबजून गेलं होतं. अली लपून पून वावरत असे . इतर पक्ष्यांकडून त्यांची  माहिती घेण्याची गोष्ट बाजूलाच पडली . अशा त-हेने होणाऱ्या उपद्रवांची त्याने कल्पनादेखील केली नव्हती. राजनीती आणि नोकरशाहीचे  तंत्र त्याला ठाऊक नव्हते. पक्ष्यांपलीकडंच्या माणसांचे जग किती विनाकारण क्रूर असू शकतं हे त्याला आता कळत होतं , सगळ्यात दुःखाची गोष्ट अशी होती की त्याला पकडण्याच्या मोहिमेत कित्येक इतर दुर्लभ पक्ष्यांची देखील हत्या आणि पकडापकडी होत होती. कित्येकदा त्याला वाटायच..........  आणि तो लपण्यासाठी नव्या जागेचा शोध घेत फिरायचा . तसं पाहिल तर सगळ्यापक्ष्यांमधेही
खळबळ माजली होती. त्यांच्यावरील संकट आणि त्यातून सुटकेचा मार्ग त्यांना कळत नव्हता. निसर्गदत्त बुद्धीने काही वेळा संकट ओळखता येत असे एवढंच. कुठे जावं आणि काय करावं तेपक्ष्यांना कळत नव्हत. पोपट आणि मैना थोड फार माणसांरखं बोलू शकत . तेही आता गप्प झाले होते. जंगलातील पक्ष्यांची  किलबिल संपून वातावरण आता गप्प- गप्प उदासवाणं झाल होतं.

अलीला मनुष्य बोली बोलता येण्याचा एक फायदा झाला होता. शिकाऱ्यांची टोळी त्याच्या जवळपास आली की तो मानवी आवाजात बोलत असे अरे तिकडे , तिथे नाही इकडे -या सागवानात- अरे येडपट, तिकडे त्या करवंदाच्या जाळीत. शिकारी मोठ्या टोळ्यांनी फिरत . त्यांना वाटायत्यांच्यातलाकुणी तरी बोलला, मग ते पुढे निघून जात. अशा प्रकारे अलीने कित्येकदा स्वतःचा जीव वावला होता. हळूहळू  त्याला हा खेळ वाटू लागला. शिका-यांना कवण्यात त्याला सूड उगवण्यासमाधान वाटू लागलं . एखाद्या कठीण रस्त्यावर त्यांना लावून दिलं आणि तिथून दमून- भागून हात हलवत ते परत आले किंवा एखाद्या काटेरी जाळीकडे त्यांना वळवलं आणि त्यांना बरंलागंल की अलीला मजा वाटायची . पण एकूण त्यांच संकट मात्र वाढतहोत. दोन दिवसांपूर्वीएक गोळी त्याच्या अगदी जवळून गेली होती. गेल्या कित्येक रात्री तो नीट झोपू शकला नव्हता कारण मोठ्या मोठया टॉर्च  आणि सर्च लाइटांनी जंगलाची  अंधारी सुरक्षितता संपवून टाकली होती.
हळूहळू दुसरीकडे एक वेगळी- मोहीम सुरू झाली . पर्यावरणवादी संघटनांनी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांच्या हत्याकांडाविरूद्ध आवाज उठवला. मग तर मोर्चे निघाले , धरणं धरलं गेलं , उपोषण झालीरॅली निघाल्या. या संघटनांना आंतरराष्ट्रिय एजन्सीकडून पैसे पुरवले जातात . त्यामुळे वर्तमानपत्रात आणि मीडीयावर त्यांच्या बातम्यांना चांगलं कव्हरेज मिळतं होत. विदेशी टि .व्ही आणि वर्तमानपत्रांचे रिपोर्टर आपापल्या कॅमे-यांसह  एकटे किंवा गटागटाने जंगलात फिरू लागले. सरकारची  एक नवीन डोकेदुखी होऊन बसली. आधी सरकारने पर्यावरणवादी गटांचे आरोप धुडकावून लावले. मग चौकशींआश्वासनं दिलं . इकडे आतूनच  माफिया टोळ्यांना गप्प बसायला सांगितलं . त्यामुळे शिका-यांची मोहिम बरीचशी थंडावली . अली आता या लपून पून जागण्याला कंटाळला होता. त्याला घराची  तीव्रतेने आठवण होऊ लागली. शेवटी एक दिवस तो त्याच्या सुरक्षित ठिकाणावरून बाहेर पडला आणि घराच्या दिशेने उडू लागला. त्या दिशेने सरसावून बसलेल्या कित्येक बंदुका गरजल्या. कित्येक गलोलीतून दगड उडवले. गेले.............
-----
प्रिय वाकं, यानंतर कायं झालं ते कोणालामाहित नाही. जितकी माणसं तितकी कथानंक! जसं अलीच्या पक्षी होण्याबद्दल कितीतरी सिद्धान्त पुढे आले, तसेत्याच्या शेवटाबद्दलही , कुणी म्हणे, ठीकआहे, किती दिवस वाला असता? एका छोटया पक्ष्याची  ही हिंमत, की इतक्या शिका-यांना इतके दिवस त्यांन झुलवत ठेवांव? थोडक्यात या लोकांमत होतं की अली त्यादिवशी मारला गेला आणि त्या छोट्या पक्ष्याशव फेकून दिलं . पण कुणी फेकलं ? कसं फेकलं? इतर लोकांनी काय डोळे मिटून घेतले होते? कुणीकसं बघितल नाही ? अशा नाना शंका, प्रश्न , उपप्रश्न! काहींमत होतं की पर्यावरणवाद्याच्या दबावामूळे आणि सरकारच्या आश्वासनामुळे त्या दिवशी शिकारी गटांच्या हालचाली थांबल्या होत्या. याचा  फायदा  घेऊन अली सहीसलामत आपल्या घरांत परत आलापण ही गोष्ट अगजी दबक्या आवाजात बोलली जायची  कारण दबक्या आवाजात बोलल्याने त्या गोष्टीची विश्वसनीयता वाढते. हो लोक म्हणत की आता अलीच्या बायकोने त्याला लपवून ठेवलं आहे . पहात रहा एखाद्या दिवशी जंगलाच्या सगळ्या अवैध गोष्टी अशा जाहीर होतील की मोठा भूकंप झाल्याप्रमाणे कित्येक मोठ्या लोकांच्या पॅण्टी ओल्या होतील . काही लोक निमित्त काढून अलीच्या घरी येऊन-जाऊन इकडे तिकडे डोकावयाचा प्रयत्न करीत , कुणी म्हणत की सरकारने पण पोलिस पाठवून त्याच्या घराची झडती घेतली, पण सरकारी अधिकारी हात हलवत परत आले .विभिन्न गोष्टी रण्यात लोक पटाईत होते. अशाप्रकारे कित्येक राईचे पर्वत निर्माण झाले.
पण काही लोक याच्याही पुष्कळ पुढे गेले होते. त्याच्या किश्श्यांना तोड नवहती . ते या घटनेंचे असं वर्णन करीत जणू याचि  देहि याचि डोळा ती घटना पाहिली . ते म्हणत- अहो साहेब, आम्ही स्वतः पहिलं आमच्या डोळ्यासमोर अलीला गोळी लागली. रक्ताचे दोन थेंब पण जमीनीवर सांडले. आणि नंतर काय झालं म्हणून सांगू! तुमचा विश्वास नाही बसणार! पण देवाशप्पथ सांगतो बघा, एक चमत्कार झाला. गोळी वितळून सोनेरी पाणी होऊन जमिनीवर ओघळली आणि अली? अलींतिथल्या तिथे दुस-या पक्ष्यांत रूपांतर झालं . अहाहा, काय त्यांरूप, काय त्याचा डौल! आणि साहेब त्याचा  वेग तर विचारूनका. डोळे ठरायच्या आत तो उडून कुठच्या कुठे दिसेनासा झाला होता! "
या गोष्टीवर विश्वास ठेवणारे लोकही शहरात भरपूर आहेत. त्यांच्याशी तुम्ही तर्कवितर्क केलात तर ते म्हणतात- जर मुळात एक माणूस पक्षी होऊ शकतो तर मग........
  अशीही एक अफवा आहे की शिका-यांच्या काही टोळ्या अजून जंगलात फिरताहेत आणि अलीला शोधताहेत! या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान शहरातील एका शायराने त्या पक्ष्यावर एक मृत्यूलेखही लिहिला. पण तेवढयात इतर कहाण्यांचा जन्म झाला. अलींमरणं अजून निर्विवाद ठरलेलं नाही. त्यामुळे हे शायर महाशय अजूनही तो मृत्युलेख खिशात ठेवून फिरत आहेत. कोण जाणे कधी ती बातमी येईल आणि शोकसभेत मृत्युलेख वाचावा लागेल!
(मूळ हिंदी- मैं, हवा, पानी , परिंदा कुनहीं!
फेब्रुवारी ९९ , हंस)















































कोई टिप्पणी नहीं: