शुक्रवार, 5 मई 2017

सदबुद्धि -- च हरवलेला --करेक्शन करणे


सदबुद्धि  -- च हरवलेला --करेक्शन करणे

सदबुद्धी
मूळ हिंदी कथा- कुमार नयन
अनुवाद-लीना मेहंदळे
--
असा काय गुन्हा केला होता आम्ही? हां! एककेलं होतं . यावेळी इलेक्शनमध्ये जाऊन मतं देऊन आलो होतो. हा काय असा मोठा गुन्हा आहे, ज्यासाठी दोन दोन पिढ्यांनातं विसरून गेले? बस हुकुम करून मोकळे झाले की, "आजपासून या लोकांना आमच्या बांसवाडयावर शौचासाठी याता येणार नाही. कुणी हुकुमाची बेदखल केली तर हरियासारखीअवस्था केली जाईल."
--

वद्य पक्षाची दशमीएकादशी असेलचंद्राची मंद कोर आकाशात जडवत थबकली वाटत होती. तिच्या अर्धवट प्रकाशात सगळं वातावरणं अंधूक अंधूक- होतं. सुमेसर बसलाय बांबू-या गजपणात. तिथून पूर्वेकडे दीड-दोनशे पावलां-या अंतरावर त्यां- डेरे पडलेले. वर्षानुवर्षें आणि इकडे पश्-म दिशेला जोगिंदर मिसिर- अवाढव्य कोठी , आणि कोठीसमोर- विस्तीर्ण अंगण . बांबू-या जाळीतून सुद्धा अंगणात पडलेल्या बाजा आणि त्यांवर झोपलेले मिसिर- पहारेकरी स्पष्ट दिसताहेत. सुमेसर- सगळं लक्ष त्यां-याकडे- आहे. विशेषतः एका बाजेखाली पहुडलेल्या अल्सेशिअन कुत्र्याकडे . तोही पाय ताणून झोपला आहे, पण मधूनमधून खात्री केलेली बरी
उकिडव्या बसलेल्या सुमेसरनं पायाला रग लागत्येयसं वाटून पाय थोडा हलवायला विचा फक्त केला. पण तेवढ निमित्त होऊन पायाखालची वाळकी पानं चुचुरली आणि त्या आवजानं सुमेसरला धस्स झालं . कुणी पहारा देणारा जागा झाला का? पण त्यां-यात काही हाल-ल नव्हती. अल्सेशिअनपण अजून तसा पाय ताणून झोपला होता. श्वास रोखून सुमेसर अवि-ल बसून राहिला.
-या- धाकधुकीनंतर तिकडे हाल-ल होत नसल्या- खात्री पल्यावर सुसेसर आपल्या कामा- वि-र करू लागला. म्हणजे शौ--. ते काम आता घाईने उरकायला हवं होतं. त्यांन पोट वारंवार दाबलं . कुंथून-कुंथून थकून गेला. इतरही प्रयत्न करून झाले . घरून आणलेल्या त
बाखू-या गोळ्यांपैकी दोन गोळ्या एव्हाना दाढेखाली गेल्या होत्या .पण आतडयातून काही- बाहेर निघत नव्हतं
सुमेसरनं ऐकलं होतं की , भीतीमुळे पोटात मुरडा येऊन हगायला होतं. कितीतरी किस्से! बलेसरकाका अजूनही बे-ळीस - त्रे-ळीस-या काळतला इंग्रजी अधिका-याला ललकारलं होत, तर भीतीनी त्या अधिका-या- पॅंट- पिवळी दिसली.
खोटं बोलतं असावा बलेसरकाका.इथ तर भातीनं गाळणं उडालेली आहे आणि पोटातलं -लनवलन मात्र शून्य . अर्धा तास होत आला. सुमेसरला आता वेळे- काळजी लागून राहिली . -र वाजायला कितीसा वेळ शिल्लक असेल अजून ? -र वाजले की तिकडे मिसिर-या अंगणात जाग यायला सुरवात होऊल. मग ते पहारेकरीपण बहिर्विधीसाठी इकडे- येऊ लागतील- हे एक नवीन कारण झाल काळजी करण्यासाठी - अंगणातल्या बाजांवर अजून काही हाल-ल दिसत नाही . अल्सेशिअन- शेपटी मात्र मधे- हलत्येय. कदा-त माशा बसत असाव्यात आणि तो शेपटींन उडवतं असावा.
सुमसेर त्या भयंकर हिंस्र कुत्र्यावर- डोळे रोखून बसला आहे.
- याला जरा वास जरी लागला आपण इथं असल्या- तर शरीरा- -के पडतील शरीराला थरथरून टाकत गेली .पण कुत्र्या- शेपूट आता पुनः शांत झाली होती. त्या-या जिवात जीव आला .असावा. वि-रां- -क्र पुनः सुरू झालं.
- कुणीहीकडून बघा . आज- त्या- निर्णय आणि शौ-साठी इकडं मिसिर-या बांबू-या वनात येऊन बसाय- कृती म्हणजे मुर्खपणा- कळस होता हे नक्की . असं -रासारखं इथे येण्या- वि-र त्यांन- का केला? त्यां-या डे-यावर बापये नव्हते का? आणि पुरूष- का, बायका आणि मुलं आहेत. ही समस्या काय त्या- एकटया- आहे? एकूण आठ घरं आहेत . घरटी मोठा परिवार. साठ-सत्तर माणसां- कबिला. सगळ्याना- परसाकडे जाण्या-या समस्येला एखाद्या मोठ्या अजगराप्रमाणं जखडून टाकलं होतं. आज तीन दिवस संपून -था दिवस. त्यांन कोणाशी सल्ला-मसलत न करता- हा धोखा पत्कारला. आता इथून सहीसलामत निटणं म्हणजे धावत्या रेल्वेखाली दोन रूळां-या मधे पडूनही जीव वा-वण्याइतकं- कठीण होतं.
या दुस्साहसा- परिणाम काय होईल ते मिसिरिन आधी- सांगून ठेवलेलं आहे. हे त्या- जल्लाद पहारेकरी सुमेसर- गठडी वळून अंगणा-या कोप-यातल्या कोठीत टोकतील आणि अल्सेशिअन-या तोंडी देतील.पुनः एकदा सुमेसर- थरकाप उडाला. इतकं भय त्याला आतापर्यंत कधी- वाटलं नव्हतं.

सदबुद्धी
त्यानं केलेली दुःसाहंस कमी का आहेत? या- मिसिर-या ताडीबनात मध्यरात्री फिरणा-या पिशा--यां- आणि त्यां-या इतर भूताखेतां- पर्वा न करता, अंधारात ताडी-या झाडावर -ढून मडक्यात झिरपून गोळा झालेली ताडी त्यांन पिऊन टाकली होती. मिसिर-या लहानग्या भा-या-या हातातलं पा- तोळे सोन्या- कडं वोताळा-या पर्वा न करता सुमेसर विहिरीत उतरला होता, आणि विहिरी-या अंधा-या तळात बुड्यांवर बुडया मारून शेवटी तासाभरा-या प्रयत्नानंतर त्यांन बक्षीस जोगिंदर मिसिरने कायं दिलं होतं, तर वीस रूपयां- एक नोट - बस्स . आजूबाजू-या बघ्यांनी मात्र त्या-या साहसा- मुक्त कंठानं प्रशंसा केली होती.
जुन्या कहाणी-या रंगात बुडून जाण्या- ही वेळ नव्हती. या वेळी तर भीतीनं त्या-या घशाला कोरड पडली होती. आणि फाल्गुनी थंडीतही अंगाला दरजरून घाम सुटला होता. वाळक्या पापडांसारख्या शुष्क ओठांवरून जीभ फिरवून त्यांन पहाटे-या फटपटण्यांमुळं तिथं आता एक - दोन सोडल्या तर बाकी -दण्या मंद होऊन गेल्या होत्या. पण सुमेसर-या आजूबाजूला बांबूबनात मात्र अजून अंधार होता.
आता मात्र इथून पळून जाणं- श्रेयस्कर . शौ-बद्दल आता त्यानं डोक्यातून वि-र काढून टाकला. अंगणाकडे त्यानं पुनः एक नजर टाकली. सगळं काही पूर्ववत होतं. एक खाट मात्र रिकामी दिसत होती.
हे काय ? हा ललनवा कुठं गेला? सगळ्या पहारेक-यांपैकीन मजबूत शरीरा-, दगडी --ती-, जल्लाद -धरमी ललनवा! या- बाप तितका- जल्लाद परभुवा! त्याने- हरियाला पकडून कुत्र्यां-या तोंडी दिलं होतं . -तेसाठी प्रेता- तुकडे देखील शिल्लक राहू दिले नव्हते. कुठे गेला असेल ललनवा? इकडे बांसवाडयात- शौ-साठी येत. नसेल ना ? किंवा शौ-साठी नाही तर नुसता पहारा देण्यासाठी, -रा--लटा- खात्री करून घेण्यासाठी? आता सुमेसर निघून जाण्यासाठी उठला रे टाकील किंवा समोरून नाही तर पाठीमागून त्या-या टकुरावर काठी- एक जोरदार वार करील. या पहारेक-यांकडे तर दुनाळी बंदुक पण आहे ती काय नुसतं घाबरवण्यासाठी-? सुमसेर काळजीत पडला. निश्-ल बसून -कस नजरेनं इकडे तिकडे ललनवा- शोध घेऊ लागला. पूर्वेकडे त्यां-- गरं होती. त्यांना "पूरवा का डेरा" असं- म्हणत. तिथल्या झोपड्या आणि समोर- डुकरां- खोपी अजूनही मसणवटयासारखी शांत- होती. एरवी खांय् खांय् खोकणारा बलेसरकाका- गळा आज घरघरत नव्हता. रामायणबाबां- भजनगायनही भल्या पहाटे सुरू व्हाय- तेही आज बंद होतं . गेल्या -र दिवसां-या संकंटान सर्वाना- असं त्रासून टाकलंय, की निद्रे-या हवाली जाऊन सर्वांना थोडी शांती मिळाली असावी.
असं संकट कुणावर येऊ नये . दोन वेळ-या जेवणा- संकट , पोरी-बाळीं-या कपड्यां- संकट , राहण्यासाठी जोगे- संकंट , दवा-दारू- संकट ! आतापर्यंत एवढी- संकंट माहीत होती. सगळ्यांना- त्यांना तोंड द्यावं लागत होतं पण शौ-ला कुठं जाय- हेही प्रश्न-न्ह उमटू शकतं का?
आम-या शौ-विधिवर- बंधन लादाय- होतं तर इथे आम- वस्ती का वसवली? दोन गुंठे जमिनीत आठ परिवार आणि त्यां- जनावरं कशी राहतात हे कधी अनुभवलंय त्या जोगिंदर मिसिरनं? आज तो- धनी आहे, मालक आहे , मग प्रजे- दुःख कळायला नको का त्याला? त्यानं स्वतः- सुविधा निर्माण करून दिल्या. पाहिजेत . इथं उलट सांगावा करून दिल्या आला- "पुरवा का डेरावाल्यां- हगणं-मुतणं आतापासून आम-या शेता-बांधावर बंद‍‍!"
असा काय गुन्हा केला होता. आम्ही ? हां! एक- केलं होतं . यावेळी इलेक्शनमध्ये जाऊन मतं देऊन आलो होतो. हा काय असा मोठा गुन्हा आहे, ज्यासाठी दोन दोन पिढ्यां- नातं विसरून गेले? बस हूकूम करून मोकळे झाले की, "आजपासून या लोकांना आम-या बांसवाडयावर शौ-साठी जाता येणार नाही. कुणी हुकुमा- बेदखल केली तर हरियासारखी- अवस्था केली जाईल."
हरियाबद्दल डेरावाल्यांनादेखील थोडंस कानकोंड वाटत होतं . एखाद्या भरल्या घरातल्या लेकी- सुनांबरोबर संबंध ठेवणं ठीक नाही. तेही श्रीविष्णुदेवाइतक्या पवित्र ब्राह्मण कुळातल्या बालविधवा झालेल्या सुनेबरोबर? आपण -भांर , तो ब्राह्मम! हरिया -कला. डे-यावरील कोणीही हे नाकबूल करत नाही. आता आगीत हात टाकल्यावर परिणाम भयंकर होणार- . तो झाला. या ललनवा-या बापाकडून - परभुवाकडून- हरियाला पकडून घेतलं होतं जोगिंदर मिसिरनं आणि दोन दोन अल्सेशिअनना त्या-यावर सोडलं होतं.
पुरबा डे-या-या घराघरांमधून विसरा- तरी ही कथा विसरली जात नाही. आज सात वर्षें झाली पण कुठल्यातरी निमित्तांन दररोज हरिया- आठवणं निघते- , जणू ही- हरियाला वा-रूपी श्रद्धांजली.
पण आगीत हात घातल्यासारखं इलेक्शन-या मतदानात काय आहे? सगळ्या पाटर्यां- नेता लोक येत होते. मतं मागायला. एकेका घरात शिरून हात जोडत होते. - आम्हांला मत द्या. आपापल्या निवडणूक- -न्हां- ओळख पटवून देत होते. त्यावर- शिक्का उमटवा असं सांगत होते.
पलटूनं जवळजवळ सर्व- नेत्यांना एक प्रश्न वि-रला होता- "कसा असतो शिक्का नि तो कसा उमटवतात? कसा असतो मतदाना- कागद? आम्ही आतापर्यंत कधी पाहिला नाही. आम्हांला कधी कुणी वोट देऊ दिलं तर ना! "
यावर येणा-या प्रत्येक नेत्यांनं सरकार , प्रशासन आणि इतर मतं-डाकूं- उद्धार करत त्यांना शिव्या- लाखोली वाहिली होती. आणि आम्हांला मतदान करण्याबद्दल पुनःपुन्हा बजावलं होतं . मग आम-या मनातही लालसा निर्माण झाली की आपणही मत द्यांय-.
मग पलटू एकदा बक्सरला जाऊन आला. आपल्या जाती-या एका नेत्याला भेटून आला. सुखराम बाबूंनी आतापर्यत डे-यावर-या लोकांनी जी भीती बाळगली , त्या- धिक्कार केला. "स्वतः-या अधिकारांसाठी जे लढत नाहीत, त्यांना देन कधी माफ करत नाही. अरे, काही ठाऊक आहे का, की वोट न देण्या- नेमका अर्थ काय ? अर्थ असा की, जणू तुम्ही या देशा- नागरिक- राजनैतिक -तना आणि अस्मिते- हुंकार? जा, आता मी सांगतो तसं वागा. मतदाना-या दिवशी सक्काळी सक्काळी आपल्या डे-या-या सर्व लोकांना नेऊन लायनीत उभं करा. या वेळी निवडणूक आयोग डोळ्यांत तेल घालून जागरूक आहे. तुम्हाला मत टाकण्यापासून कुणी अडवलं तर पोलीस येऊन त्यांना गिरफ्तार करतील. मी तुझ्या गावा- नाव कलेक्टरांकडे देऊन ठेवतो. तुम-या मतदानकेंद्रा- नाव अतिसंवेदनशिल मतदानकेंद्रां-या यादीत टाकतो. कुठे असतं तुम- मतदान? " असं म्हणून सुखराम बाबूंनी आपली डायरी आणि पेन बाहेर काढलं . केंद्रां- नाव लिहून
घेतलं . पलटू निघाला तसं त्याला बजावलं-
"जा आणि निःशंक मनानं मतदाना-या दिवशी वोट टाकून या. कुणी अडवलं तर पोलिसांना सांगा . यावेळी आपल्या इकड-या बंदोबस्ताला "पंजाब पोलीस " येणार आहेत. मतदारांना सर्व त-हे- सुरक्षा दिली जाईल. तरी कुणी मतदार स्वतः- भीती बाळगून घरात दबकुन बसला तर पोलीस काय करतील? हे तू मतपत्रिकां- काही नमुने घेऊन जा . हे माझं निवडणूक -न्ह . त्यावर असा शिक्का माराय-. हे सगळ आपल्या डे-यातल्या लोकांना नीट समजावून सांग.
शेवटी मी- अडीअड-णीला तुम-या मदतीला धावून येणार. काळजी करू नका. अरे, जिथं तुम- घाम सांडेल तिथं या सुखराम- रक्त सांडेल . कधीही आजमावून बघा."
सुखराम बाबूं-या शेवट-या वाक्यानं पलटूत नवीन उत्साह सं-रला त्यां- सगळी वाक्यं त्यांन त्यां-या- स्टायलीत नक्कल करत बोलून दाखवली तेव्हा डे-यातील सगळ्या घरांमध्ये -तन्य सळसशलं, मत टाकायला जाय- म्हणून.
आणि खरं- मतदाना- दिवस उजाडला तसं अर्धा तास आधी- सर्वजण रांगेत जाऊन उभे राहिले . तसं तर एक दिवस आधी मिसिर- माणसं येऊन धमकावून गेली होती की, मत देण्या-या अपराधा- दंड भयानक असेल, उत्साहा-या भरात त्यां- शहाणपण हरवलं होतं जणू!
आणि आता प्रातर्विधीसाठी बांसवाड्यात न जाण्या- शिक्षा अतिकठोर ठरत होती. डे-या-या -हूकडे जमीन त्यां-- आहे. पूर्वेकडे मोठी आमराई, त्याला आठ फुट उं- भिंत घातलेली . दक्षिणेकडे इतर फळबागा आहेत, तर त्याला काटेरी तारां- कुंपण घालून आत एक अल्सेशिअन मोकळा सोडून ठेवला आहे. उत्तरेकडे त्यां-- शेत आहे आणि बांधा-बांधावर रखवालदार असतात. राहिलं पश्-मिकडं- हे मोठं अंगण आणि त्या-याअलीकडे हे बांबू- बन. आता डेरावाल्यांनी तर कुठेही शौ-- जागा नव्हती.
पहिल्या दिवशी सगळ्यांनी सहा बाय सहा-या मैदानात एक पुरूषभर खड्डा खणला. सगळ्यांनी तिथे- विधी उरकले आणि वर माती लोटून दिली. पण दुस-या दिवशी- माती जमिनी-या लेव्हलपर्यत येऊन पो-ली, आणि दुर्गंधी अशी की खोपटा-या आत स्वयंपाक होणं मुश्किल झालं . पलटू पहिल्या- दिवशी सायंकाळी मिसिर-या माणासाम- डोळा -कवून सुखराम बाबूंना या- कल्पना देण्यासाठी बक्सरला गेला, होता.
दुस-या दिवशी रात्री पलटू , परतला. त्यांन सांगितलं, तो सुखराम बांबूकडे पो-ला. तेव्हा ते विजय -मिरवणुकीतून थकून भागून परतले होते. "उद्या सकाळी तुझं ऐकू", असं सांगून लगे- झोपायला निघून गेले. रात्री तो त्यां-या कार्यालयात गेला आणि तिथल्या ओटयावर तसा- उपाशी पोट दुमडून झोपला. सकाळी त्यांना भेटण्यासाठी खूप कासावीस होऊन प्रयत्न केले पण भेटू शकला नाही. बक्सर मोठं शहर, जिल्ह्या- ठिकाणं. एकेक मोठाली माणंस येऊन त्यांना भेटत होती- अभिनंदन करत होती. गळ्यात भरभरून मिठाया येत होत्या. सुखराम बाबू त्या आत पाठवत होते. मोटारगाड्यां- लाईन लागली होती. आतल्या खोलीत दाटीवाटीनं बसलेल्या लोकांकडून सुखराम बाबू अभिनंदना- स्वीकार करीत होते. तासनंतास तिथल्या -पराशा- विनवणी करून कसाबसा पलटू आत जाऊ शकला. आणि त्यां-यापर्यंत पोटू शकला. त्यांन रडत कढत आपली अड-ण सांगितली.
त्यां- -हरा गंभीर झाला. -या- वेळांन मौनभंग करून ते म्हणाले, " आता तू गावी परत जा .मी तिथं पोलीस पाठवतो. हा कुठला जंगली नियम? कुणां- हगणं- मुतणं बंद करण्या- त्यांना काय अधिकार? मग गरीबांन कुठं जाय- मी बघतो... तू गावाकडं जा. मला तर आज- पटवण्याला जावं लागेल. उद्या विधानसभेत शपथ घ्याय- आहे..."
पलटूला सांगाय- होत की पोलीस फोर्स लगे- पाठवा, मी पण त्यां-याबरोबर- गावी जातो. पण तेवढयात तिथं बसलेल्या माणसांन संभाषणा- ताबा घेतला. - " सर! मला विश्वास वाटतो की यावेळी तुम्हांला मंत्रिमंडळात नक्की जागा मिळेल. पण तसं नाही झालं तर हे घोषणा-पत्रा-या विरद्धं झालं, असं- मानावं लागेलं. मग आम- लोक गप्प बसणार नाहीत. आपलं- सरकार असलं म्हणून काय? आम्ही धरणं धरू आणि उपोषणं आयोजित करू. तेवढी परवानगी असावी."
"धीर धरा, लोकहो, धीर धरा. आता आपलं- सरकार त्यात न अन्याय कसा होऊ शकतो? म्हणून- तर मी आज रात्री- जात आहे." सुखराम बाबू हसत त्या-याकडे वळून म्हणाले.
पलटू त्या थुलथुलीत माणसा-या तोंडाकडे पाहत- राहिला. कारण आता त्या-याकडे कुणा-- लक्ष जाणार नवहतं. त्या- उपस्थिती सगळे जण विसरले. हास्य -विनोद सुरू झाले. थोडया वेळांन पलटू उठला आणि सखराम बाबूंना नमस्कार करत बाहेर पडला.
तो गावी येऊन आता दोन दिवस झाले. कुठली पोलीस पार्टी आणि कुठलं काय? कोणी नेतापण फिरकला नाही आणि कोणी ऑफिसरपण नाही.
सुमेसर-या मनात सगळं घटना-क्र एकदा वेगान फिरू गेलं आणि त्यां- मस्तक सुन्न झालं.
का त्यांन केला इकडे येण्या- आगाऊपणा? इतरांसारखं- डे-यावर- का नाही गेला? पण तिथल्या हगणवटयात आता तो पाऊल टाकू शकत नव्हता. तिथे- कशाला? झोपडीतही राहणं अशक्य झालं होतं. दुर्गंधींमुळे डोकं फाटून जाय- वेळ आली होती.
नुसत्या आठवणीनं सुमेसरला वाटलं की ती डे-यावर- दुर्गंधी वा-याबरोबर इथपर्यंत आली जणू . त्याला ओकारी येईलसं वा़टलं .पण थुंकी टाकली तर आवाज होईल कदा-. मग त्यानं तोंडातली तंबाखू- गोळी हाताने- काढून बाहेर टाकून दिली. अजूनही मिसिर-या अंगणातल्या खाटांवर पहारेकरी झोपलेले- होते. , आणि एका खाटेतील अल्सेशिअन पण बेशुद्धित असल्यासारखा पडून होता. मात्र एक खाट अजूनही रिकामी दिसत होती.
हा ललनवा परतला नाही कसा अजून? कुठं गेला असेल? आपल्याला पाहिलं तर नाही ना त्यांन? कुणासं ठाऊकं ,कुठे अंधा-या कोप-यात बसून मी उठण्या-- वाट पाहत असेल. उठलो की बसली त्या- काठी टाळक्यात. दुस-या एखाद्या पहारेक-या-या काठीनं प्राण जायला थोडा वेळ लागेल कदा-.पण ललनवा- वार म्हणजे वज्रास्त्र- . जसा बाप जल्लाद तसा- बेटा .या निठल्ल्यांना कामं काही- नाहीत. बस! खा, प्या आणि शरीरावर- -रबी गोळा करा . यां-यासाठी मिसिरजी जणू देवाघर- दूत- बनून आले. आहेत काय मेल्यांनी जादू केली मिसिर आणि यां-या भाऊबंदांवर , की त्यां-या डोळ्यांतदेखत धान्य-धुन्य उ-लून स्वतः- घरं भरतात आणि ते बोलत नाहीत, मिसिरजीं-या मागे लागून लागून महतों-या पाडयावर एक बोरिंगपण बसवून घेतलं होतं.

सदबुद्धी
काय असं देणं लागत होते मिसिरजी यां-? त्यां-या घरी काही कार्य निघालं की आम्हीदेखील एका पायावर उभे असतो कामाला. .पण त्यांनी आम-यावर कधी विश्वास नाही दाखवला. आम्ही नी- जाती- आहोत, हे कबूल , पण महतो पाडया- जात तरी कोण मोठी ब्राह्मण लागून गेली आहे? आम-यापेक्षा थोडे उ-- असतीलं एवढं- . पण हे महतो लोक आम-ही केवढा दुस्वास करतात!
सुमेसरला वाटलं की ही त्या- सगळी तर्कसंगती -कली होती. सोपी, साधी गोष्ट ही की जो कुणा- -करी करत असेल, तो त्या- हूकूम पाळणार-. ही रीत- जगा- .तसं म्हणाल तर रामायणबाबांनी कितीकदा मिसिरला सांगून पाहिलं होतं -" जसा महतो टोळी आणि मल्लाहां-या टोळीला तुम्ही आश्रय दिलाय , अडी -अड-णीला सल्ला देताय, तशी आम्हांला पण काही सेवा करण्या- संधी द्या, आम्हीही कुठे कमी पडणार नाही.पण मिसिरनं आम्हांला कधी- त्यां-याइतकं जवळ केलं नाही. आता मधून मधून एखादा बांबू कापून नेण्या- परवानगी मिळत होती तेवढी- आणि हरिया-या मृत्युनंतर एक बैलगाडी भरून बांबू दिलं होते. त्या दाना- अर्थ डेरावाल्यांना कळत नाही थोडा-!
या निरर्थक गोष्टीं- वि-र करून काय फायदा? सुमेसर- डोक भणभणू लागंल होतं. आता खरी काळजी करायला हवी ती इथून सुखरूप आपल्या झोपडयांकडं कसं जाता येईल. त्या- तिकडे रात्री- शेवट- प्रहर सुरू होऊ घातलेला आहे. आकाशातले मघाशी -मकणारे तारेपण क्षीण होत -लले. अजून ललनवा दिसत नाही या- अर्थ उठण्यामधे धोका आहे.पण -र वाटत आले आहेत, म्हणजे थांबण्यातही धोका आहे. एकदा का पहारेकरी उठले की बहिर्विधीसाठी तेपण इकडे- येणार आणि तो अल्सेशिअनपण इकडे- येणार . रात्री- मोकळा- असतो. फक्त दिवसा- बांधतात त्याला.
संकट अगदी समोर येऊन ठेपलं इकडे आड तिकडे विहिर. आता उठून पळण्यातला धोका पत्काराय- पाहिजे .

नीट वि-र करून सुमेसरनं बरोबर आणलेल्या अल्युमिनिय-या टमरेलातील पाणी हळू हळू सांडून टाकलं आणि उभं राहून तो अंडरवियर- नाडी बांधू लागला. आता त्या- दृष्टी स्थिर होऊन फ्कत अंगणातल्या बाजांवर- खिळली होती.

सदबुद्धी
ह्दया- ठोके वाढले होते. हातापायांना कापंर भरलं होतं . घामानं शरीर डबडबून गेलं . नाडी बांधून त्यानं पायातली टायर- -प्पल एक एक करून हातात घेतली , आणि खाली वाकून बांबू-या गजपणांतून वाट काढत तो हळूहळू एक एक पाऊल टाकू लागला.
-र्र. -र्र, -र्र... कितीही सांभांळा , बांबू- वाळकी पानं पायाखाली -रत- होती आणि आवाज थोपवत येत नव्हता. दहा एक पावलांनंतर बांसवाडा संपेल आणि शेता- बांध सुरू होतील. तिथं सकाळप्रहरा- ललिमा पसरलेला होता. गोष्टी स्पष्ट दिसत होत्या . अंगणात कुणी जाग झालं असलं तर नक्की- त्याला बघू शकेल.
तो दहा पावल पण त्यानं पार केली .उजेडा-या आगीत पाऊल टाकण्याआधी पुनः एकदा अंगणाकडे नजर टाकली, आणि पटकन पुढे केलेलं पाऊल मागे घेतलं . अल्सेशिअन- शेपटी जोरजोरात हलत होती. ती थांबेपर्यंत आपणही थोडी वाट पाहावी हे बरं! आता जराशी घाईगडबड देखील मृत्युला निमंत्रण ठरू शकते. त्यांन आधी- जरा जास्त उशीर केला. तो ललनवा झोपेत असताना- उठून यायला हवं होतं. पण आता उशीर केलेला- आहे तर इथून पुढे जपून- पावलं टाकली पाहिजेत .
त्या- नजर अजूनही शेपटीवर- स्थिरावली होती. पण शेपूट हलाय- थांबत नव्हती. आता तर त्या-या देहातली हाल-ल दिसू लागली. बहुतेक तो उठूनं आपलं आंग ताणून आळोखे पिळोखे देत आहे. सुमेसर- भीती वाढली. हे म्हणजे जणू कुणी पळण्या-या रस्त्यावर मोठेमोठे दगड- -न ठेवलो असावेत. सुमसरनं आठवतील त्या सर्व देवां- धावा सुरू केला आणि हनुमानावर येऊन तो अडकला. आपल्याला हनुमान-ळीसा पाठ म्हणता येत नाही . आधी का नाही आपण घोकून ठेवली? ति- पारायणं करताक्षणी संकंट स्वतः- पळू लागतात. पण आता काय उपयोग ! हे संकट काही टाळताना दिसत नाही.
जर तो धावत जाऊन बांधालगत-या पायवाटेवर पो-ला तर ? तर काय? तिथंदेखील तो पळू शकणार नाही. आवाज होईल आणि अल्सेशिअन हवे-या वेगानं पळत येऊन त्याला जबड्यात पकडेल. सुमेसरनं कसाबसा हा वि-र डोक्यातून परतवून लावला. तिकडे अल्सेशिअन आता उठून सावध बसला होता. तो परत झोपी जाण्या- शक्यता संपली होती. सुमेसरला वाटलं , त्यां- सर्व शरीर मृतवत झालेल- आहे. फक्त डोक्यात थोडी आकलनशक्ती राहिली आहे. तिथं त्याला अल्सेशिअनला काही तरी वास येऊ लागला असावा. तो जमिनीला सरपटून वास घेत घेत बांसवाड्याकडे येऊ लागला. जणू एखादा बाण- सर्रकन येऊ लागला. सुमेसर-या वि-रशक्तिला . तो पळाला. हातातल्या -पला कुठेतरी पडल्या . क्षणांत तो बांसवाडा ओलांडून पायवटेला लागला होता. पण त्या- क्षणांत अल्सेशिअनलादेखील सगळं काही कळून -कलं . वेगानं धावत तो सुमेसर-या दिशेनं येऊ लागला आणि काही क्षणांत- त्या-यापासून -र पावलांवर येऊन ठेपला.
सुमेसर- नसननस थिजून गेली . दुस-या क्षणी- सुमेसर- तंगडी त्या-या जबडयात असेल आणि पाठीवर पहारेक-यां- वर्षाव.
तेवढया क्षणात- त्याला हेही दिसलं ती अल्सेशिअन-या जोडीनं ललनवापण धावत येत होता. त्या- तेल पाजलेली लाठी हवेत -मकत होती. आधी अल्सेशिअन त्या-या मांसा- -का तोडतोय की आधी ललनवा- काठी त्या- कवटी भेदत्येय....
जिवा-या आकांताने सुमेसर पळत होता.
इकडे अल्सेशिअननं त्या-या अंगात आपले दात घुसविण्यासाठी हवेत उडी घेतली आणि तिकडे ललनवा- काठी दोनदा बरसली... सडाक्- सडाक्...
जबरदस्त प्रहारा- सपकारे -हूकडं घुमलं . पूरवा डे-यातील झोपड्यांमधून स्त्री-पुरूष बाहेर येऊन गोळा झाले, होते, आणि पलीकडे खाटांवरून उठून बसलेले पहारेकरीपण पळत इकडे- येऊ लागले होते.
डे-यापासून सुमारे वीसएक पावलांवर अल्सेशिअन विव्हळत पडला होता. पहारेकरी या- सुसंगती लावाय- पयत्न करत होते. सुमेसर धापा टाकत रामायणबाबा आणि बलेलर-या कानाला लागला. "या ललनवानं- मारलं अल्सेशिअनला, माझ्य मागं लागला म्हणून," आणि आता एकटक तो ललनवाकडे पाहत उभा राहिला- ज्या-या काठी-या दोन फटक्यांनी- अल्सेशिअन धराशायी झाला होता.
आकाशात हा कोण नवा तारा उगवला होता.? पूरबा डे-यातील झोपडयांना थंडावा देणारा !
कायं सुर्य , काय -द्रं , काय इतर तारे- आतापर्यंत सगळ्यांनी पूरबा डे-यावर आग- ओकली आहे. का ललनवा आप ल्या बापा-या पापा- प्राय-त करत होता? त्यांन बलेसरकाका- हात जोरांन दाबला.
तेवढयात जोगिंदर मिसिर पण आपल्या भाऊबंदासह येऊन दाखल झाले .कुणी तरी धावत जाऊन त्यांना सगळं सांगितलं होतं. जमिनीवर तडफडणा-या आपल्या अल्सेशिअनला पाहून ते तांबडेलाल झाले. "कोणी मारलं याला?" ते गरजले.
"मी मारले मालक‍‍! हा वेडा होऊम माझ्या मागं लागला होता, मी मारलं नसंत तर हा मला घायाळ करणार होता. " ललनवानं पुढे होऊन नम्र स्वरात उत्तर दिलं.
"तू खोट बोलतोस. हा पागल नव्हता झालेला. अरे हरामजाद्यांने, तोंड काय पाहता? तो जिवंत आहे अजून. घेऊन -ला त्याला बक्सर-या मोठ्या दवाखान्यात .आणि तू ललनवा. माझ्या नजरेसमोरून आधी दुर हो."
जोगिंदर मिसिरनी गरजना केली . आदेश प्रमाण मानून ललनवा पाऊलवाट धरून आपल्या ठिकाणाकडे जाऊ लागला. पूरबा डे-यातले तमाम झोपडीवासी त्या-या पाठमो-या आकृतीकडे बघत राहिले. रामायणबाबा आणि बलेसरकाका-या डोळ्यांतून त्या-यासाठी स्नेह आणि आशीर्वाद पाझरू लागले.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------





























































































1 टिप्पणी:

GST Refunds Delhi ने कहा…

This is the precise weblog for anybody who needs to seek out out about this topic. You notice so much its almost arduous to argue with you. You positively put a brand new spin on a subject that's been written about for years. Nice stuff, simply nice!