शुक्रवार, 19 जुलाई 2013

गोष्ट इसवी सन २०३५ ची

                      गोष्ट इसवी सन २०३५ ची 

    मित्रांनो, तशी ही गोष्ट बरीच जुनी म्हणजे सन २०३४ सालातली, म्हणजे सत्तरएक वर्षापूर्वीची आहे. त्या काळी काही कंप्यूटर्सनी आजच्या एवढीप्रगती केलेली नसणार असं आपण म्हणतो. पण किती प्रगती केलीए कशी प्रगती झाली यासारख्या अभ्यासांना एक वेगळीच रहस्यमयता असते. त्यातून माझा तर हा रिसर्चचा विषय. त्या दिवशी माझे गाईड स्टीव्हलिंक मलेशियाचा दौरा आटोपून आले, तर त्यांच्या हातात माझ्यासाठी कागदांचे एक पुडके होते. मला म्हणाले, ' फ्रैंक, बघ बरं, या कागदांचा तुझ्या रिसर्चला काही उपयोग आहे का?' गंगतच आहे - आपण कुठे कोणती गोष्ट कागदावर लिहून ठेवतो का? आपला डाटा सगळा कंप्यूटर टेप्सवर. तरीही विरंगुळा म्हणून मला कागद वाचायला आवडतात. म्हणूनच आमच्या ग्रुपमध्ये ते कागद इतरांकडे देता माझ्याकडे दिले. आता माझा लगेचच निष्कर्ष असा की, त्या काळी कंप्यूटर्स खूप कमी असणार. त्या शिवाय का लोकांना इतक्या मोटया नोट्स कागदावर ठेवाव्या लागल्या?
    नोट्स वाचल्या. ती एक कंप्यूटर गेम होती. गेमचे नाव 'कॅच दी लाय.' वॉरेन हेस्टिंग नावाच्या एका इतिहासच्या प्रोफेसर ने आपल्या मुलाला बॉबीला कंप्यूटर डाटा असिमिलेशन शिकवण्यासाठी गेम डिझाईन केली होती. त्याच्या प्रोग्रॅमिंगची डिटेल्स पण या गेमच्या शेवटी दिली आहेत. बापरे ! किती लांबलचक प्रोग्रॅम लिहिला आहे. आपले आताचे झॅप टेक्निक वापरून ही लांबी किती तरी कमी करता येईल. पण ती प्रोग्रॅमिंग डिटेल्स जाऊ देत. प्रत्यक्ष गेम मला फार इंटरेस्टींग वाटली. गेम दोनजणांनी दोन कंप्यूटरवर खेळलेली असावी. प्रत्येक कंप्यूटरवर जुन्या ...ळातील इतिहास, भूगोल, चालीरीती, भाषा इत्यादीबाबत सिलेक्टिव्ह डाटा दिलेला- बाकी आपली तर्कशक्ती वापरायची आणि दुस-याने जे सांगितले त्यात कुठे काय आणि किती खोटे ते शोधून काढायचे. (कथीतरी यातली स्टेटमेंट्स मी माझ्या कंप्यूटरच्या डेटाबेसवर पण चेक करणार आहे.)
    राज्य बॉबीवर- म्हणून त्याचा कंप्यूटर जास्त पॉवरफल (त्या कंप्यूटरचं नाव पण बॉबीच बरं का ! हा वॉरन हेस्टिंग म्हणजे मानसशास्त्रज्ञ  पण असावा) ,पण एखादं स्टेटमेंट कंप्यूटरच्या खूप माहितीचं असेल तर पहिल्या टेस्ट कीवरच तो पास द्यायचा असं वाटतं. कारण नोट्समध्ये कित्येक ठिकाणी बॉबीने पास दिलेला आहे.
    'ओ.के. फादर, माय बॉबी इज रेडी. स्टार्ट.'
    'स्टार्ट, बॉबी ! जंबुद्वीप नावाचा एक देश होता (पास). एक दिवस भी त्याच्यावर कब्जा केला !'
    'फादर, अगदी अल्टीमेट, सपेशल खोटं ! आज इतकी वर्ष मी तुम्हाला ओळखतो !'
    ' तुझ्या कंप्यूटरला तर विचार.'
    'यात एक जंबुद्वीप आहे आणि एक वॉरेन हेस्टिंग पण आहे. पण त्याचा पिरियड फार वेगळाा आहे. तुमच्या डाटा फिडिंगच्या सिलेक्टीव्ह पद्धतीमुळे दुसरा पण एखादा वॉरेन हेस्टिंग असेल तर तो बॉबीला माहीत नाही. गो अहेङ'
    'तर हा ताबा मी- म्हणजे माझ्या कंपनीने - अवध्या एका तासांत मिळवला.'
    'नापास- आय्‌ मीन एक तास हा वेळ तुम्ही कसा कॅलक्युलेट केला?' तुमच्या मनात आलं त्या क्षणापासून एका तासांत?
    'अंद्म तसं नाही पण जेव्हा असं वाअलं की आपली सर्व तयारी पूर्ण झाली आहे- आणि तुतारी फुंकून युद्धाची घोषणा केली तेव्हापासून !'
   


    'फादर ! या एकविसाव्या शतकांत तुतारी? या युद्धवाद्याचा उल्लेख बॉबीकडे आहे तो फार जुन्या
काळातला आहे !'
    ' अरे 'तुतारी फुंकणे' हा एक शब्दप्रयोग आहे (पास). प्रत्यक्षात आम्ही टी.व्ही वरून घोषणा केली !'
    ' चूक! माझा 'बॉबी' दाखवतो की त्यांच्याकडे 'दुर्दशन' होतो- पण ते तुम्हाला असली घोषणा करायला कशी परवानगी देतील?'
    'तुला फारच तात्विक कीस काढायचा असेल तर सांगतो. त्याचाही उपाय सांगतो- एखाद्या जाहिरातीत या घोषणेचे रेकॉर्डिंग करून तेही करता आले असते. पण मुळात दुर्दर्शन पाहतंच कोण?' द्यदृ झ् सर्व चॅनेल्स आमच्या ताब्यात ! त्या सर्वांवर एकदम घोषणा करून टाकली. ती देशातल्या खेडोपाडयांत, कोनाकोप-यांत सर्वानी पाहिली!'
    'काय घोषण केली?''हेच की आमची लेसर डायरेक्टेड रॉकेट्स तुमच्या सर्व मुख्य केंद्रांवर, शॉपिंग सेंटर्स, डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट्स, प्रशासकीय बिल्डिंग्जवर रोखलेली आहेत. एका तासाच्या आत कालिंदी तिरीच्या किल्ल्यावर संधीचा पांढरा झेंडा फडकला नाही तर सर्व सेंटर्स उडवून टाकू.'
    'फादर, मला हे सगळं नॉशिएटिंग वाटतंयू. आपण थोडा वेळ गेम थांबवू या का ?'
    'चालेल- बघ, तुझा बॉबी बीप्स देतोय ! आता त्याच्याकडे असलेल्या सब्जेक्टचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय तो तुला पुढे जाऊ देणार नाही. काय विषय आहे स्क्रीनवर?'
    'हिरोशिमा ! तिथे अणुबॉम्ब पडला होता म्हणे- आणि बॉबी सांगतोय की हा सब्जेक्ट पूर्ण करायला अर्धा तास लागेल.'
    मी भरभर नोट्सचे काही कागद उलटले. हिरोशिमाची माहिती आमच्या कंप्यूटर्स टेपवर असणारच. पण मला आता गेममध्ये जास्त इंटरेस्ट वाटू लागला होता. गेम पुढे सुरू झाला तेव्हा बॉबी पुन्हा चिटरफल वाटला म्हणून नोटस्मधल्या हिरोशिमा चॅप्टरच्या शेवटच्या ओळी वाचल्या. त्यात ते उद्ध्वस्त झालेल गाव अवध्या दहा वर्षात पुन्हा सावरले होते- बहरले होते. हॅट्स ऑफ... असो.
    'ओ.के. फादर, रेडी ! बॉबी सांगतो की तुम्ही धमकी दिल्या प्रमाणे तुम्हाला खरोखर रॉकेट लाँच करायची असती, तर त्या देशाच्या जवळच, रादर त्या देशातच तुमचा कुठेतरी बेस असायला पाहिजे.'
    'तो आम्ही मिळवला होता ना ! जंबू देशात एक कंपनी होती कारभारीगिल जंबू देशाच्या समुद्रपट्टीवर कासव नावाच्या बेटावर ही कंपनी मीठ बनवून एक्सपोर्ट करत असे. तिच्याकडून काही जमीन विकत घेऊन आम्ही आमची कंपनी सुरू केली.'
    'थांबा थांबा' यात खूप चुका आहेत. कारभारीगिलसारख्या देशी कंपनीने मुळात तुम्हाला त्यांची जमीन कशी दिली?'
    'कारण कारभारीगिल ही देशी नव्हे, तर मल्टीनॅशनल कंपनी होती.'
    'हे खोटं ! त्यांनी मल्टीनॅशनल कंपनीला जमीन विकत ध्यायला परवानगी कशी दिली?ते ही समुद्रकिना-यावर? जिथे तुम्ही तुमची स्वतःची डिफेन्स लाइन निर्माण करू शकता? बॉबी सांगतो की, कारभारीगिलचं प्रपोजल त्यांच्या डिफेन्स मिनिस्ट्रीने तपासलं असणार.'
    'नाही तपासलं. त्यांच्या एकॉनॉमिक्स अफेअर्स आणि कॉमर्स मिनिस्ट्रीनेच फक्त तपासलं. कारभारीगिल कंपनीच्या प्रॉजेक्ट रिपोर्टवरून तो एक पूर्णपणे कमर्शियल प्रॉजेक्ट होता. देशाला फॉरेक्स मिळवून देणारा होता. शिवाय कंपनी जे काही मीठ देशातील जनतेवर चांगले संस्कार होणार होते!'
    'फादर, धिस इज टू मच ! हे मी बॉबीकडे बघताच सांगू शकतो. आपण कॅच दी लाय खेळतोय. त्यात तुम्ही सांगितल्या घटनांचा खरेखोटेपणा ओळखायचाय्‌ की तुमच्या तत्वज्ञानातला खरेखोटेपणा?'
   


    'इतकं वैतागू नकोस ! मी कंपनीचे रिपोर्ट वाचूनच कोट करतो बघ-' कंपनीच्या मिठामुळे देशात
चांगले संस्कार निर्माण होतील- लोकांना 'अधिक सफेदी' ची सवय लागेल, चांगलं पॅकिंग म्हणजेच चांगला माल हाही संस्कार त्यांच्यावर होईल. शिवाय महाग वस्तू विकत घेणं म्हणजेच आर्थिक सुधार हा वस्तुपाठ त्यांना मिळेल. झालंच तर मल्टीनॅशनल कंपन्या जाहिरातींसाठी जास्त बजेट, ठेवू शकतात. त्यामुळे जाहिरात कंपन्यांचा धंदा पण वाढेल- जंबू देशाचे धनमंत्री दिले धडकनसिंग यांना कुठल्याही परिस्थितीत देशाचं 'कमर्शियल' सुधारायचं होतं. त्यामुळे त्यांनी ही फाईल डिफेन्सकडे पाठवायची गरज नाही हे ठरवून टाकलं.'
    'आणि कारभारीमिलने मिठाचा व्यापार सुरू केला? थांबा, बॉबी ने तुमच्या निवेदनातील दोन विसंगती पकडल्या आहेत. पहिलं म्हणजे कुण्या एका देशात एक मीठ- फकीर होऊन गेला. आणि त्याने मीठ बनवून परकीयांना हाकलून दिले, तर तुम्ही सांगता तुमच्या दिले धडकनसिंगनी मीठ बनवणारी परकीय कंपनी देशात आणली आणि फादर, मी जरा बॉबीकडचा भाषाशास्त्र हा विषय उघडता, तर तो सांगतोय की हे कारभारीगिल हे नाव जंबू देशातल्या नावासारखं आहे आणि तुम्ही म्हणताय परदेशी कंपनी म्हणजे कंपनीच्या नावात पण तुम्ही काहीतरी गफलत करताय.'
    'ते पुढे ठरेलच. तर या कारभारीगिलच्या मदतीने आम्हीपण त्याच बेटावर आमची कंपनी थाटली हॉलंडमधून काऊडंग इंपोर्ट करून देशी शेतक-यांना क्वालिटी फर्टीलाइझर पुरवणारी. तू लॉर्ड क्लाइव्ही-क्लोव्हचे 'फ्रॉम ट्रेडिंग राईटस्‌ टू बॅटल ऑफ प्लॉसी' हे पुस्तक वाचलं असशीलच. त्यात अर्थशास्त्राचा राज्यशास्त्राचा संबंध सांगितला आहे.'
    'थांबा थांबा' ,असा कोणताच लेखक किंवा पुस्तकाचं नाव बॉबीच्या लिस्टवर नाही. पण राज्यशास्तत्र अर्थाशास्त्राचा गहन संबंध आहे, म्हणून राज्यशास्त्रावरील स्वतःच्या पुस्तकाला अर्थशास्त्र नाव देणारा एक लेखक बॉबीला सापडलाय. त्याचं नाव क्लाइव्ही-क्लोव्ह नसून 'कौटिल्य' असं दिलंय. या पुस्तकांत राजाने कसे वागल्याने समाज सचोटीचा राहीत किवा कसे वागल्याने समाज सचोटीचा राहील किंवा कसे वागल्याने तो ठग- लुटारूंचा समाज होईल, आणि त्या त्या समाज पद्धतीप्रमाणे व्यापारी मंडळी उत्पादक मंडळी कशी वागतील, धंदा सचोटी ने चालेल की पैसा या एकाच निकषावर चालेल, उत्पादकता वाढेल की कमी होईल इत्यादी मुद्दे मांडले आहेत. मात्र काही वेळा व्यापारीवर्गाला वचाटेल तशी राज्यव्यवस्था ते आणू शकतात असेही म्हटले आहे.'
    'मी म्हणतो तो क्लाइव्ही-क्लोव्हचा मुद्दा वेगळा आहे, मग तो सिलेक्टिव्ह डाटा फिडिंगमघ्ये मळला असेल किंवा मी खोर्ट सांगत असन. ते तू शोधायचंस. त्याने असा सिद्धान्त मांडला होता की आधी ट्रेडिंग राईटस्‌ मिळवून आपण पुढे एखाद्या देशाला जिंकू शकतो. जसे कार्ल मार्क्सचे सिद्धांत रशियाने वापरून बघितले, तसे आम्ही पण क्लाईव्ह-क्लोव्हचे तंत्र वापरून बघायचे ठरवले. एकदा जमीन आमच्या ताब्यात आल्यावर आम्ही सिस्टिमॅटिकली तिथे आपलं रॉकेट लॉचिंग उभारायला सुरूवात केली.
    'खोटं- अशक्य. बॉबी सांगतो की जंबू देशात इन्स्पेक्टर्स नावाची एक जात होती. साखरेला जशा मुंग्या तसे कंपन्यांना इन्स्पेक्टर्स चिकटलेले असायचे. त्यांना तुम्ही काय करताय ते कळते असते.'
    'नाही कळले, कारण आम्ही एक चलाखी केली होती. जंबू लोकांना आर एॅड डी आणि हाय- टेक मॉनिटरिंग सिस्टीम या दोन गोष्टीचे फार कौतुक होते. कोणतेही उपकरण असो, ते मॉनिटरिंगचे हाय टेक मशीन आहे असे सांगितले की सगळे माना डोलावून कौतुक करीत आणि पुढे काही प्रश्न विचारीत नसत. मशीनच कशाला, आमचे देशी कामगार बिझी ठेवायला आम्ही त्यांना मोठमोठे हाय-टेक सर्व्हे क्वेश्चनेअर्स देत असू. त्यातच् त्यांचा वेळ जायचा. या सर्व्हेचा पुढे काय कसा उपयोग हे कोणी विचारत नसे. मग तेच



सर्व्हे रिपोर्टस्‌ आम्ही इन्स्पेक्टर्सना देत असू. ते खुश होऊन जायचे. काय म्हणतो तुझा बॉबी?'
    'मी त्याचा जंबू देशातील प्रशासकीय चाली-रीती असा चॅप्टर उघडला. त्यांत म्हटलंय की जंबू
देशातील प्रशासकांना पाने रंगवायची फार हौस होती. जी फाईल जितकी जाड जितका वेळ खाली वर जाईल तितके मोठे बक्षीस ती फाईल सुरू होईपासून संपेपर्यंत सर्वांना दिले जात असे.'
    'तेच ते. असेच आमचे इन्स्पेक्टर्स पण खुश असायचे. आता काही खर्च येत असे, पण तो आम्ही आर एॅड डीकडे दाखवत असू आणि इन्कम टॅक्स रिबेट क्लेम करीत असू, अशा प्रकारे आम्ही आमची एकेक उपकरणे तिथे बसवली'
    'थांबा, आधी हे सांगा की उपकरणं तिथपर्यंत कशी नेली? तिथे कस्टम डिपार्टमेंट होतं असं बॉबी सांगतोय्‌. त्यांनी तुम्हाला पकडलं नाही का?'
    'त्याचा पण उपाय केला. त्या देशांत स्मगलिंग खूप चालायचे. मादक पदार्थ, शस्त्रास्त्रं ासारखे स्मगलिंग बरेच देश खपवून घेत नाहीत. पण जंबू देशांत सुरूवातीला इतर वस्तूंचे स्मगलिंग खूप व्हायचे. घडयाळ, सेल्स, हिरे, सोन्याची बिस्किटे, कॅसेट्स, साडया, सेंट्स काही विचारू नकोस. (नाही विचारत- पास !)'आम्ही सरळ चांदीच्या स्मगलिंगमध्ये उतरलो- म्हणजे कंपनीच्या नाही, वेगळ्या नावाने (पास !)या स्मगलिंगमध्ये केलेल्या गुतवणुकीवर भाग घेणा-या सर्वाना पन्नास ते साठ टक्के रिटर्नस्‌ मिळतील, अशी व्यवस्था केली. सहाजिकच कस्टम अधिका-यांनी त्यांचा हप्त्यांचा रेट वाढवला. चांदी असेल तर दुप्पट हप्ता असे ठरले. शिवाय आणखी काही जास्त हप्ता दिला तर कस्टम आणि पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आम्हाला मिळेल, अशी सोय केली.'
    'पास !'
    'मग एकेक करून मोठया केंद्रमध्ये खाली आपली रॉकेट्स, लॉचर्स आणि इतर उपरणं आणि वर चांदीच्या विटा अशी माल वाहतूक सुरू केली' कस्टममध्ये चांदी डिक्लेअर केल्याने त्यांना चांदीच्या रेटचे हप्ते द्यावे लागत होते- पण त्यामुळे त्यांचे इन्स्पेक्शन अळून शिवाय त्यांची साथ मिळत होती. माल कुठे उतरावयाचा, तात्पुरता कुठे ठेवायचा, कसा हलवायचा आणि कासव बेटावर कसा आणायचा या प्लॅनिंगमध्ये आम्हाला त्यांनी मदत तर होत होतीच, शिवाय त्यांनी आपला माणूस म्हटलं की, वरिष्ठांच्या दरबारातपण आमची प्रतिष्ठा वाढायची. दुसरीकडे काऊडंग फर्टिलायझरसारख्या साध्या साध्या गोष्टीतसुद्धा आम्ही देशात हाय टेक मॉनिटरिंग सिस्टम आणतो म्हणून दिले- धडकनसिंग त्यांचे सहकारी पण आमच्यावर खुश असायचे. आम्ही ही उपकरणे त्यांच्या भूमीवर वापरत असल्याने त्यांच्या प्रगत देशातली आर्थिक विषमता नाही तर निदान इंटलेक्युअल विषमता तरी दूर होते, असा दिले- धडकनसिंग यांचा आवडता सिद्धांत होता.
    'पास- (बोटर !)'
    'बोअर कळले, तर थोडक्यात आम्ही अशी तयारी केली आणि एक दिवस ती तुतारी फुंकून टाकली.'
    'पण लोकांनी तुमच्या धमकीवर विश्र्वास कसा ठेवला?' आणि राज्यकर्त्यांनी?'
    'त्यात काय? आम्ही एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं. कालिंदी तिरीच्या किल्ल्यातील एक विजेचा खांब आम्ही लेसर गाईडेड मिसाईलने जमीनदोस्त केला. ते दृश्य सर्वानी टी.व्ही. वर स्वतः पाहिलं. पुढल्या एका तासानंतर त्यांची एकेक सेंटर्स- पडू शकतात हे त्यांना पटलं. देशाच्या सर्वोच्च प्रशासकाने आदेश देऊन किल्ल्यावर पांढरा झेंडा फडकवण्यात आला.'
    'तरी पण अशा वेळी लोकांच्या भावनांवर काबू ठेवणे कठीण असते. देशांतल्या लोकांना त्यांनी कसं पटवलं? कसं समजावलं?'



    'आम्ही त्यांना आमच्या टी.व्ही. चॅनल्सवर भाषणासाठी निमंत्रित केलं. तेही खुल्या दिलाने आले. रक्ताचा एक थेंबही सांडू देता धवलक्रांती कशी होऊ शकते ते त्यांनी जनतेला समजावले. कारभारीगीलचे मीठही अधिक सफेद आणि हा झेंडाही ! आताच विजेचा खांब पडला. ती वीजही अधिक सफेदच असते. अशा
अधिक सफेद वस्तू महाग असल्या तरी चालतात. हीच ती धवलक्रांति. यामुळे आपण आज विश्र्वप्रवाहात सामील होत आहोत आपल्याकडे आज पासून झ् पर्यंत सर्व प्रोग्रॅम्स आणि काउडंग ते रॉकेट लॉचर्सपर्यंत सर्व गोष्टी इंपोर्ट होऊ शकतात. लोकांनी फक्त पैसे टाकण्या अवकाश की, ही सर्व सुख-साधने त्यांच्या पुढे हात जोडून उभी राहू शकतात. लोकांनी फक्त पैसे टाकण्या अवकाश की, ही सर्व सुख-साधने त्यांच्या पुढे हात जोडून उभी राहू शकतात. या आताच्या परिस्थितीत आजच्या या प्रसंगामुळे काहीफरक पडलेला नाही. आपली वसुधैव कुटुंबकम्ची पॉलिसीच इथून पुढे चालू राहील, असे भाषण त्यांनी वाचले. ते आम्ही आधीच लिहून तयार ठेवले होते.
    'फादर, त्या क्लाइव्ही क्लोव्हचे पुस्तक जंबू लोकांनी वाचले नव्हते का.'
    'पण ते पुस्तक तर तुझ्या लिस्टवर नाही. तसे पुस्तक होते हे तुला नक्की कुठे माहित्येय?'
    'फादर, तुमच्या 'कॅच दी लाय' मथलं लाय मी पकडलंय. हा गेम मुळी मला कॉम्प्युटर डाटा असिमिलेशन शिकवण्याकरता नव्हताच. बहुतेक मला इतिहास शिकवण्या असावा.'
    'राइट, जे इतिहास शिकत नाहीत ते त्यातल्या चुका पुनः पुन्हा करतात आणि पुनः पुन्हा पस्तावतात.'

.........................................................



कोई टिप्पणी नहीं: