रेड हेडेड लीग
Red Headed League दि. ६ जुले १९८८
Red Headed League दि. ६ जुले १९८८
रेड
हेडेड लीग
मुलांनो, इंग्लंडमधे एक प्रसिद्घ लेखक होऊन गेला. त्यावे नाव आर्थर कानन डायल. त्याने "शरलॉक होम्सच्या गोष्टी" या नावाने कितीतरी गुप्तहेरी गोष्टी व कादंबऱ्या लिहिल्या आहेत. गोष्टींचा हिरो आहे. शरलॉक होम्स नावाचा गुप्तहेर.
तर हा ऑर्थर कानन डायलचा कल्पनेतला हिरो इ.सन 1890 च्या आसपास इंग्लंडमधे रहात असे. त्याने कितो तरी लोकांचे किती तरी प्रश्न सोडवले. त्याचा एक डॉक्टर मित्र होता - त्याचे नाव वॉटसन. हेरगिरी करण्यात शरलॉक होम्स त्याची
पण थोडीफार मदत घेत असे. शिवाय होम्सचे असे एकेक किस्से वॉटसन लिहून काढत असे (अशी कल्पना).
एकदा शरलॉक होम्स आणि वॉटसन बसून गप्पा मारीत होते. तो शनिवारवा दिवस होता. वेळ असेल 11-12 ची. त्यांना भेटायला एक माणूस आला. त्याचं नांव होतं विल्सन आणि त्याचे केस अगदी मस्तपैकी लाल रंगावे होते. आपल्या भारतात बहुतेक सर्वांचे केस फक्त काळे किंवा म्हातारा असेल तर पांढरे दिसतात. यूरोपात मात्र लोकांचे केस काळे, भुरे, सोनेरी, राखाडो, पिंगट किंवा लालसर पण असू शकतात. तर असे त्या विल्सनचे
लालसर केस होते.
शरलॉक होम्सने त्याच्या नेहमीच्या मिष्किल सवयीप्रमाणे वॉटसनला
विचारले - "वॉटसन, याच्याबद्दल तुझा काय अंदाज आहे वॉटसन, म्हणाला "काही विशेष कळत नाही बुवा ! याचे केस इतक्या छान
लाल रंगाचे आहेत आणि आता यांना कशाचा तरी फार राग आलेला
आहे एवढच
कळतं."
होम्स म्हणाला "खंर आहे. यांनी काही काळ श्रमाची कामं केली
होती, हे तपकोर ओढतात, हे
चीनमधे राहिलेले दिसतात आणि नुकतेच काही दिवस यांनी भरपूर लिखाण काम केले आहे एवढच कळतं. या पेक्षा जास्त काही माहिती असेल तर यांनाच विचारावे
लागेल."
हे ऐकून विल्सनची दांडीच उडली. "तुम्हाला
माझी ही माहिती कशी कळली.
मी बोटीवर सुताराचे काम केले हे खरे आहे
"तुमच्या
हातावी बोटं व तळहात कसा घट्ट आहे त्यावरून कळंत. तपकीर वापरण्याची सवय नाकपुडयांच्या
रंगावरून कळते. तुमच्या पांढऱ्याशुभ्र शर्टाची उजवी
बाही स्वच्छ आहे पण पण डावी बाही सतत लिहिण्याच्या टेबलावर ठेवल्यामुळे ती
मळली आहे. आणि तुमच्या हातावर जो मासा गोंदवला आहे तशी पद्धत चीनमधे आहे – आपल्या यूरोपांत नाही. त्यावरून तुम्ही चीनला गेला असाल हे कळतं -- शरलॉकने खुलासा केला. 'बरं आता तुमचं काम काय ते सांगा.'
विल्सनने आश्चर्याच्या धक्कयातून सावरत
त्याच्या खिशातून वर्तमानपत्राचा एक कागद काढला आणि शरलॉक होम्सला एक जाहीरात वाचायता दिली. अतिशय गंमतीची जाहीरात होती. कुणी तरी 'लाल
केसवाल्यांचे मंडल' या नावाने जाहीरात दिली होती व त्यांत म्हंटलं होतं कि, लाल केसवाल्यांच्या
मंडळासाठी काम करणारे अमेरिकेतील श्री. हॉपकिन्स वारल्यामुळे त्यांची जागा भरायची आहे.
त्या
जागेवर काम थोडसंच आहे पगार चांगला आहे. तेंव्हा इच्छुक लाल केसवाल्यांनी मंडळाच्या तात्पुरत्या कार्यालयात सोमवारी सकाळी मुलाखतीसाठी यावे. सोबत कार्यालयाचा लंडन मधला पत्ता दिला होता.
जाहीरात बाचून शरलॉक होम्स व वॉटसनना गंमत वाटली. तेवढयातल्या तेवढयात होम्सने वर्तमानपत्राची तारीख पाहिली. ती
दोन महिन्यापूर्वीची होती. होम्सने तो लिहून घेतली व विल्सनला विचारले - 'बरं पुढे काय झालं.'
विल्सनने सांगण्यास सुरुवात केली - 'अस बघा मि. होम्स. मी काही श्रीमंत किंवा सुखवस्तु नाही. माझं एक अगदी लहान गहाणवटीचं दुकान आहे. पूर्वी माझ्या दुकानात दोन तीन माणसं कामाला असायची. आता धंदा बसत चालल्यामने मी एकच नोकर ठेऊ शकतो. ते पण तो माझ्या कडून अर्धाच पगार घेतो म्हणून - कारण त्याला हा धंदा शिकून घ्यायचा आहे !'
'अस्सं ! म्हणजे शिकाऊ पोरगा आहे !' होम्सने म्हटले
'छे छे ! अगदी पोरगा नाही
म्हणता येणार.. त्याच्या वयावा खरं तर मला अंदाज – पण कामात तरबेज आहे-बोलायला मिठास आहे ! त्याने आज त्याचा वेगळा धंदा काढला तर मी देतो त्या पगारापेक्षा दुप्पट तिप्पट पैसे सहज मिळतील. पण त्याच्यात एक दोष आहे. त्याला फोटोग्राफीचा छंद आहे. त्यामुळे उठसूट फोटो काढणे आणि दुकानात गिऱ्हाईक नसेल तेव्हा शेजारच्या खोलीत जाऊन रोल धुणे, प्रिंट काढणे असे उद्योग चालू असतात. त्यासाठी माझी दुकानाची एक खोलीच त्याने डार्क रुम बनवून टाकली
आहे. पण सध्या त्यामुळे माझे काही
नडत नाही म्हणून मी पण परवानगी दिली आहे.' विल्सनने सांगितले !
'ठीक आता जाहीरातीचं काय ?' ते सांगा ! आणि हो, तुमच्या या नोकराचे नाव काय म्हणालात ? होम्सने विचारले.
विल्सन सांगू लागला - 'त्याचे नाव जेम्स. त्यानेच मला ही जहीरात दाखवली. माझे केस चांगलेच लालसर तेंव्हा मी मुलाखतीला जावं असं त्याचं म्हणणं पडलं. मला ते सर्व चमत्कारिक वाटत होतं. पण त्याने मला धीर दिला आणि मुलाखतीला घेऊन पण गेला - याला आता दोन महिने झाले.
'मुलाखतीच्या पत्तयावर गेलो तर बरीच गर्दी होती. भुऱ्या आणि पिंगट रंगापासून तर लाल रंगापर्यन्त सर्व तऱ्हेचे
केस असणारे लोक आलेले होते. मुलाखतीची रांग बरीच मोठी होती. तासाभराने माझा नंबर लागला. आत गेलो तर एक माणूस मुलाखत घेत होता. त्याचे पण केस माझ्यासारखेच झकास लाल रंगाचे होते. माझे केस पाहून त्याला समाधान वाटलं. गंमत म्हणजे त्याने एकाएकी माझे केस ओढून पण पाहिले. खोटे केस तर चिकटवले नाहीत ना असं त्याला पहायचं होतं. त्याचं समाधान झाल्यावर त्याने तिथल्या तिथे मला निवडल्याचं जाहीर केल. बाहेर येऊन बाकी थांबलेल्या मंडळींना जायला सांगितलं आणि परत आत येऊन माझं काम काय असेल ते सांगू लागला.'
'अच्छा, काय काम होत ?' वॉटसनने विचारलं. हा सगळा प्रकार गूढ
होत चालला होता.
'काम फारच थोडं पण कंटाळवाणं होतं. सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यन्त न चुकता त्याच ऑफिस
रुम मधे येऊन बसायचं. एका मोठया रजिस्टरमधे ब्रिटानिया एनसायक्लोपिडिया वरुन पानंच्या पानं
उतरवून काढायची आणि कोणीही लाल केसवाल्यांच्या मंडळाची माहिती विचारायला आलं तर
ड्रॉवरमधील छापील पत्र त्यांना द्यायचं. एवढच काम. पगार भरपूर. पण कधीही एक मिनिट भर जरी ऑफिस सोडून गेलं तर ताबडतीब नोकरीवरुन काढून टाकल जाईल शिवाय त्या आठवडयाचा पगार वसूल करुन घेतला जाईल' अशा कामच्या अटी होत्या.
'मग, तुम्ही ते काम घेतलं वाटतं?' होम्सने विचारलं.
'घेणारंचं. एवढी चार पैसे मिळायची संधी चालून आल्यावर सोडून द्यायचे काय ? मी त्याच दिवसापासून कामाला सुरूवात केलो.'
'या सर्व व्यवहाराचं तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं?' वॉटसनने विचारले.
'वाटलं तर ! पहिल्या दिवशी खूप आश्चर्य वाटलं पण शेवटी मी विचार केला - जाऊ दे. आता तरो चांगले पैसे मिळतहित ना? पुढे त्रास झला तर सोडून देऊ ते काम ! पण खरं तर कामात त्रास काहीच नव्हता. दर आठवडयाला पगार मिळत होता. माझी मुलाखत घेणारा मिस्टर रॉस स्वतः च पैसे आणून द्यायचा. तसच सुरवातीला तो माझं काम पहात थांबून रहायचा किंवा मधेच अवेळी आणि न सांगता टपकायचा. मी कुठे जात नाही ना हे त्याला बघायचे असावे. पण त्याचा मला त्रास झाला नाही. सुमारे दोन महिने असं चाललं.
पण आज सकाळी मी कामाला गेलो तो तिथे पाटी लटकत होतो - 'लाल केसवाल्यांचे ऑफिस बंद करण्यात येत आहे !' मी चकितव झालो. मि. रॉसचा कुठे पत्ता नव्हता म्हणून खाली घरमालकाकडे चौकशी केली. तो कुणा रॉसला ओळखत नव्हता. पण लाल केसवाला म्हटल्यावर त्याने सांगितले
-'तो होय ! त्याचे नाव रॉस नसून मॉरिस आहे - त्याचे स्वतःचे ऑफिस तयार होत होते म्हणून तो इथे भाड्याने राहिला होता. काल तो माझी खोली सोडून गेला.'
'घरमालकाने दिलेल्या पत्तावर मी गेलो तर तिथे कुणी रॉस नव्हता कि मॉरिस नव्हता ! मी घरी आलो. माझ्या नोकराला सर्व सांगितलं. त्याला पण ऐकून आश्चर्य वाटलं. त्याचं म्हणणं त्या रॉसच काही तरी खुलासा करणारं पत्र येईल. तो पर्यन्त वाट पहावी. पण मला हे काम सहजासहजी सोडायचे नाही. तुमचं नांव मी ऐकून होतो. त्या रॉस का मॉरिसचा छडा तुम्ही लावू शकाल. म्हणून मी लगेच तुमच्याकडे आलो.'
'मजेदार गोष्ट आहे तुमची. याचा छडा मी लावू शकेन. पण तुमच्या नोकराबद्दल मला थोडी माहीती सांगा - कारण त्यानेच तुम्हाला जाहीरात दाखेवली होती - त्यावेळी त्याला तुमचं काम धरून किती दिवस झाले होते ?'
' असेल साधारण एक महिना' - विल्सन म्हणाला.
'बस, आणि तरी तुम्ही दुकान पूर्ण पणे त्याच्यावर सोपवून जात होता ' होम्सने विचारले.
'अहो, माझ्या दुकानात सकाळच्या वेळी फारसे काम नसते. शिवाय जेम्स कामाला चांगला व सचोटीचा
आहे ' विल्सनने सांगितले.
'शिवाय तो अर्ध्या पगारावर काम करतो ' होम्सने आठवण करून दिली. 'बंर हा दिसायला कसा आहे?'
'सामान्यच आहे - लहान पण मजबूत बांधा आहे - बसकं नाक आणि कपाळावर ऑसिडने भाजल्याची खूण आहे एवढचं '
'अस्सं ! ठीक आहे. आज शनिवार आहे - सोमवार पर्यन्त निश्चित काही तरी कळेल. तोपर्यन्त स्वस्थ रहा. आणि तुम्ही इथे आलात हे कुणाला सांगू नका'. 'होम्सने सल्ला दिला.
विल्सन गेल्यावर शरलॉक होम्स बराच वेळ विचार करत बसून राहिला. मधेच त्याने आपल्या एक दोन फाईल्स पण काढून वाचल्या. या फाईल्स मधे तो गुन्हेगारांची माहिती ठेवत असे तसेच शहरात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांची कात्रण त्यांत असत. आणि दुपारी तो वॉटसनला घेउन निघाला.
आधी ते दोघे विल्सनने दिलेल्या पत्त्याप्रमाणे त्याच्या दुकानात गेले. एका छोटया तिमजली बिल्डिंगमधे खालच्या मजल्यावर कोपऱ्याला दुकान होतं व त्यावर विल्सनच्या नावावी पाटी होती.
वॉटसनला थांबूवन होम्स दुकानात गेला आणि स्ट्रँड सिनेमाला कसे जायचे असं विचारून परत आला. त्यावरून त्याला नोकरावरच संशय आहे हे वॉटसनच्या लक्षात आले.
'काय ? त्या नोकरालाच पहायला गेला होतास ना ? ' वॉटसनने विचारले.
'छे. छे. त्याच्या पॅण्टचे गुडघे बघायला गेलो होतो. पण सध्या अजिबात बोलू नकोस. आपण जरा या
इमारतीच्या मागच्या गल्लीत जाऊ या.'
इमारतीच्या मागच्या बाजूला चार पाच दुकाने होती. ती होम्सने वाचून ठेवली - एक वहया-पुस्तकांचं दुकान, एव वर्तमानत्राचं दुकान, एक सिटी बॅकेची ब्रँच, एक ट्रकच्या बॉडीबिल्डंगचा मोठा डेपो. एक हॉटेल. बस.' होम्स बराच वेळ त्या दुकानांची नोंद घेत होता. संध्याकाळी होम्सच्या कामाला भलताच वेग चढला. तो सिटी बँकेच्या चेअरमनला भेटला तसेव स्कॉटलैंड यार्ड मधल्या त्याच्या मित्राला भेटला. रात्री दहा वाजता सर्वांनी होम्सच्या घरी भेटायचे ठरले.
रात्री मंडळी भेटली तेव्हा होम्सने वॉटसनची ओळख करून दिली. 'वॉटसन, हे सिटो बँकेचे चेअरमन श्री मेरीवेदर व हे पोलिस इन्स्पेक्टर श्री. नरिन्हो. आज शनिवार आहे. माइया अंदाजाप्रमाणे आज रात्री सिटी बँकेच्या लॉकर रूममधे काही तरी घडेल. त्यामुळे आपण सर्व आता तिकडे जाणार आहोत. वॉटसन, तुंझ पिस्तूल पण बरोबर घेऊन ठेव.'
अशी ती चार मंडळी कामगिरीवर निघाली. सर्व रस्ताभर मेरीवेदर त्यांना अभिमानाने बँकेच्या कामगिरीबद्दल सांगत होता व त्यांच्या सर्व ब्रँचेस किती चांगल्या तऱ्हेने सुरक्षित ठेवल्या आहेत आणि होम्सचा अंदाज कसा चूक आहे हे ठासून सांगत होता. मधूनव तो नरिन्होकडे बघायचा -याचे मत
आपल्या बाजूने असेल अशी अपेक्षा धरून - पण नरिन्होचा मात्र होम्सवर जास्त विश्वास होता.
सिटी बँकेत जेव्हा सर्व पोचले तेव्हा वॉटसनने पाहिले की आपण दुपारी जी ब्रँच पाहिली होती तीच ही - विल्सनच्या दुकानामागची. मेरीवेदर बरोबर असल्याने सर्व बँकेत थेट आत पोचले. लॉकर रूम भली मोठी होती. तिथे पंचवीस तीस क्रेटस ठेवलेले होते. तो खोली इतको भक्कम होती की खरोखर तिथे परवानगी शिवाय मुंगी देखील शिरकू शकली नसती. चांगली मजबूत दगडी फरशी होती. दगडी भिंती पण होत्या.
तेवढयात मेरीवेदरची हातातली छडी जमिनीवर आपटली आणि तिथून जमिनीतून इतका पोकळ आवाज निघाला को थक्कच झाले. 'माय गॉड, इथे काय चालले असावे ?' मेरीवेदर जवळजवळ ओरडलाच.
'हं हं आवाज अजिबात नको.' - होम्सने त्याला सावध केले. सर्वानी फरशी वाजवून पाहिली आणि किती जागा पोकळ होती ते पाहिले. त्यामुळे येणारे वीर कुठून येणार याचा अंदाज आल्यावर होम्सने दिवे घालवून सर्वांना क्रेटस् मागे लपून बसायला सांगितले.
खूप खूप वेळ गेला. निदान अवघडलेल्या जागी लपून बसलेल्या वॉटसनला तरी तसेच वाटलं. होम्सचा अंदाज चुकला आणि मेरीवेदर त्याची टर.
उडवणार ही त्याची पक्की खात्री होत आली तोच खालच्या दगडी फरशीवर काहीतरी चकाकल्या सारखं वाटलं. पुन्हा अंधार. थोडया वेळाने पुन्हा काही तरी चकाकलं. यावेळी उजेडाची रेघ हळू हळू वाढत गेली आणि अलगद फरशीमधला एक दगड हलवत हलवत कुणी तरी खालून सरकवला. एक
फट झाली. त्यातून एक हात वर आला. फरशी सरकवून फट मोठी केली. आता तिथे एक भगदाडच झालं. त्यातून दोन हात वर आले आणि उडी मारून एक माणूस वर आला. खालून टॉर्चचा उजेड येत होता.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें